नवं प्रतिबिंब..!
पुणे प्रतिबिंब ब्लॉगचं रुपडं आम्ही बदलतोय. गेल्या वर्षी अठरा एप्रिलला सुरू केलेल्या या ब्लॉगला मराठी विश्वाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मराठीत ब्लॉगची संकल्पना रुळली जरूर आहे, पण लोकांच्या रोजच्या जीवनातले प्रश्न ब्लॉगच्या माध्यमातून चर्चेला जाण्याचा प्रकार अत्यंत विरळा. तो पुणे प्रतिबिंब ब्लॉगवरून ई सकाळने सुरू केला आणि पाहता पाहता या ब्लॉगला भेट देणाऱयांची संख्या लाखाच्या घरात गेली.
निव्वळ भेट देऊन थांबणार, तो पुणेकर कसा? ब्लॉगवरील पोस्टवर होणारी चर्चा वाचली, तरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल! विषय स्वयंशिस्तीचा असो, जुन्या आठवणींचा असो, अभिनंदनाचा असो वा आत्महत्येचा. पुणेकर आणि पुण्यातील घटना-घडामोडींवर जाणिवपूर्वक लक्ष ठेवणाऱया तुमच्यासारख्या प्रत्येकानं त्यावर आपलं मत जरूर व्यक्त केलं. या मतांची दखल घेऊन गेल्या दीड वर्षांत ब्लॉगवरील चर्चेचे अनेक विषय आम्ही सकाळमध्येही मांडले. नेटीझन्स नसणाऱया प्रत्येकापर्यंत हा ब्लॉग आणि चर्चेची ही नवी प्रक्रिया पोहचावी हा उद्देश होता.
एकसुरीपणाचा कंटाळा येतोच नं? किमान इंटरनेट माध्यमात तरी नक्कीच ! त्यामुळंच आम्ही ब्लॉगचं रुप बदलतोय.
कसे वाटतेय हे रुप? आम्हाला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया. पुणे प्रतिबिंब ब्लॉगवरील चर्चेचे विषय, पद्धत आणि सुधारणांबद्दल तुमच्याकडून येणाऱया प्रत्येक सूचनेचे स्वागतच असेल...
पुणे प्रतिबिंब ब्लॉगचं नव पांढरशुभ्र रूप व लाल रंगातली शिर्षके छान आहेत व वाचायलापण सोपी आहेत.जगभरातील वाचकांचा उदंड प्रतिसाद अभुतपूर्व आहे यात शंकाच नाही! याबद्दल सकाळचे मनःपूर्वक अभिनंदन!
येथे लिहिलेल्या कांही सकारात्मक [व गरज असलेल्या नकारात्मक] सुचनांचे स्वागत झाले व त्यातील कांही निवडक सुचना जरी सकाळ वर्तमानपत्रात छापून आल्या तरी त्यांची फ़ारशी दखल घेतली जात नाही व महानगरपालिका,पालकमंत्री,खासदार,
राज्यकर्ते नेते इत्यादि त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतात व त्यांच्या उदासीनपणामुळे परिस्थिती बहुतांशी जशीच्या तशीच राहते असा अनुभव आहे!
त्या संबधित व्यक्तींकडे पाठविल्या जातात का नाही व त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जातो का नाही हे जनतेला कधीच समजत नाही!
त्यामुळे टाईमपास किंवा उत्स्फ़ुर्त भावनांना मार्ग करण्यापलिकडे कितपत साध्य होते हे समजत नाही!
त्यासाठी प्रत्येक झालेला महत्वाचा विषय ठराविक कालावधीनंतर पुन्हा ऐरणीवर आणून त्याबद्दलची सत्य परिस्थिती "सकाळ" ने कळवावी असे वाटते!
उदाहरणार्थ खुनी हल्ल्यात धारातिर्थी पडलेले कै.डॉ.घैसास व कै.ज्योतीकुमारी यांच्या अपराध्यांच्या तपासात झालेली प्रगती वगैरे वगैरे!
तसेच ज्या ज्वलंत विषयावर खुप चर्चा होउनहि थोड्याच काळात तो पानावरून पडद्याआड जातो किंवा archive मध्ये गायब होतो,तो नवे कोमेंन्टस आल्यावर पुन्हा वर आला पाहिजे जसे "मुक्तपीठ"वर होते!
अर्थात हे सर्वसकट सर्व कोमेंटच्या बाबतीत लागू होउ नये कारण त्यातील कांही उथळ/निरर्थक असतात,पण सकाळ ब्लोगसंपादकच हे ठरवू शकतो.
www.c-mitra.blogspot.com
on tranport public
www.c-mitra.blogspot.com