व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

फ्लेक्‍स बोर्डवर बंदीसाठी लवकरच कायदा

राज्य शासनाचा विचार; मंत्रिमंडळात मुद्दा मांडणार

वाढदिवस असो की कोठे नियुक्ती असो...निवडणुकीत विजयी होवो किंवा इतर कोणत्याही प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्‍स बोर्डावर आता राज्यभरात संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक होर्डिंग्जच्या जागा वगळता इतरत्र फ्लेक्‍स बोर्ड लावण्यावर बंदी आणण्याचा कायदाच राज्य शासन करण्याच्या विचारात असल्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले.

जेथे जागा दिसेल तेथे सर्रासपणे फ्लेक्‍स लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा व्हावा, याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण विषय मांडणार असल्याचे ते म्हणाले. "अनेकदा गुंडांसोबत आमचेही फोटो या फ्लेक्‍स बोर्डवर लावले जातात. हे बोर्ड लावल्यावर काढण्याची तसदी कोणी घेत नाहीत, ही बाब बरोबर नाही. ज्यांना खरोखरीच शुभेच्छा द्यायच्या असतील, त्यांनी अधिकृत होर्डिंग्जवरच जाहिराती कराव्यात,' असे ते म्हणाले.

जिल्ह्यात पोलिस दलाच्या कामात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. फक्त अधिकाऱ्यांकडून प्रभावी काम व्हावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामती शहरातील रिंग रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका चौकामध्ये एका कुत्र्याच्या वाढदिवसाचा फ्लेक्‍स बोर्ड लावण्यात आला होता. फ्लेक्‍स बोर्डच्या स्वरूपातून वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या नेत्यांना आणि पुढाऱ्यांना ही एकप्रकारची चपराक होती. मात्र, त्याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करून नेत्यांनी आपली जाहरातबाजी चालूच ठेवली. त्या पार्श्‍वभूमीवर या फ्लेक्‍स बोर्डवर बंदी आणणारा कायदा अस्तित्वात येण्याची गरज आहे. जेणेकरून शहरातील रस्त आणि चौक फ्लेक्‍स बोर्डमुक्त होऊन मोकळा श्‍वास घेतील.

2 comments:

 1. Anonymous said...
   

  उशिरा कां होइना पण प्रतिस्पर्ध्याच्या वाढदिवसाचे शुभेच्छाफ़लक बघून किंवा कांही छोट्या गुंडांसमवेत स्वतःचे फ़लक बघून पुण्याच्या पालकमंत्र्याला उपरती झालेली दिसत आहे!
  गेल्या वर्षी यानेच स्वतःचे निरनिराळ्या पोशाखातले कित्येक फ़लक लावले होते कार्यकर्त्यांच्या सौजन्याने!
  यापेक्षा पुढा-यांचे कायमचे पुतळे गल्लीबोळात उभारावे व त्यांच्या वाढदिवसी जनतेने त्यांच्या गळ्यात चप्पलजोड्यांचे हार घालावेत म्हणजे पहाल किती तत्परतेने ते काढले जातील!
  नवीन कायद्याची खरीच गरज आहे कां हाच प्रश्न आहे कारण कुठलीच महानगरपालिका आपले अस्तित्वातले कायदे सक्षमपणे आचरणात आणत नाही!
  असो,कांही का होईना,ही बंदी अत्यावश्यक आहे व आणखी नवा कायदा करायला आता फ़ार तपे जायची पाळी येउ नये अशी अशा करूया!
  आणी तो झालाच तर त्याची अंमलबजावणी करण्याचे धारिष्टपण पाहिजे!
  पालकमंत्र्याला शुभेच्छा!

 2. Anonymous said...
   

  There should be heavy punishment for such people who put there hording for any silly reasons. I would say such hording should be burnt as soon as they put on

Post a Comment