व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे?

गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रासारख्या प्रगत (म्हणायचे की नाही?) राज्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हते. ही गोष्ट शरमेची तर आहेच पण सर्वसामान्य लोकांप्रती सरकार किती जागरुक आहे, हे दाखवायला देखील पुरेशी आहे.

ज्यावेळी महाराष्ट्राला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती, त्याच काळात स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्याचा, शह-काटशहाचे राजकारण करण्यात प्रत्येकजण गुंतला होता. नेतृत्व निवडीवरून जो काही गोंधळ कॉंग्रेस पक्षाने मांडला होता, त्याला तोड नव्हती. २६ तास चर्चेचे गुऱ्हाळ मांडूनही आपण राज्याला नेतृत्व देऊ शकत नाही, यातच कॉंग्रेसचे या प्रश्‍नाप्रती नसलेले गांभीर्य लक्षात येते. या प्रश्‍नाचे परीक्षण कॉंग्रेसने लोकांसाठी नाही, तर निदान स्वतःसाठी (आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून) केले असते, खूप झाले असते.

आर.आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या आधी (मग ते काही तास का असेना) उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून राष्ट्रवादीने थोडातरी सूज्ञपणा दाखवला.

एवढ्या गोंधळानंतर तरी सर्व आलबेल होणे लोकांना अपेक्षित असले तरी "सत्ताकारणात' असे होतच नाही. म्हणूनच अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होताच नारायण राणे यांनी पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर टीकेची तोफ डागून पक्षामधील लोकशाहीची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली.

खरं तर ही वेळ कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला कुरवाळत बसण्याची नव्हती. राज्यात कोणत्या परिस्थितीत नेतृत्व बदल केला जात आहे, याची जाणीव राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवी होती. मात्र कोणत्याही कारणाने होत असलेला नेतृत्वबदल हा प्रत्येकालाच सत्तेची पोळी भाजायला सोयीचा वाटला. आणि सर्वचजण खुर्चीसाठी पुढे सरसावले होते. मग राणेंनी तरी विवेक का बाळगावा?

वास्तविक अतिशय नामुष्कीजनकरीत्या आघाडी सरकारला नेतृत्वबदल करायला लागला होता. अशावेळी किमान सर्वांनी नवीन नेत्याला पाठिंबा देत लोकांच्या मनात विश्‍वासार्हता निर्माण करत दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या मुंबईला सावरणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देणे, भविष्यकाळात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा होता. पण, लोकांना पहायला मिळाली ती नेत्यांची संकुचित मनोवृत्ती आणि सत्तालालसा. त्यामुळे रुढार्थाने जरी आता महाराष्ट्राला नेतृत्व मिळाले असले,तरी महाराष्ट्रातली "निर्नायकी' संपली असे अजून तरी म्हणता येणार नाही. आणि हा निर्नायकी महाराष्ट्र सतत धुमसत राहील, हे सांगायला वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही.

आपल्याला काय वाटते? नक्की लिहा...

4 comments:

  1. Unknown said...
     

    सरकार ही काय चीज आहे ते आपण कित्येक महिने अनुभवतोच आहे.संधीसाधू नारायण राणे यांनी तब्बल अडीच तीन वर्षे वाट बघितल्याव्रर त्यांचा जेव्हा भ्रमनिरास झाला, तेव्हा त्यांनी असा थयथयाट केला जसे त्यांना सरकारमध्ये कांही आलबेल नव्हते हे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच समजले! म्हणून त्यांच्या प्रामाणिक[??] नितिमत्तेस ते न पटल्यामुळे त्यानी सर्वोच्च कॉंग्रेस नेतृत्वावर शरसंधान केले व आपल्या खिशातल्या[?] २५-३० आमदारांसकट बाहेर पडून सरकार पाडण्याची धमकी दिली.
    त्यानंतर एक दिवसांतच त्यांनी घुमजाव करून त्यांची आगपाखड फ़क्त सोनियांच्या स्वीय सहाय्यकाबद्दल होती असे स्पष्टीकरण दिले व त्यांची सरकार पाडण्याची धमकी हा एक फ़ुसका बार होता हे सर्वांच्या लक्षात आले.
    एकंदरीत आपण किती खालच्या दर्जाच्या राज्यकर्त्यांच्या हातातले बाहुले बनलो आहोत त्याचे घृणास्पद दर्शन घडले या गेल्या आठवड्याच्या नेतेनिवडीच्या निमित्ताने! राणे म्हणतात कॉंग्रेस देश विकायला निघाले आहे,विलासरावांनी खुप माया जमविली आहे,पण भ्रष्टाचाराची प्रकरणे स्वतःवर पण शेकू शकतात अशी उपरती झाल्यामुळे त्यांनी शेपुट त्वरितपणे पायात घातली व महाराष्ट्राच्या लाडक्या जनतेला अशा संकटकाळी सुरक्षित ठेवण्याच्या उदात्त इराद्याने सरकार पाडणार नाही अशी ग्वाही दिली!
    वा ! काय जनतेचा पुळका आला या स्वार्थी नेत्याला !
    कॉंग्रेस पक्षाने तर अशा कठिण काळीसुद्धा आपण किती मतलबी, खालच्या दर्जाचे व फ़क्त गांधी घराण्याचे मिंधे आहोत त्याचे जाहिर प्रदर्शन केले!
    विलासराव,नारायण राणे इत्यादिंची अनेक बिंगे गेली कांही वर्षे या पक्षाने गुलदस्त्यात लपवून ठेवून लोकांचा विश्वासघात केला व भ्रष्टाचारास खतपाणी घालणे चालू ठेवले !
    या सर्व घटनांवरून येथिल जनतेने धडा शिकून कॉंग्रेस/NCP ला कायमचे तडीपार करण्याची वेळ आली आहे ! तोपर्यंत दम धरूया ! काळ आलेला आहे,पण वेळ यायची आहे !

  2. Anonymous said...
     

    I think this blog should address on the statement raised by the Narayan Rane. He said, he knows the political leaders who are providing support to the Terriorsts. Why police not taking him into the custody and interogate. Till the time he is benefitted from other political leaders he(Rane) is kepping mum. when they ingone him he started commenting against them.

    please raise this issue.

  3. Anonymous said...
     

    Narayan rane is a fuxxxxx idiot, he shoul dbe ashmed of himself, the guy is like a kid going around and wants to become CM, and no one wants to make him a CM, so he is barking like a dog everywhere.

    What a waste of time to even report and comment on people like this.

  4. Vijay said...
     

    Writting in English is not effective it should be in Marathi.
    Please do the needfull.

Post a Comment