व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पीएमपीच्या भाड्यात प्रत्येक टप्प्याला रुपयाने वाढ

पीएमपी गाड्यांच्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी भाड्यात वाढ करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या रविवारपासून (ता. २१) करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी तीन रुपये भाडे आकारण्यात येते. ते कायम ठेवण्यात आले आहे. चार किलोमीटरसाठी पाच रुपयांऐवजी सहा रुपये, सहा किलोमीटरसाठी सहा रुपयांऐवजी सात रुपये भाडे आकारण्यात येईल. १८ ते २६ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात दोन रुपयांनी, तर २६ ते ३० किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ३० ते ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात चार रुपयांनी, तर ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

डिझेलची दरवाढ झाल्याने, जुलैमध्ये प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रत्येक टप्प्यासाठी एक रुपया भाडेवाढ करावी, असे पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित केले होते. एक दिवसीय सवलतीचा दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील पासचा दर सध्या ४५ रुपये असून, तो ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्या व्यतिरिक्त विविध अटी पीएमपीला घालण्यात आल्या आहेत.'' देखभाल दुरुस्तीचे नियोजन नीट करण्यात यावे, कमी उत्पन्नाच्या मार्गाचे सर्वेक्षण करून तेथे नवीन वेळापत्रक तयार करावे, सेवकांच्या कंत्राटी पद्धती व नियुक्‍त्यांवर निर्बंध घालावेत, चालक व वाहक यांच्या व्यतिरिक्त अन्य सेवकांच्या नियुक्‍त्या करण्यात येऊ नयेत, अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, बसमार्गांचे फेरनियोजन करावे, दरवाढीनंतर तीन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा प्राधिकरणाला सादर करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

प्रवासी भाडेवाढीस मान्यता देताना प्राधिकरणाने पीएमटीला काही अटी घातल्या आहेत. त्यातील भाडेवाढीची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. मात्र, प्रवाशांच्या हितासाठीच्या या अटींना फाटा मिळू शकतो. आता या अटींची पूर्तता होतेय की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रवाशांचीच आहे. आपल्या काय वाटते?

5 comments:

  1. sarg said...
     

    Ticket Price rise is essential but development is more important. The conditions are a must and in the interest of PMPML's further development. I think it is high time for PMPML to rethink their route alignments, Planning and way of working. The city has changed while the systems, operations and information systems and way of working are Old.
    A congested city like Pune needs to aggressively improve the Public transport system.
    Step 1- Strengthening the PMPML services and the consider additional systems like Metro. light rail or trams.

  2. Anonymous said...
     

    Simply PMP Making Fool to People Since they are not providing proper services to People. Also I seen many people standing in rain since PMP not constructed proper busstop for peoples and but in case of raising rate of tickets they take faster action. Really people are why bearing this. They need to take action.

  3. Unknown said...
     

    जोपर्यंत राजकारण्यांची ढवळाढवळ व लुडबुड थांबणार नाही तोपर्यंत पीएमपीची आर्थिक परिथिती कधीच सुधारणार नाही,मग भाडी कितीहि वाढवा, कारण कामगार संघटनांवर वचक नाही,कोणाचीहि भरीव काम करण्याची इच्छा नाही,गरजेपेक्षा कितीतरी जास्त,पण बहुतांशी अकार्यक्षम लोक[ड्रायव्हर व कोंडक्टरमात्र निस्चितपणे काम करतातच व ते सोडून!]पगाराच्या मोबदल्यात परत कांहीच देत नाहित!

    राजकारण्यांना दूर ठेवून पीएमपीला मुंबईच्या BEST च्या किंवा तेथिल व्यवस्थापनाच्या ताब्यात दिले तर थोड्याशाच कालावधीत भाडी न वाढवता पीएमपी फ़ायद्यात येइल याची मला खात्री आहे,पण असे करायचे धारिष्ट/धाडस कोण करणार?

    राजकारण्यांनी सर्व infrastructure ची वाट लावली आहे,मग ते शहरांतील रस्ते असोत,विद्युतपुरवठा असो,वाहतुक असो.

    मोठा गाजावाजा करून पुणे व पिंपरीचिंचवडच्या वाहतुक परिवहनांचे एकत्रीकरण करून
    पीएमपीची स्थापना केली होती एकाच उद्देशाने की जास्त सुसुत्रीकरण व फ़ायद्याचे व्यवस्थापन शक्य व्हावे,पण प्रत्यक्षात उद्दिष्ठे साध्य होउ शकली नाहित त्याला एकच कारण म्हणजे शिसारी येणारे राजकारण!

    "आम आदमी[प्रवासी]"च्या खिशात हात घालून शेवटची कवडीसुद्धा हे काढून घेणार!

    जगातली क्रुड तेलाची किंमत प्रति बरल १४५ डोलरवरून ९० डोलरपर्यंत खाली आली तरी आपल्या इथल्या प्रचंड वाढवलेल्या किंमती स्थगितच व त्यामुळे वाहतुकव्यवस्थेवरचा ताण कायमच!

    इतक्या नागरिक संस्थानी या वाढीला विरोध केला आहे तो योग्यच आहे कारण फ़क्त दूरच्या टप्प्याला थोडीशीच वाढ एक वेळ चालू शकेल! सर्वात जास्त पीएमपीला कंबर कसायची गरज आहे!

  4. Suhas Halwai said...
     

    actually PMP hi maharashtratil saglyaat mahagadi transport system aahe jine punyaalaa jaroori peksha jaast mahaag aani complicated banwale aahe.. aataa ti mahag hotey, pan easily accessible hoil kaa? ki PMP che bus-stop bus-stop na bantaa "PMP Darshan Stop" ch rahatil..???

  5. Anonymous said...
     

    पुण्यात विद्वान लोक बरेच आहेत जे फक्त विद्वतापूर्ण बोलतात आणि स्वत:वरच खूश होतात. कृती करायची मर्दुमकी या शेळपटांत नाही. म्हणून पुणे हे राजकारण्यांचे 'soft target' झाले आहे. भारतात सर्वात महाग शहर पुणे हे आहे. कोणताही कर लावा आम्ही थोडे दिवस बडबड करु आणि मग गप्प बसू.

Post a Comment