व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

मराठीपणासाठी नेमके कोण कृतीशील...?

मराठीपणासाठी पेटून उठा, अशी हाक शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिली.

त्यातले राजकारण बाजूला ठेवले, तरी मातृभाषेचा मुद्दा अत्यंत कळीचा आहे आणि तो सर्वच स्तरात कसा मान्य होतो, याचे उदाहरण रविवारी पुण्यात दिसले. निमित्त होते, वळू या मराठी चित्रपटाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त पडद्यामागच्या कलाकारांच्या सत्काराचे.


या सोहळ्याला उपस्थित होते, दोन दिग्गज अभिनेते. नाना पाटेकर आणि नसिरुद्दीन शाह.


"आपण ज्या भाषेत बोलतो आणि जी भाषा आपल्या रक्तात भिनली आहे, त्या भाषेची नाळ तोडता कामा नये,'' असं रोखठोक मत शाह यांनी इथं मांडलं. त्यांचं समर्थन करताना "ज्या भाषेत आपण स्वप्न पाहतो, तीच आपल्या चित्रपटाची भाषा असली पाहिजे,''असं नाना म्हणाले. इतकंच नाही, तर मराठीत कामासाठी मानधनाची अपेक्षासुद्धा नाही, असं नाना यांनी खुलेपणानं सांगितलं.


दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांना दोघांनीही शुभेच्छा दिल्या. शिवाय, "नाना आणि मी, आम्ही अजून चित्रपटामध्ये एकत्र काम केले नाही.

ही उणीव उमेशने दूर करावी; पण त्याने मराठी चित्रपट केलाच पाहिजे," असं आग्रहाचं आवाहन शाह यांनी केलं.


मराठीचा आणि मराठीपणाचा मुद्दा घेऊन अडिच तास सभा गाजविणारे राज ठाकरे आणि श्रेष्ठ मराठी चित्रपट चालवून दाखवून दिग्गजांची शाबासकी मिळविणारी वळूची टीम यापैकी नेमके कोण कृतीशील ?

तुम्हाला काय वाटते ?

21 comments:

  1. Anonymous said...
     

    Aashi tulna karne bare nave, prateyek jan aapalya aaplya jaagi shobhun disto.

    Maazi mate -
    Raj ne marathi bolne kiva na-bolne aasa mudda ghetla naahi tar marathi jeevanaver par-prantiyancha atikraman ha mudda dharla aahe.
    Nasiruddin la vichara ki to marathi-ch bolto kay, kiti marathi movies kelyat, marathi saathi kay yog-daan kele? Nana ne aamap paisa kamavun ghetle (hindi movies) aani aata marathi cha pulka aala aahe.
    Aaj kaal Raj chaya naava-khali sagale aaplya aaplya bhakrya bhajun ghet aahet.
    Raj ha tyachya matan-shi thaam aahe hey spastha aahe aani to Marathi janate saathi rastya-ver utarla aahe. Hya purvi shiv-sene ne marathi cha naara anek vela laavla pan to maryadit hota kaaran dusra vichaar VOTERS cha hota.
    Raj jey karat aahe tey raj-karan naahi tar tey Samaj-Karan aahe.

  2. koustubh kulkarni said...
     

    अशी तुलना करण्याची गरजच नाही. दोन्ही गोष्टी एकमेकांना
    पूरक आहेत. राज म्हणाला की मराठी चित्रपट बघा. वळू सारखे
    दर्जेदार चित्रपट आल्याने आता टीकाकार अस ही म्हणणार नाहीत
    की चांगले चित्रपट बनतच नाहीत. किंबहूना "बघूया तरी" अस म्हणून
    वळू बघितलेले बरेच आहेत. वातावरण ढ"वळू"न निघाल आहे राज च्या भाषणामुळे,
    त्यामुळे लोक प्रेरित होऊन आपल्या परीने आपल्या क्शेत्रात मराठीसाठी
    योगदान देतील.
    "yahoo" मराठी मधे उपलब्ध नाही. सकाळ ने हा मुद्दा उचलून धरावा ही
    विनंती.

