व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पुण्यातील "झगमगाट' बंद!

वीजटंचाईचा कहर झालेला असनू शहरातील भारनियमन साडेसहा तासांवर पोहोचले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत शहरातील सर्व "होर्डिंग' बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच शहरातील मॉल-मल्टिप्लेक्‍समधून २० टक्के वीजबचत करण्याची सूचना करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा "महावितरण'ने दिला आहे. राज्यात प्रचंड वीजटंचाईमुळे पुण्यासारख्या अखंडित वीजपुरवठा होणाऱ्या शहरातही भारनियमन करण्याची वेळ आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चैनीचा वीजवापर टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व जाहिरात फलकांचा वीजपुरवठा संध्याकाळनंतर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच मॉल- मल्टिप्लेक्‍स, उच्चदाब वीजग्राहक यांना पंधरा ते वीस टक्के बचत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती "महावितरण'च्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रमेशसिंह गौतम यांनी दिली.

पुण्यातील मॉल- मल्टिप्लेक्‍समध्ये 20 टक्के वीज कपात करण्याचा निर्णय घेऊन महावितरणने एकप्रकारे बरेच केले. कारण सर्वाधिक वीज या मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये वापरली जाते. आपल्याला काय वाटते याविषयी?

6 comments:

  1. Anonymous said...
     

    The useless congress & NCP govt ruling M'tra for so many years has totally failed in all spheres & that is why this most pathetic scenario of acute power shortage repeating year in & year out!!!

    When the govt has known the worsening power situation all along,when Shri.Madhav Godbole committee appointed by them had made many suggestions which were not taken seriously,when the NCP supremo in an uncharacteristic manner stooped low to heap all blame on Shri.Godbole,a retd.IAS officer with unblemished record & unparallelled integrity so as to save his coalition govt's skin,when well acknowledged experts of Prayas have been crying hoarse for years warning the M'tra govt,when TATAs were offering uninterrupted power to Pune,which was not accepted by the govt,when despite trifurcation of erstwhile MSEB, brought about no improvement or increased generation,what do you expect except compounding & worsening of the public's misery???

    Now wait for the year 2020,when with the charity of the USA,nuclear power of ONLY 20000 MW[by then,requirement/shortfall would have increased by 100000 MW!!!] at phenomenal cost.

    We had the Bhabha atomic power station of our own,we built another one @Kalpakam near Chennai on our own ages ago & why the hell the Indian govt has to beg of USA & so many other countries for this so called nuclear agreement with no arbitration clause,with The USA's binding Hyde act, in stead of building few more on its own?

    We have surplus of solar energy & wind power & we fail to harness same because the solar unit & windmill manufacturers want to make windfall profits & the govt too wants it's pounds of flesh through taxes!!!

    What a farce present Indian govt has become,repeals POTA,TADA just to please/appease one community,appoints a pathetic toothless home minister & allows fireworks through serial blasts!!!

    And sakal as usual just seeking comments of few odd blog readers,but refraining from scathing remarks about the incompetent govt!!!

    Keep publishing the sickening hundreds of photos of & B'day messages to NCP leaders!!!

    Time to throw out this useless MSEDC Ltd & bring in another govt!!!

