राणेंचे बंड बदलणार पुण्याचे संदर्भ
माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारल्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार असले, तरीही पुणे शहराचे राजकारण मात्र त्यामुळे ढवळून निघाले आहे.
राणेसमर्थक विनायक निम्हण त्यांच्याबरोबरच कॉंग्रेसबाहेर पडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने त्यांच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्यांनी पुन्हा जोर धरला आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा परिणाम शहराच्या चार विधानसभा मतदारसंघांवर थेट होणार आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले विनायक निम्हण यांचा लौकिक राणे यांचे कट्टर समर्थक असाच आहे. निम्हण अजूनही तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असले, तरीही ते मनाने राणे यांच्याबरोबरच कॉंग्रेसवासीय झाले होते.
राणे यांच्या या नव्या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समीकरणे बदलणार आहेत. निम्हण हे आता कॉंग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसणार, हे जवळजवळ निश्चित झाल्याने अनेकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ मूळचा आपलाच असल्याचा दावा चंद्रकांत छाजेड करू शकतील, किंवा गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले हे देखील आपला दावा सांगू शकतील. शिवाजीनगर राष्ट्रवादीकडे आल्यास कोथरूड कॉंग्रेसकडे जाणार. त्यामुळे कॉंग्रेसच्या दीपक मानकर यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कॉंग्रेसमधील इतर इच्छुकही कामास लागले आहेत.
साहजिकच पुण्यातील आठही मतदारसंघांची स्थिती ही एखाद्या "तुकडे जोडून चित्र पूर्ण करा' या कोड्याप्रमाणे झाली असून, शिवाजीनगरमध्ये निम्हण घेणार असलेली भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे.
कॉंग्रेसमधून निलंबित केलेले नारायण राणे गुरुवारी कणकवली येथे येऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत.
तुम्हाला काय वाटते? राणे यांची घोषणा काय असेल? अन् तुम्हाला काय वाटते, त्यांची वाटचाल कशी असावी?

Vinayak Nimhan, Shivaji Nagar madhun nivdun ale karan tey Shivsene che umedvar hote tyacha adhi Sashikant Sutar hey shivsene chech umedvar tethun nidun ale hote.
Vinayak nimhan kote hi gele teri tyache kuthe hi kahi hi parinam honar nahit, karan tyacnhe karya kshetra maryadit ahe
Rane jeva shivsena sodun gele tevha Nimhan sodle tar sene madhlya kuthlya hi vajandar neta tyacnhya barobar gela nahi
I think its high time that he should retire from politics and do bolacheech kadhee and bolachach prahar...!
Rane - Only Option to you:
JOIN MMS or ShivSena again.
OR - Retire and go to Kashi or Kanyakumari.
मला नाही वाटत की रानेंचा काही प्रभाव आहे पुणे मधे. साध्य राणे ना घर का ना कही का अशी परिस्तितित aahet. ranena jar khorakharch lok sewa karaychi hoti tar te karu shakle aste. Baki koni kai kela tyapeksha tyaani kay hech lokani pahila asta.
P:S je kahi [rajiname] zale to niwaala ek porkhelch watla malatari. Lok dhukttah ani rajkarni padachya dhukttah.
"सकाळ" राणेंना फ़ुकटचा भाव देवून हा विषय ब्लॉगवर आणत आहे.
राणे हा spent force आहे व ते शिवाजीनगर मतदारसंघात कांहीहि फ़रक पाडू शकणार नाहीत.विनायक निम्हण जरी येथून निवडून आले असले तरी त्यांनी राणेंचा हात धरला तेव्हाच मोठी चूक केली.
आता उगाच या छोट्याभागांना महत्व देणे थांबविले पाहिजे! भारतातील बहुतेक राज्यकर्ते खुजे आहेत जरी त्यांनी मोठाल्या फ़्लेक्सबोर्डांवर आपल्या मोठाल्ल्या छब्या उभ्या केल्या तरी! हल्लीतर अशा फ़लकांचे पिक आले आहे.दिसायला सर्वसाधारण किंवा कुरूप असलेले या नेत्यांनी सर्व लाज सोडली आहे व शहराला विद्रूप करण्याचा सपाटा लावला आहे.महानगरपालिकेला यात गैर कांहीच वाटत नाही याचे आस्चर्य वाटत रहाते.
आधी शिवसेनेतून व आता कॉंग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या राण्यांचे तोंड बंद करायची आता जनतेची पाळी आलेली आहे, कारण यांनी महसुलमंत्री असतांना अनेक बेकायदा बांधकामे नियमित केलेली आहेत व त्यामुळेच यांच्याकडे डेक्कनसारख्या व इतर ठिकाणी मोठ्ठाले प्लोट घेवून विकसित करायला अमाप पैसे आले आहेत.