व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पर्यटनस्थळांची स्वच्छता

सुमारे २५ लाखांहून अधिक पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाचे पाणी पोहणाऱ्या, दुचाकी धुणाऱ्या आणि त्यात कचरा टाकणाऱ्या पर्यटकांमुळे दूषित होत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर आरोग्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे.

नेहमीच या परिसरात पर्यटक फिरायला येतात. पावसाळा सुरू झाल्यावर तर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते; मात्र काही उपद्रवी पर्यटक खाद्य पदार्थ, कचरा धरणाच्या कडेला फेकतात. धरणालगत पुणे-पानशेत रस्ता आहे. रस्ता व धरणालगतच्या रिकाम्या जागेवर हातगाड्या उभ्या राहतात. पर्यटक ते पदार्थ घेऊन त्याचा कचरा तेथेच टाकतात. तोच कचरा पाण्यात जातो. काही पर्यटक तर दुचाकी धरणाच्या पाण्यात जाऊन धुतात. परिसरातील जनावरेही अनेकदा पाण्यात डुंबत असतात. काही ग्रामस्थ महिलाही कपडे धुण्यासाठी धरणावर येत असतात.

पर्यटनस्थळांची स्वच्छता हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय. विशेषतः पावसाळ्यात पर्यटन स्थळांवरील अस्वच्छता इतकी पराकोटीला पोहोचते, की नाव नको ! परदेशात रस्त्यांवर थुंकले, तरी दंड होतो, असे कौतुकाने सांगणारी जनता, खडकवासल्यावर मात्र कचराकुंडी शोधत नाही...! बसल्याजागेवर कचरा ठेवून रिकामे होते...!! असे का घडते? काय करता येईल हे रोखण्यासाठी ?

6 comments:

 1. friend said...
   

  punished strickly thoese people who are washing the vechiles,n shoot the garbages,
  altaf.................pune.

 2. Ramesh Sonsale said...
   

  One permant team required for control this type of actiity. Punish ammount will be use for care take activity. --Ramesh Sonsale --Pune

 3. Anonymous said...
   

  I don't think this will change by the time everyone understands his/her own duties. including police/Public.

 4. Anonymous said...
   

  यासाठी एक वेगळी टीम पाहिजे. कोण म्हणतं की रोजगाराची कमी आहे. लोकल तरुणाना याद्वारे रोजगार मिळू शकतो. यासाठी काही प्राइवेट कंपनी स्पोंनसर्शिप देऊ शकतात. अश्या टीमला दंडाची पावती फाडण्याची मुभा असावी पण दंड कोर्टात अथवा पोलिस स्टेशनला जाउन भरावा. तसेच दंड भरावयाचा नसल्यास तिथेच ती जागा त्या माणसाकडून साफ करून घ्यावी.
  वाहने खाली पाण्यापर्यंत पोचुनच दिली नाही पाहिजेत. रस्ता बंद केला पाहिजे.

 5. KARYKARTA said...
   

  TYA PRISSARTIL BLUBIRD INDIA, VENKATESHWARA, LAVASA, NANED CITY, DSK VISHWA, DIAT YANI SWACHATECHI JABABDARI GHYAVI

 6. Anonymous said...
   

  this will always happen ....because its going on year by year.....

  no one will stop this...even if we make hundreds of complaints...post comments on this...this will only expose our frustration....

  We are in India....

Post a Comment