  3. Anonymous said...
     

    मराठी पण नुसतं चित्रपटापूरतं मर्यादित रहायला नाही पाहिजे. प्रत्येकाने हे ठरवले पाहिजे की मराठी ला आणि मराठी माणसाला प्राध्यान्य देइन. आज मला काही कुटुंब माहित आहेत ज्यांची मातृभाषा मराठी आहे पण स्वतः च्या मुलांशी बोलताना ते इंग्लिश मधे बोलतात कारण त्यांची मुले कान्वेंट मधे शिकतात. आज किती लोक मराठी भाषेमधे सही करतात? या गोष्टी छोट्या असल्या तरी महत्वाच्या आहेत. चित्रपट चांगले निघाले तर मराठी जनता नक्कीच त्याला प्राध्यान्य देतील. आज कित्येक कॉलेज मधे अशी मुलं मुली आहेत ज्याना मराठी लिहिता येत नाही फक्त वाचता येतं म्हणजे शब्द आठवत नाहीत कसे लिहायचे ते.... आणि त्याना त्या गोष्टीची लाज पण वाटत नाही..... मानसिकता पहिली बदलली पाहिजे.

  4. Anonymous said...
     

    We know the facts, add one more:

    - Look at sify.com

    You can see the links for Hindi, Tamil, Telugu, Kannada, Malayam and what not languages. But no Marathi Link, as to this company who think Marathi is same as Hindi. NO and again NO. Marathi is Marathi (Sify Employees and administrators should know this, or dont do business in Maharashtra. The government of Maharashtra and Marathi people should revolt on such sites who mislead people for Hindi is Marathi.)

    - Convent Schools are actually, soft war convert school. They have no pride to teach marathi or any language of INDIA. They are told by their Missionary Funding body and NGOs to treat Marathi/Kannada/Tamil as "THIRD Language" Or "Elective Language"

    - These schools who treat Language of State as "THIRD or Elective Language" should not be allwed in the State. State Stands over school, State Language is First Language and "English is Third Language". We need to do this first.

    - State Language should be compalsary second language. Sanskrit the third language and English is the fourth Language or last language in all educational Institutes in INDIA.

  5. Anonymous said...
     

    MNS should fight for:

    ---------------------
    Hindi - First Language.

    Marathi - Second Language.
    kannada - Second Language.
    Tamil - Second Language.
    Malayam - Second Language.
    Uudu - Second Language.
    Bangali - Second Language.
    Konkani - Second Language.
    Telegu - Second Language.
    Gujarati - Second Language.
    Punjabi - Second Language.
    Kashmiri - Second Language.
    Orisi - Second Language.
    Bhori - Second Language.
    Kutchi - Second Language.
    Marwari - Second Language.

    Sanskrit - Third Language.

    English - Fourth Language.
    ---------------------------------

    Love India, Love Indian Languages!

  6. Anonymous said...
     

    Kuni kitihi krutishil zala tari jo paryant lok krutishil hot nahit to paryant Marathi la changle diwas yenar nahit. Ani Marathi bolnaryanmadhech kiti farak ahe.. Punyatlya lokanna watata ki tyanchi marathi shudh ani bakichyanchi ashudh.. shaharatlya lokanna gavakadchi marathi aikun hasu yeta. Marathi sahitya sudha eka tharavik varga purta mryadit rahila tyacha karan hech ahe. Marathi sahityat kinwa tya kalchya sushikshit Marathi vargaat ashikshit lokanna samavun ghenyachi vrutti kadhich navti. Ani tyanna badalahi avadle nahit. Kalanusar saglyannach badlava lagta. Maaf kara pan marathi chya 'brahmani" karanamulech marathi la waait diwas ale ani yetilahi.. Vishayantarabaddal maafi asavi.

  7. Sampada Ketkar said...
     

    khara sangayache zale tar ''marathipana'' hi ek vrutti zali. Aapan jar marathi bhashe baddal bolat asu tar ti tikavanyasathi Raj sarakha nusta arda orda karun chalanar nahi asa mala vatate karan to marathi community ek thikani aanayacha praytna karato aahe. Tyamule tya vishyavar na bolane bare.Media matra nakki khupkahi karu shakato Marathi bhasha tikavanyasathi. changale chitrapat kahdane ha tyatlach ek bhag aahe......

