
सत्र परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात

ही स्पर्धा 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान होत आहे, तर ता. 9 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पालिकेच्या आणि खासगी शाळांच्या परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे स्पर्धेत सहभाग असलेले विद्यार्थी संभ्रमात होते. या निर्णयामुळे स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्या शाळांचा स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग आहे, त्या शाळांनी प्रथम सत्र परीक्षा दिवाळीची सुटी संपल्यावर तत्काळ घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला.
अन्य शाळांनी आपल्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास हरकत नाही. ज्या शाळांना या स्पर्धा पाहण्यासाठी सहलीचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनीही सत्र परीक्षेचे आयोजन दिवाळी सुटी संपताच करण्यास हरकत नाही, मात्र कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जाहीर वेळापत्रकापेक्षा अगोदर घेता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या.
दिवाळीनंतर होणाऱ्या परीक्षेवर अनेक पालकांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत कैलास कुलकर्णी यांनी ई- सकाळवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ''दिवाळी हा भारतीयांसाठी सर्वांत मोठा सण असतो. किंबहुना हा सण ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शिवाय दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त साधून अनेक जण पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, राज्य शासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. शासनाला राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, की सत्र परीक्षा? आम्हाला राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षाही आमच्या मुलांच्या परीक्षा आणि दिवाळी महत्त्वाची आहे. शिक्षणाची पंढीरी म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा अशाप्रकारे तुकडा पाडणे खेदजनक आहे. या निर्णयाला विरोध झालाच पाहिजे.'
समस्त पालकहो...!
आपलेही पाल्य या निर्णयाचे शिकार ठरले असतील. आपल्यालाही हा निर्णय चुकीचा वाटतो का? की आपण या निर्णयाचे स्वागत करता? या ब्लॉगवर प्रतिक्रिया जरूर नोंदवा...