  2. Unknown said...
     

    यावरच्या निनावी प्रतिक्रियेत जरी ती कटू वाटली तरी तथ्य जरूर आहे!
    १]महाराष्ट्रात ठोसेघर व साता-याच्या आसपास विद्युतनिर्मितीकरता कित्येक पवनचक्क्या उभारल्या आहेत.परंतु त्यांची विक्री किंमत प्रचंड नफ़्यामुळे उत्पादनखर्चाच्यापेक्षा कित्येक पट जास्त आहे.त्यामुळे अशा कांही पवनचक्क्या celebrities नी उभारल्या आहेत.ठोसेघरला या पवनचक्क्यांच्या येथे असलेल्या फ़लकाप्रमाणे त्यामधून सर्व मिळून ७०० MW विद्युतशक्ती निर्माण होते.
    २]अतिमहागड्या किंमतींमुळे सौरउर्जाने पाणी तापवणे हे फ़क्त थोड्या बंगल्यांच्या व सोसायट्यांच्यामधील चांगली आर्थिक परिस्थिती असणा-यांनाच परवडू शकते.
    ३]पुण्यात कांही चौकात सौरउर्जावर चालणारे वाहतुकनियंत्रक दिवे बसविण्यात आले होते.परंतु देखभालीअभावी ते चालू स्थितीत नाहीत म्हणून भारनियमन असलेल्या भागातले वाहतुकनियंत्रक दिवे बंद असतांना वाहतुकीचा बोजवारा/खेळखंडोबा रोजच होतो!!!
    ४]मोठ्या गाजावाजाने सुरू केलेला दाभोळ प्रकल्प पहिल्या टप्प्यात ७५० MW विद्युतशक्ती पूरवत होता. त्यातल्या उभारलेल्या दूस-या टप्प्यातून आणखी ७५० MW वीज उपलब्ध असतांनासुद्धा तो लवकरच कित्येक वर्षांसाठी न परवडणा-या भावामुळे बंद पडला.
    तो पुन्हा कार्यान्वित केल्यानंतरसुद्धा त्याच्या पूर्ण क्षमतेच्या अर्धी विजनिर्मितीसुद्धा केली जात नाही हीपण दुर्दैवाची गोष्ट आहे!
    ५]बाकी राहिली जुनी कोळसा वापरणारी औष्णिक किंवा धरणांच्या पायथ्यांशी असलेली Hydel उर्जाकेंद्रे जी कोळसा किंवा पाणी पुरेसे उपलब्ध नाहीं किंवा जुनी झाली म्हणून वारंवार बंद झालेली/पडलेली!
    मग भारनियमन नित्याचेच!!!
    ६]आपल्या देशाची लोकसंख्या जशी अमाप वाढतच आहे तसेच सर्व infrastructure वर न पेलणारा भार वाढला आहे,पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुटुंबनियोजन खाते,त्याबद्दल सक्ती हा प्रकारच नाही!!!
    ७]लहान शहरांची आता अजस्त्र महानगरे झाली तरी हा विकास समजायचा कारण त्यातून ठराविक लोकांना प्रचंड माया कमावता येते!पण आपली ही निती तारक नव्हे तर मारक व आणखी काही काळाने अतिसंहारक ठरणार आहे!!!
    जखमा होउ न द्यायच्याऐवजी त्या वाढायची वाट बघायची व वरवर मलमपट्टी करायची हीच आपल्या राज्यकर्त्यांची निती आहे कारण काय तर "मते व सत्ता" सर्वात महत्वाची!
    ८]केंद्रातील उर्जामंत्री महाराष्ट्राचे असून आपल्याला काय फ़ायदा???
    विजेची मागणी सातत्याने वाढणार असे साधा शाळकरी मुलगासुद्धा सांगू शकतो,पण हे राजकारण्यांच्या लक्षात यायला कित्येक वर्षे जातात!
    अरे किती सबबी सरकार व MSEB कायमच्या देत आहेत!परिस्थिती मात्र "जैसे थे"!जनतेच्या डोळ्यांत किती वर्षे धूळफ़ेक करणार?
    मग "सकाळ" निरर्थक चर्चा योजून निष्पन्न कांहीच नाही!

  3. meltyourfat said...
     

    Dear marathi blogger,
    We are India blog aggregator and do have several language aggregators.
    We just added a marati category as well. I will appreciate, if you can signup and submit your marathi blog at http://www.enewss.com

    Thanks
    sri

  4. Anonymous said...
     

    MSEB Cannot collect money from illegal connections in Maharashtra. These corrupt MSEB collectors and billers add up to an expense to common man in INDIA. India is heading to a corroupt and illegal state.

  5. Anonymous said...
     

    NCP Members travel overseas and spend a huge amount of money. This is all done at common man's hard work and taxes. This is all to be stopped and the opposition party should question this.

    If the opposition party is also given some portion of bribes, common man has no life in hindustan, and all investment in Maharashtra from NRI's is a waste of money.

  6. Anonymous said...
     

    Ummm, I don't think the dying so called "common man" is aware about the situation. The common man now dreams about reservations via OBC category and organizations like Sambhaji Brigade are warning about dire consequences if that is not done!! Can you imagine the level of incompetency these organisations are used to? They can even get these reservations as the politicians are all from their community. But I wonder what might happen on a global scale when these guys have to compete with global competitors.. Somebody should tell them that being a "past ruler" they would not have concessions in the cut-throat competition in current war like business scenario!!

Post a Comment