  8. koustubh kulkarni said...
     

    varil baryach pratisadanmadhe apan ekmekanvar shintode udavanyapalikade kahi kele nahi. he apan ithnach banda karuyat. bramhnanni kay kela, kay kela nahhi, bakichya jatinne kay kela, kay kela nahi ha muddach gaun ahe. Apan kay karu shakato he mahatvacha ahe. ekmekanna poorak tharato ka aapan ?? he mahatvacha ahe. apan dokyatala ekmekanbaddalcha raag-dwesh kadhun taku ani marathi sathi ek-vichar karu. to mhanaje mazya kshetramadhe rahun me marathi sathi kay karu shakato, jyatun mala hi aananda milel. sagale heve-dave gaun ahet. dakhavun deu ki marathi lokanchi tonda 10 vegalya dishanna nastat. te ekatra yeu shaktat ani ekatritpane pudhe jaau shaktat. baap-jadyanchi bhandana tyanchyavarach sopavu. apalya pidhit dwesh nako kuthalyach karanastava.

  9. Anonymous said...
     

    Marathisathi Krutishil Ha Nakki kai ahe? LEKHA aahe Ka Ki Sakal Swatahala tapasun baghat aahe?

    Lekhamadhe keleli Tulana Ekdam Chukichi.
    me Tumhala Ek udaharan Deto.
    Chatrapati Shivarayani jenva Swarajyachi Sthapana keli hoti tenva tyana Sarvata jast trass Zhala to Parakiya Shatrucha nave.
    SWAKIYA shatruncha.
    Hya lekhacha lekhaka Suddha Swakiya Shatru madhe Modato.
    Asalya prakarache Lekh Prassidha karun Sakal la nakki kai Sadhayache ahe?
    Are MARATHI bhashach jar Rahili nahi tar SAKAL paper la koni wahchak tari miele ka?
    Ani Apala paper Konatahi HINDI manusnwachat nahi he dekhil Lakshat thevale pahije.

  10. Anonymous said...
     

    Ultimately the idea is to grab power by telling us that Marathi Manus is in danger or Islam is in danger or Hinduism is in danger or the usual banner of national integration etc. under which congress party has been stealing from the country for last sixty years.

    There was recently a drive in Pune to force shopkeepers to display their signs in Marathi. Pune is one of the worst polluted cities in the world, traffic is a chaos, corrupt police are nowhere to be seen except to collect bribe even as the murders and avenge-murders are happening in the city in broad day-light, the city river has become an open sewer despite spending 200 crores on water treatment. But these crooks want to convince us that the most important issue is whether the signs are in Marathi or English?

    Don't worry non-Maharashtrians. The cops will accept bribe from you in any language. THe pollution will cause lung-cancer and other diseases to people of all languages. Irrespective of the language you speak, you got an equal chance of getting killed on the road because of hopelessly indisciplined traffic.. The river is going to stink just as bad for you and won't be giving it just to Marathi speaking people.

  11. Anonymous said...
     

    आपल्या अधोगातिला आपणच जवाबदार आहोत .... ख़ास करून मुम्बई मध्ये... मराठी माणसाला मराठी मध्येच बोलायची लाज वाटते... ..दोनच उदाहराने देतो ----- १)मी वेटरशी मराठी मध्ये बोलल्यावर मित्र सांगतो तू काही पुण्यात नाहीयेस ..हिन्दी मध्ये बोल ...२) हीरानंदानी मध्ये मराठी बोलल्यावर भय्या लोक बघून हसले. कानाखाली द्याविशी वाटली पं नंतर विचार केला त्याची तरी काय चुक आहे त्याने मराठी कधी ऐकलेच नसेल

    हे दोन प्रसंग खुप बोलके आहेत............... शक्यतो मराठी मध्ये बोला ...अगदी समोरच्याने विनंती केली तर हिन्दी बोला पण राज म्हणतो ते चुकीचे वाटते ...आपण कोनावरही एखादी भाषा बोलण्याची सक्ति करू शकत नाही....आपण बोलले की दूसरे ही बोलतात...एक किव्वा दोन वाक्य हिन्दी किव्वा इंग्रजी मध्ये बोलतील पण तीसरे वाक्य मराठी मध्ये बोलतील....अणि असेच शिकतिल ...व्याकरणाच्या चुकां बद्दल क्षमा असावी

