व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

मुळा-मुठा, गोदावरी सर्वाधिक प्रदूषित

देशातील नद्यांची जीवनवाहिनी ही ओळख आता झपाट्याने मागे पडते आहे... गंगा-यमुना-गोदावरी या नद्या आणि ब्रह्मपुत्रा किंवा नर्मदेसारख्या नद्यादेखील त्याला अपवाद नाहीत. ....

धार्मिक, विकासात्मक अशा विविध कारणांच्या आडून माणसाने नद्यांचा श्‍वास गुदमरून टाकल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे ताज्या राष्ट्रीय पाहणी अहवालावरून दिसून आले आहे. देशातील तब्बल 71 नदीपात्रं सर्वांत प्रदूषित असून, त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 16 पात्रांचा समावेश आहे. यातही गोदावरी आणि मुळा-मुठा या नद्या सर्वांत प्रदूषित झाल्याचे हा अहवाल सांगतो. गोदावरी नदी तर महाराष्ट्र व आंध्र या दोन्ही राज्यांत भयानक प्रदूषित झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जपानचे अर्थसाह्य मिळाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील अनेक नद्यांबाबत मात्र, ज्या माणसांनी त्या दूषित केल्या, त्यांनाच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारीही त्वरित हाती घ्यावी लागणार आहे. असे न केल्यास पर्यावरणाला गंभीर धोका उद्‌भवू शकतो, असा स्पष्ट इशारा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. नदीपात्रांच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने निधी दिला होता.

गेली तीन वर्षे अभ्यास करून दिलेल्या या अहवालानुसार देशातील ज्या 71 पैकी 16 प्रदूषित नदीपात्रे महाराष्ट्रात आहेत. काठावरच्या किंवा अगदी पात्रातल्याही बांधकामांनी या नद्यांचा श्‍वास गुदमरतो आहे.

7 comments:

  1. Unknown said...
     

    Jaga madhe kuthehi dharmachya nava khali evde pradushan hot nahi.. hindu dharmat nadyana aai cha darja dilay aajchi condition pahili tar nadya madhe evdhe pradushan karnyacha konalahi right nahi.. nadya madhe or sea madhe ganpati visarjan sathi bandi aanli pahije .. punyat mothe ganpati visarjan karat nahit... jar he thambvale nahit tar tumche so called hajaro dev dekhil udya tumhala vachavnar nahit..

  2. Unknown said...
     

    याच संदर्भात आधीचे ब्लोग विषय व त्यावरचे कोमेंटस खाली दिलेल्या लिंकवर वाचा!
    परिस्थिती "जैसे थे" अशीच आहे!
    http://sakaalblog.blogspot.com/2007/05/river-pollution-reader-writes.html

    http://punepratibimb.blogspot.com/2008/01/blog-post_09.html

    http://punepratibimb.blogspot.com/2008/03/blog-post_28.html

    या विषयावर इतके लिहिले वाचले जाते,नदीवरच्या पूलांवरून नदी पार करतांना सहजपणे लक्षात येते की मुठा नदी प्रत्यक्षात एक छोटा सांडपाण्याचा नाला आहे जिच्यावर अनेक प्रकारची आक्रमणे सतत चालू आहेत!
    तिच्या काठांवरची जागा अपूरी पडते म्हणून तिच्या किना-यांवर भर घालून रस्ते,इमारती उभ्या झाल्या आहेत.इथे न थांबता आता तिच्या पात्रात विकासाच्या नांवाखाली रस्ते बांधण्यात आले आहेत.
    धरणे भरून पाणी सोडले की ते तिच्या पात्रापलिकडच्या भागात पसरून हाहाकार करते,तात्पुरता थोडा आरडाओरडा होतो,पण सर्व कांही "जैसे थे"च रहाते!
    या प्रदुषणाची व आक्रमणांची जबाबदारी PMC वर व सरकारवरच पडते!
    उगाच धर्माला दोष देण्यात अर्थ नाही कारण खरी कारण वेगळीच आहेत!

    कॅप्टन सुभाष भाटे(निवृत्त)

  3. Anonymous said...
     

    hindustana maadhya saarvana chaan chaan lihataa aani bolta yeta. hinduchi baaju kunala gehta yaet naahi. aapan hindu va aapan hindu dharmache aase aple sarkar maanath naahi, kaaran vote kon denaar? aani paise kaase khaata yetil? sarkar chaya fukat vastu upabhogh kaasa kaarta yeyil?

  4. Unknown said...
     

    I am born & brought up in pune.I am a pakka Punekar.Presently I am in US for last 4 months.I have seen some rivers in big cities like Washington,Newyork(Potomac & Hudson)both are free flowing without any pollution.
    I was always thinking how this is possible.I have made some observations.
    1)People here are very disciplined.They dont throw any waste on public property/roads/gardens etc.They pack domestic waste in plastic bags & then put it in thrash.
    2)Chocolet covers are also thrown in dust bins.The cleanliness in all public places is of very high standards that you can not think of throwing any thing as & where you feel like.
    This automaticaly helps keeping the things clean.

  5. Anonymous said...
     

    aaj rasayanik karkhanyantun sodale janare lakho gallon pani aatishay pradushit asate tyamule samudratil maase mrut hot aahet, Sodalya janara vishri dhuramule ozon thar break zala aahe etc. yaavishyi kon bolanar ? Halli Uthasut Hindu Dharmachya navane Khade Fodanyachi chukicha payanda padat aahe. Hindu Dharmacha aabhyas kelyavr lakshat yeil ki Hindu dharma Paryavaran RAKSHAKACH aahe

  6. Anonymous said...
     

    aaj rasayanik karkhanyantun sodale janare lakho gallon pani aatishay pradushit asate tyamule samudratil maase mrut hot aahet, Sodalya janara vishri dhuramule ozon thar break zala aahe etc. yaavishyi kon bolanar ? Halli Uthasut Hindu Dharmachya navane Khade Fodanyachi chukicha payanda padat aahe. Hindu Dharmacha aabhyas kelyavr lakshat yeil ki Hindu dharma Paryavaran RAKSHAKACH aahe

  7. Anonymous said...
     

    aaj rasayanik karkhanyantun sodale janare lakho gallon pani aatishay pradushit asate tyamule samudratil maase mrut hot aahet, Sodalya janara vishri dhuramule ozon thar break zala aahe etc. yaavishyi kon bolanar ? Halli Uthasut Hindu Dharmachya navane Khade Fodanyachi chukicha payanda padat aahe. Hindu Dharmacha aabhyas kelyavr lakshat yeil ki Hindu dharma Paryavaran RAKSHAKACH aahe

Post a Comment