व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

मिरवणुकांचा दणदणाट आणि गच्च ट्रॅफिक

रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेली पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक सोमवारची टळटळीत दुपार उजाडली तरी सुरूच आहे....! शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, अलका टॉकीज, डेक्कन परिसरात भर दुपारी बारा वाजताही ढोल-ताशांचा कडकडाट सुरू आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह रविवारी सकाळी जेवढा होता, तेवढाच सोमवारीही आहे. थकलेले पोलीस आणि अजूनही उत्साही कार्यकर्ते असं हे चित्र सोमवारी दुपारी दिसलं.

सोमवारमुळं कामासाठी घराबाहेर पडलेल्यांना अक्षरशः चक्रव्युहातून रस्ता काढत काढत ऑफिस गाठावं लागलं ! एरव्हीच्या अर्धा तासांच्या प्रवासासाठी तास-दीड तास फिरून सामान्य नागरीक मुक्कामाचं ठिकाण गाठत होते. गल्ली-बोळांमध्ये वाहने खोळंबली होती. मुख्य रस्ते बंद आणि एक चार चाकी घुसली, तर बोळ बंद अशी सकाळची अवस्था होती. 

रात्री भुरभुरता पाऊसही उजळवून टाकणारी ऱोषणाई पाहून पहाटे पहाटे मिटलेले डोळे गच्च ट्रॅफिकमध्ये धुरामुळे नक्कीच उघडले गेले...! तुमच्यापैकी अनेकांना हाच अनुभव आला असेल...नाही का?

3 comments:

  1. Anonymous said...
     

    This has become a common thing every year now.Every year,when the utsav starts,there is a news that the procession will end in 24 hours or so.But it never happens.

  2. Anonymous said...
     

    सुसंस्कृत पुणे इतिहासजमा झाले आहे. दारु पिऊन धिंगाणा घालणे हाच शिष्टाचार झाला आहे. समाजात एक मोठा दिशाहीन आणि नेतृत्वहीन वर्ग तयार झाला आहे. आधी तो नव्हता असे नव्हे. पण तेव्हा सुसंस्कृत नेतृत्वाचा दरारा होता. राखीव मतदारसंघ निर्माण केल्यामुळे तेथून सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व मिळेलच याची शाश्वती नाही. यथा राजा तथा प्रजा! अरे इथे कोणी सभ्य राजकारणी जिवंत उरला आहे काय? आधी आवरा आपल्या कार्यकर्त्यांना. व्यक्तिगत महत्वाकांक्षा जरा बाजूला ठेवा.

  3. Unknown said...
     

    एक विनंती,
    शक्यतो तुमचं नाव कॉमेन्टमध्ये यावं. अनोळखी कॉमेन्टपेक्षा नावानिशी आलेली कॉमेन्ट जास्त खात्रीलायक वाटते...! तेवढ्यासाठीच फक्त.

    धन्यवाद,
    ई सकाळ

Post a Comment