  12. Unknown said...
     

    Charity begins at home!!!
    आज दुर्दैवाने पुण्यात कुठेहि जा,बहुतेक सर्व मराठी माणसे कारण नसतांनासुद्धा हिंदीतच बोलतांना दिसतात.
    गेल्या एक महिन्यात RTO च्या ओफ़िसमध्ये ३ वेळा जायचा प्रसंग आला.आत जातांना स्वागतास उत्सुक सर्व एजंट फ़क्त हिंदीतच विचारणा करत होते कामाबद्दल!
    त्यांना म्हणालो की मराठी भाषा विसरलात का, तेव्हा ओशाळून मराठीत बोलू लागले!
    हाच अनुभव रिक्शावाल्यांबरोबर,डेक्कनवर! काय करणार अशाला राज किंवा उद्धव???
    आपण सर्वांनी कटाक्षाने अमराठी लोकांशीसुद्धा मराठीत बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे व त्यासाठी मुहुर्त शोधण्याची किंवा कुणी पुढा-यानी कानमंत्र द्यायची गरज नाही!
    शुभस्य शिघ्रम!

  13. Anonymous said...
     

    Raj che rajkaran kahe asude pan pratyek marathi mansachya manatli ti gost ahe ,maharastravar , khas karun mumbai var marathi mansacha dabdaba rahnar nahi ,marathich ethe porka honar ahe.yasate sarva marathi mansani apapsatil matbhed visrun. prtyk marahi mansane ekatra yayla pahije.apya netyanchi mansikta badlali paheje,perprantiyankade votbank bghnycha drushtikon badalala paheje,varil muddya karita sarva marhi janteni ekatra yave ,ya karita raj ha neta yogya vatto.tyana amcha pathimba ahe.

  14. Anonymous said...
     

    A Dictionary of Old & Perfect Marathi

    Author: Anne Feldhaus, M. P. Pethe, Madhusudana Parasurama Pethe, Shankar Gopal Tulpule Category: Reference
    Publisher: Oxford Univ Pr
    ISBN-10: 0195126009
    ISBN-13: 9780195126006 Condition: New
    Format: Hardcover
    Publication Year: 2000
    Special Attributes: --

  15. Anonymous said...
     

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वार्ताहाराशी बोलताना मराठीचा आग्रह धरण्याऐवजी हिंदी भाषेचा वापर करतात यावरूनच या सरकारला मराठीबद्दल किती प्रेम आहे हे दिसून येते. बंगालमधील राजकीय नेत्यांचा आपल्या भाषेचा व संस्कृतीचा असलेला अभिमान पाहता महाराष्ट्रीय नेत्यांची लाचारी व स्वाभिमानशुन्यता पाहून लाज वाटते. दुकानावरील पाट्यावर इतर भाषेबरोबर मराठी भाषेचा वापर अनिर्वाय करणे एवढी साधी बाबही कठोरपणे आजपर्यंत अंमलात आणू शकलो याची सरकारला किंचितही शरम वाटत नाही. दिल्लीश्र्वरासमोर राजकीय नेत्यानी दाखवलेली लाचारी काही नवीन नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी माननीय यशवंतराव चव्हाणानी महाराष्ट्राच्या अस्मितेकडे दुर्लक्ष करून नेहरू-निष्ठा जास्त महत्वाची मानली होती. मुंबई शहरात सरकारी व खासगी मोकळ्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून झोपड्या उभारणार्‍या उत्तर भारतीयांना अप्रत्यक्षरित्या याच राजकीय नेत्यानी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेते गांधी-नेहरु घराण्याच्या निष्ठेपेक्षा मराठी अस्मितेला प्राधान्य देणार नाहीत तोपर्यंत यात काहीही सुधारणा होणे अशक्य आहे.

  16. Anonymous said...
     

    Congress (I) has routed the culture of Hindusta. Today we read "Sanjay-Manyata resort to Shariat law to save marriage" in news, and the Supreme Court Accepts it in INDIA!

