व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कॉंग्रेसमध्ये फक्त पैशाचा खेळ - राणे

""कॉंग्रेस पक्षात सारा खेळ होतो तो फक्त पैशाचा. निष्ठावान आणि कर्तृत्ववान असणाऱ्यांना कधीच पद मिळत नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
"पुढील राजकीय वाटचालीबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेणार असून आपल्यापुढे अनेक पर्याय खुले आहेत,'' असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यावर "विलासराव देशमुख यांच्या "पे-रोल'वरील विरोधी पक्षनेते,' अशा शब्दांत टीका केली. तसेच "हत्तीवर (बहुजन समाज पक्षात) बसणार काय,' या प्रश्नावर "अजून कोठे बसायचे हे ठरविलेले नाही,' असे सांगत त्या पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ऐकीव माहितीवर बातम्या करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

माझ्याप्रमाणे अनेकांचा कॉंग्रेसमध्ये विश्‍वासघात झाला आहे. पतंगराव कदम हे, त्यांना मंत्री व्हायचे नाही, असे सांगतात. पण, मंत्रिपद वाटपाच्या वेळी पहिल्या रांगेत उभे राहतात. विलासराव देशमुख त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकदाही पुण्यातील कॉंग्रेस भवनात गेले नाहीत. मात्र, पुण्यात आल्यावर ज्या भागामध्ये उद्योजक आहेत, त्या ठिकाणी वारंवार भेट देण्यासाठी जात, अशी टीकाही राणे यांनी केली.

विरोधी पक्षनेता म्हणून रामदास कदम हे त्या पदाला कलंक आहेत. एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यावरही त्यांनी सरकारविषयी काहीच विरोध व्यक्त केला नाही, असे ते म्हणाले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्‍यांना राजकीय व्यक्तींनी मदत केली आहे. मात्र, कोणत्या एका नेत्याने केली याची आपल्याला माहिती नाही, अशी भूमिका त्यांनी सोमवारी घेतली.

सुरवातीला मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने कॉंग्रेसमध्ये आलेले नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यता आले. त्यामुळे संपप्त झालेले राणे कॉंग्रेसवर घणाघाती टिका करू लागले आहेत. सर्व तारतम्य सोडून ही टीका केली जात आहे, जी केवळ अशोभनीय आहे. अशाप्रकारची टीका करताना किमान दहा वेळी केला गेला पाहिजे. आपल्याला काय वाटते? लिहा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर

6 comments:

  1. Unknown said...
     

    Mr. Narayan Rane is an ideal example of how the poltician should not be. But the most unfortunate thing is that the people elect such power greedy politicians again & again.

    The AAM JANATA of Maharashtra should learn a lesson from this & should exercise their right of voting carefully to keep these people away from politics.

  2. girdhar said...
     

    नारायण राणेंनी एवढी स्फोटक आणि गंभीर माहिती दिली तरी एक बातमी या पलिकडे कुणी पहायला तयार नाही याचा अर्थ काय समजायचा

  3. Anonymous said...
     

    शिवसेनेत वीस-पंचवीस वर्षे राहून व त्यायोगे अनेक महत्वातची राजकीय सत्तास्थाने उपभोगून संधी मिळताच वैयक्तीक महत्वाकांक्षेपायी शिवसेनेशी फारकत घेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून अत्यंत अर्थदायी असे महसूल मंत्रीपद मिळवणार्‍या राणेनी कॉंग्रेस पक्षात निष्ठावंताना मान दिला जात नाही व या पक्षात केवळ पैशाच्या जोरावरच सत्तास्थाने मिळतात अशी जाहीर बोंबाबोम करणे म्हणजे हा मोठा विनोद आहे व त्याच्या निर्लज्जपणाचे जाहीर प्रदर्शन आहे.
    मोहन दड्डीकर
    पुणे

  4. Anonymous said...
     

    Why are you criticizing Rane now? For last three years when Rane was babbling against Shivsena all Congressi were loving it. Now when its your turn to receive the same from same person you suddenly recall ethics...such a hypocrite.

  5. Anonymous said...
     

    हे सर्व एकाच माळेचे मणी नव्हेत, तर चोर आहेत.त्यांच्यापेक्षा मोठे आतंकवादी दूसरे कोणी नसतील.
    जनतेला वेठीस धरून,जनतेच्या पैशाने मौजमजा करणारे हे महागुंड झेड सिक्युरिटीच्या कवचात किंवा कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहून स्वतःचे संरक्षण करतात,पण त्यांच्या "आम आदमी"च्या संरक्षणाला यांच्या सतत दिमतीला असणारे पोलिस धावून येत नाहीत.
    तीन वर्षे सत्ता उपभोगून गैरमार्गाने प्रचंड पैसे गोळा करणारे राणे यांच्या आत्ता लक्षात आले की "कॉंग्रेस पक्षात सारा खेळ होतो तो फक्त पैशाचा".
    यांची इच्छापूर्ती झाली नाही म्हणून आता कॉंग्रेस पक्षाचे पितळ उघडे पाडायला निघाले,पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसविले गेले असते तर स्वतःच्या पैसे खायच्या कुरणांची व्याप्ती यांनी अनेकपट वाढवली असती!
    अर्थात नव्या मंत्रीमंडळातील सडलेले महाभाग पुढच्या ९-१० महिन्यात वाममार्गाने स्वतःच्या विकासाच्या संधीचे सोने करणार हे निस्चितच आहे!
    महाराष्ट्राची व सर्वसाधारण मराठी माणसाची मात्र कीव येते खरोखरीच!

  6. Prashant said...
     

    पतंगराव कदम हे, त्यांना मंत्री व्हायचे नाही, असे सांगतात --> पतंगराव कदम Direct mukhamatri ban-nar astil.. that's why...

    Rane jar pratek gosta [ tyanchyakadil mahiti ] hacchya sarkhi rakhun rajkiy chalisathi waprat stil tar jantela tyacha kahi use nahiye. better tyani kon kasa kasa paisa khalla te jantesamor aanawe.


    will be thankful

Post a Comment