व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सत्र परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या शहर व जिल्ह्यातील शाळांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचा निर्णय घेण्यात आल्या असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी सांगितले.


ही स्पर्धा 12 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान होत आहे, तर ता. 9 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान पालिकेच्या आणि खासगी शाळांच्या परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे स्पर्धेत सहभाग असलेले विद्यार्थी संभ्रमात होते. या निर्णयामुळे स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्या शाळांचा स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग आहे, त्या शाळांनी प्रथम सत्र परीक्षा दिवाळीची सुटी संपल्यावर तत्काळ घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला.


अन्य शाळांनी आपल्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास हरकत नाही. ज्या शाळांना या स्पर्धा पाहण्यासाठी सहलीचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनीही सत्र परीक्षेचे आयोजन दिवाळी सुटी संपताच करण्यास हरकत नाही, मात्र कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जाहीर वेळापत्रकापेक्षा अगोदर घेता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या.


दिवाळीनंतर होणाऱ्या परीक्षेवर अनेक पालकांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत कैलास कुलकर्णी यांनी ई- सकाळवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ''दिवाळी हा भारतीयांसाठी सर्वांत मोठा सण असतो. किंबहुना हा सण ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शिवाय दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त साधून अनेक जण पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, राज्य शासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. शासनाला राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, की सत्र परीक्षा? आम्हाला राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षाही आमच्या मुलांच्या परीक्षा आणि दिवाळी महत्त्वाची आहे. शिक्षणाची पंढीरी म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा अशाप्रकारे तुकडा पाडणे खेदजनक आहे. या निर्णयाला विरोध झालाच पाहिजे.'

समस्त पालकहो...!


आपलेही पाल्य या निर्णयाचे शिकार ठरले असतील. आपल्यालाही हा निर्णय चुकीचा वाटतो का? की आपण या निर्णयाचे स्वागत करता? या ब्लॉगवर प्रतिक्रिया जरूर नोंदवा...

13 comments:

 1. HAREKRISHNAJI said...
   

  या स्पर्धे साठी परिक्षा पुढे ढकलणे हा निर्णाय चुकीचाच आहे.

  ्स्पर्धाही महत्वाच्या आहेत या बद्द्ल शंका नाही. त्याच्या आयोजनाच्याच वेळी या बाबी लक्षात घेवुन त्यांचा तारखा ठरवायला हव्या होत्या.

  ज्यांचे या सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे बेत ठरले आहेत त्यांचा आता चंगलाच हिरमोड होणार आहे.

 2. Rahul said...
   

  When was the CYG dates were known the city planners / education planners ? How these decisions are done at that last minute? It could have been planned before so that everybody could have enjoyed CYG Games as well as Diwali .....

 3. dinshaw said...
   

  THOSE WHO COULD NOT PLAN WATER, ELECTRICITY & MOTORABLE ROADS IN LAST 61 YEARS, HOW CAN YOU EXPECT FROM THEM?
  U R EXPECTING TOO MUCH
  ABOUT EDUCATION FROM THE UNEDU---- !!

 4. Mak said...
   

  This is totally ridiculous decision. Every student and parent should protest against it. So many things are planned around the children exam dates. All those plans will fail now or children’s will not be able to enjoy the vacation.
  Look at the tremendous planning went behind China Olympics. We should learn something from them.
  I will request all the School heads to take their own decision and schedule the exam as planned.

 5. Anonymous said...
   

  This is biased decision to take exams after Diwali due to games. It's hard to digest we are still don't have planning in place especially in education system.

 6. Uday said...
   

  POSTPONING OF TERMINAL EXAMS WILL PUT STUDENTS & PARENTS UNDER TROUBLE AS THEY HAVE TO STUDY DURING DIWALI HOLIDAYS.

 7. Anonymous said...
   

  We Indians are unpopular world over for our lack of planning and bringing politics in every walk of life. If the CYG schedule was known before beginning of the school year, why could we not plan the exam accordingly? Personally my planning to bring my family to Germany during Diwali vacation has gone for a six and also the money involved!

 8. Anonymous said...
   

  This decision has been imposed on the helpless students for no reason. If you really want the sports to be a priority, let there be open spaces for children to play everyday in their neighborhoods. Stop stealing the would-be open spaces from the city development plan. This is appeal to both the prominent politician-thieves of the district who are said to have stolen half of Pune's land each.

 9. baban said...
   

  education departmet said that all distschool in pune take thir exam after dipawli .but those school not partipiciat in these gamewhy they take thireexam . after vacastion.give explnation

 10. Shrikant Atre said...
   

  Why postpone and increase stress and strain of students and parents ? Simply CANCEL all Semister exams and the matter will be over !

 11. Anonymous said...
   

  When we give powers in the hands of uneducated, this aught to happen.
  Is there any great reason to do these games just after few months from Olympics and secondly when the half of the nation is affected by floods and people are starving for food. We wasted 200 Cr on the half made road in baner and many more on the hype.

 12. Anonymous said...
   

  Many of us heard about Commonwealth youth games for the first time. There was not a single news in the newspapers when last CYG was held. Punekars be prepared to teach lesson to Kalmadi in the next elections. If we give him rest for next five years, he will be able to concentrate on Commonwealth Games 2010.

 13. Anonymous said...
   

  पुणे महानगरपालिका व येथिल सरकार मुलांच्या शिक्षणाला वा शाळांना किती प्राधान्य देते याचा ज्वलंत नमुना म्हणजे मोडेल कोलनीतील चित्तरंजन वाटिकेच्या पूर्व दरवाज्यासमोरील सांडपाण्याच्या कालव्याच्या दक्षिणेकडेच्या शाळेसाठी रिझर्वेशन असलेल्या शिरोळ्यांच्या मळ्याचा कित्येक एकरांचा प्लोट!!!

  त्यावरील शाळेसाठी असलेले रिझर्वेशन उठवून तेथे मोठ्या व महागड्या सदनिकांचे अलिशान संकुल बाधण्याचे कारस्थान सध्या शिजत आहे.

  त्यादृष्टीने या प्लोटच्या दक्षिणेस व पस्चिमेस मोठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे!
  ज्याक्षणी टेबलाखालून प्रचंड देवाणघेवाण पूरी होइल त्याक्षणी त्यावरचे रिझर्वेशन उठवण्यात येइल व लागलीच बिल्डरची माणसे व यंत्रसामग्री येथे इमारती उभ्या करायला सरसावतील!

  महाराष्ट्र सरकार कुठल्या दिशेने राज्याला नेत आहे हे त्याच्या कर्मामुळे सिद्ध होत आहे व संधीसाधु महसुलमंत्री डांबोरा पिटत सोनियाला साकडे घालत आहेत!

  लोकशाहीचा केव्हाच अंत झाला आहे कारण जनतेच्या/आम आदमीच्या फ़ायद्याचे सर्व निर्णय डावलण्यात येत आहेत!

  ज्या शहरात अफ़ाट लोकसंख्येमुळे आणखी शाळांची नितांत गरज आहे तेथिल शाळेच्या रिझर्वेशनची जमिनसुद्धा बळकावण्यात येत आहे!!!

Post a Comment