    India need to route Congress Government from all corners of India to save INDIA. Let it known to West that Congress(I) approves & follows 'Shariat law' to get votes, Does not do justice to those killed in Parliment attack, terrorists attack in Mumbai, will sideline INDIA in all global dealings.

    Congress(I) has not defended INDIA against terrorist orginazitions. They talk they are secular, but the fact is 'Shariat Law' in not secular, its blind eye to get votes from minority (now 30%) in INDIA.

  17. Unknown said...
     

    Anonymous of May 7, 2008 12:12 PM
    I agree with your observations fully.It is sickening to see the sycophantic behaviour of all congressmen,who have sold their conscience and all pride to be subservient to the Gandhi family!
    The country is going down the drain in all ways due to congress policy,33 different types of heavy taxes,replacement of Licence Raj by the new "package raj"!
    महाराष्ट्रातले कोंग्रेसचे मंत्री सर्वात भ्याड आहेत व दिल्लीच्या इशा-यांवर नाचत आहेत! हाच का छत्रपती शिवाजींचा प्रांत? कुठे ते आणि कुठे हे?
    सत्ता कांहीहि करून टिकवणे हेच कोंग्रेसचे एकमेव ध्येय आहे हे कर्नाटकामध्ये जनतेला दाखवलेल्या प्रलोभनांद्वारे सिद्ध होत आहे!
    आता जनताच उरल्यासुरल्या मराठीला वाचवू शकेल!

  18. Anonymous said...
     

    महाराष्ट्रीय राजकीय नेत्यांच्या अक्षम्य लाचारीची श्री. राजू परुळेकर यानी झणझणीत भाषेत केलेती चिरफाड वाचण्यकरिता ९ मेचा लोकप्रभा साप्ताहिकाचा अंक सर्व मराठी जनतेने वाचावा अशी माझी विनंती आहे
    मोहन दड्डीकर
    पुणे

  19. Anonymous said...
     

    I think it is important to know the opinions of MArathi speaking people staying other than Pune and Mumbai.One of the reasons of divide among Marathi speaking people is concentration of Marathi liturature at Pune / Mum areas and failure of literary leadership in recognising and ebmracing other regional talent.That is why people from other regions embraced Hindi, thanks to goldan era of old Hindi movies. Second reason is that MArathi people are not phisically fit and they should deliberately put efforts to be fit. Amit Patil

  20. Anonymous said...
     

    Hya Lekhacha LEKHAK Sodun Sarva MARATHI Janata MARATHI SATHI KRUTISHIL aahet.

  21. Anonymous said...
     

    राज ठाकरे!
    हा माणुस निव्वळ एक दहशतवादी आहे. आपण मराठी जनतेने ह्यच्या नादी न लागनच् योग्य ठरेल. ह्या विश्वात कोणताच असा प्रांत नाही जेथे किंवा जेथुन स्थलांतर झाले नाही. आपल्या असल्या वागण्या मुळे बाकी लोकांमधे आपली मराठी जनतेची प्रतिमा खराब होत आहे. आपण "मी भारतीय" च्या जागी फ़क्त "मी मराठी" असा उदो केला तर ते UP/ Bihar च काय तर कोणालाच् योग्य वाटणार नाही. मराठी बांधवांनो खरचं विचार करा, आपल्या अश्या वागण्या मुळे उद्या जर TATA, Reliance, Bajaj आणी हेच काय तर इतर परप्रांतीय/ परराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या मुळ प्रांतात गेल्या तर आपले राज साहेब रोजगार देणार आहेत का?
    आज कितीतरी मराठी मंडळी महाराष्ट्राबाहेर स्थायीक झाली आहे. पर राज्यात तर सोडाच् परदेशात कितीतरी मराठी माणसे आहेत. उद्या जर ह्या सगळ्याच् देशांत असे "राज"कारण सुरु झाले तर?

    नेहेमीच आपल्याला जे हवं आहे फ़क्त तेच् मिळतं असं नाही. आपल्याला जर महाराष्ट्रात औध्योगीकरण हवं असेल तर सोबत ही परप्रांतीय वसाहत पण येणारच, पण सोबत आपल्याही लोकांना रोजगार तर मिळतोच आहे ना?

    निखिल कुलकर्णी, नाशिक

Post a Comment