

अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत. वाहने घसरून पडत आहेत अन् खड्ड्यातही पडत आहेत. त्यात भर पडली आहे बांधकामाच्या राडारोड्यामुळे झालेल्या चिखलाची आणि भरपावसात डांबरीकरण करण्याच्या हट्टापायी पसरणाऱ्या खडीची. शहरभर ही स्थिती असून त्यामुळे वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.
दरम्यान, बांधकामाच्या राडारोड्यामुळे वाहने पडत असल्याने एका बांधकाम व्यावसायिकाने तो रस्ताच बंद करण्याचा प्रकार एरंडवण्यात झाला आहे.पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे महापालिकेला पूर्ण करता आली नाहीत. पावसामुळे आता रस्त्यांवर चिखल होऊ लागला आहे. त्यामुळे वाहन घसरण्याच्या घटना शहराच्या विविध भागांत होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहने थेट खड्ड्यात जाण्याच्या घटनाही झाल्या आहेत. ज्या ठिकाणी खोदाई पूर्ण झाली आहे, तेथे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. तेथील माती रस्त्यावर पसरत आहे. पुणे-मुंबई रस्ता, गणेशखिंड रस्ता, शास्त्री रस्ता, बाणेर रस्ता, शिवाजी रस्ता या प्रमुख रस्त्यांसह काही छोटे रस्ते खोदाईमुळे चिखलमय झाले आहेत. नेहरू रस्त्यावर रुंदीकरणाची कारवाई झाल्यावर तेथे बांधकामाचा राडारोडा रस्त्यालगतच पडून आहे. पावसामुळे माती रस्त्यावर येत आहे. बांधकामाचा राडारोडा डंपरमधून नेताना आधी माती रस्त्यांवर पडत होती. आता या गाड्यांमधून चिखलाचे गोळे रस्त्यांवर पडत आहेत. वाहनचालकांनी हा गोळा चुकवला नाही, तर त्यावरून गाड्या उडत आहेत किंवा घसरत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर डांबरीकरण करण्याची घाई पालिकेने सुरू केल्याने रस्त्यावर खडी पसरल्याचे प्रकार झाले. "पूना बेकरी'जवळ पावसाचे साचलेले पाणी खराट्याने बाजूला करून डांबरीकरण करण्यात येत असताना त्याचे छायाचित्र "सकाळ'च्या छायाचित्रकाराने घेताच हे काम गुंडाळण्यात आले. दांडेकर पुलाजवळही पावसात "मास्टेक ऍस्फाल्ट' करण्यात येत होते. त्याबाबत नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या.
पावसाळा सुरू होऊनही रस्त्याची कामे पूर्ण होत नसल्याचे चित्र दरवर्षीचे..मात्र, यंदा ऐन पावसाळ्यातही काम सुरू ठेवण्याचा मोठेपणा महापालिकेने केला आहे. यात पालिकेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. आपल्याला काय वाटते याविषयी...? या ब्लॉगवर आम्हाला जरूर लिहा..
पुणे महानगर पालिकेचे हे आता दर वर्षीचे झाले आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षी पण महा नगर पालिकेला पाऊस जवळ आल्यावर कामाचा उत आला आहे. पूर्ण वर्षभर हे लोक झोपा काढतात आणि मग मे महिना आला की याना जाग येते आणि मग हा रस्ता खोद, तो रस्ता खोद हे चालू होते. रस्त्याचे काम पण जर आपण बघितले तर ते खूप निकृष्ट दर्जाचे सगळीकडे दिसते. पावसाळ्यात १ का महिन्यातच सगळे रस्ते उखाडले जातात. ज्या वेळी रस्ता करणारा कांट्रॅक्ट र रस्त्यावर खडी टाकतो तो फक्ता एवढी काळजी घेतो की त्या खडी मधले दगड जे आहेत ते फक्त नावाला डांबरीने चिकटले पाहिजेत. . मग काय दुसर्या दिवशी त्या रस्त्यावरून १० गाड्या गेल्या की त्याची सगळी खडी निघायला सुरवात.
हजार वेळा या विषयावर बोलले गेले आहे. पेपर मधे पण आलेले आहे. तरी पण या पुण्यात काहीही सुधारणा होणार नाही आहे.. ही जी भ्रष्टाचाराची किड लागलेली आहे ना पुणे म न पा ला ती काही आशी सहजा सहजी निघणार नाही आहे आसे वाटत आहे.
लोको हो तुमचे काय मत आहे याच्यावर??