घटस्फोटानंतरही लहान मुलासाठी दाम्पत्याला एकत्र राहण्याची संधी
कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर केल्यानंतरही लहान मुलाच्या संगोपनासाठी विभक्त दाम्पत्याला एकत्र राहण्याची एक शेवटची संधी उच्च न्यायालयाने एका वेगळ्याच आदेशाद्वारे दिली आहे.या दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी मुलीच्या आईवरही न्यायालयाने जबाबदारी टाकली आहे.
सुनील व रूपाली या दाम्पत्याचा विवाह फेब्रुवारी २००२ मध्ये होऊन त्यांना वर्षभरात मुलगा झाला; मात्र हा मुलगा मूकबधिर आहे. रूपालीने सुनीलचा मानसिक छळ केला या कारणावरून (क्रूएल्टी) मुंबईच्या कुटुंब न्यायालयाने सुनीलची घटस्फोटाची मागणी मान्य केली. त्या आदेशाविरुद्ध रूपालीने उच्च न्यायालयात अपील केले. त्याची सुनावणी नुकतीच न्या. बी. एच. मर्लापल्ले व न्या. एस. जे. काथावाला यांच्यासमोर झाली. लहान मुलाच्या संगोपनासाठी विभक्त पती-पत्नी (निदान काही काळ तरी) एकत्र राहू शकतील का, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यास सुनील राजी झाला; मात्र रूपालीच्या वर्तणुकीबद्दल तो साशंक होता. पण रूपालीच्या आईनेही आपल्या लेकीकडे राहून उद्ध्वस्त होत असलेला हा संसार सावरण्याची तयारी दाखविली. आजपासूनच काही दिवस तरी या दाम्पत्याने सुनीलच्याच घरात एकत्र राहावे. रूपालीचे वागणे बिघडले, तर सुनीलने दुसऱ्याच दिवशी न्यायालयात येऊन त्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशीही मुभा खंडपीठाने त्याला दिली आहे. तोपर्यंत या दाम्पत्याच्या मुलाच्या प्रकृतीसंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांनी सहा आठवड्यांत अहवाल द्यावा, असाही आदेश खंडपीठाने दिला आहे.

0 comments:
Post a Comment