व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सर्वाधिक फटका जैववैविध्याला

मुळा-मुठा नदीतील प्रदूषणाचा सर्वांत मोठा फटका जैववैविध्याला बसला आहे. पन्नास वर्षांपूर्वी नदीपात्र परिसरात चारशे वनस्पती आढळून येत होत्या. ही संख्या आता शंभरपेक्षाही कमी झाली आहे. शंभरावर असलेल्या माशांच्या जाती आता जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर गेल्या पंधरा वर्षांत तीस जातीचे पक्षी गायब झाले आहेत.

नाईक एन्व्हायरन्मेन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट लिमिटेडने केलेल्या पाहणीतील ही माहिती आहे. संस्थेने या दोन नद्यांसह पवना नदीच्या प्रदूषणाची पाहणी गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहेत. यात नदीपरिसरातील जैववैविध्याबाबत प्राणिशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे अभ्यासक करत आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 1954-55 मध्ये नदीपात्र परिसरात विविध प्रकारच्या चारशे वनस्पतींची नोंद झाली होती.

दहा वर्षांपूर्वी ही संख्या दीडशेपर्यत खाली आली होती. नदीतील प्रदूषणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता ही संख्या शंभरपेक्षाही कमी झाली आहे. नदीत 110 प्रकारच्या विविध प्रकारच्या माशांची नोंद झाली होती. 1995 मध्ये ही संख्या 83 झाली होती. 2002पर्यंत यातील 18 जाती नष्ट झाल्या होत्या. गेल्या काही वर्षांत त्याही झपाट्याने कमी झाल्या आहेत. सध्या नदीच्या पाण्यात ऑक्‍सिजन नसल्याने माशांचे जगणे अत्यंत मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे जे मासे आहेत, तेही आता नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

हीच स्थिती पक्ष्यांची आहे. 1983मध्ये झालेल्या पाहणीत 45 पक्ष्यांची नोंद झाली होती. नंतर पंधरा वर्षांच्या कालावधीत ही संख्या 16 पर्यंत कमी झाली आहे. नदीसौंदर्य व पूर्वीप्रमाणेच जैववैविध्य निर्माण करण्यासाठी संस्थेने महापालिकेने सोपविलेला प्रकल्प हाती घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नदीतून बाहेर पडतोय मिथेन वायू

संगम पुलाजवळ नदीत सर्वत्र कचरा, गाळ दिसून येतो. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण तेथे नाहीसे झाल्याने तेथून आता मिथेन हा घातक वायू बाहेर पडू लागला आहे. पाण्यातून बुडबुडे येत असल्याचे तेथे दिसते. तासभर तेथे थांबल्यास दुर्गंधी व या वायूमुळे गुदमरायला होऊन अस्वस्थ वाटू लागते, असे निरीक्षण राहुल मराठे यांनी नोंदविले.

जैववैविध्याचा विकास होण्यासाठी पुरेसे पाणी आवश्‍यक आहे. मात्र, सध्याची नदीची अवस्था जैववैविध्यासाठी घातक आहे. अहवालातील या माहितीवरून नदीतील प्रदूषणाने पर्यावरणाची मोठी हानी झाल्यानंतरही महापालिकेचे याकडे पुरेसे लक्ष नसल्याचे दिसून येते.

3 comments:

 1. Anonymous said...
   

  Pune Municipal Corporation is responsible for this water & river pollution of Mula-Mutha. Most of the solid waste, construction waste, and other waste like sewage water is directly dropped in the river, this is the main reason for the pollution of this river. MPCB has filed a case in court against PMC due to this pollution of river. About 150 MLD waste water is directly left in the Mula-Mutha river, Please take some action against PMC.

 2. Anonymous said...
   

  A number of reasons:

  (1) PMC should be privatised. Government of Maharashtra should get rid of the muncipal corporation.

  (2) PMC should be a regulatory body, private and should be given the right for town planning, roads planning in conjuction with traffic police.

  (3) PMC should then be given a favourable position with law, and should be in the interest of public. All contracts should be competent with private and corrupt contractors. There should be consulting body to evualate and award the contract (Eg Tata Consulting, Tata Engineering, Voltas Consulting).

  (4) Once private, it should have departments within just as a professional bank, industry or organization.

  (5) Environmental and Health Safety not only for humans, but for all living race on air, water and land should be given importance. Cleaning river and penalizing those who polute public facilities should be very very high as in USA, and law should support it!

 3. Anonymous said...
   

  पुण्याच्या ज्या खासदाराच्या कारकिर्दीत यातले बरेचसे नदीप्रदुषण घडले तो पक्षचमचांकडून निर्लज्जपणे स्वतःच्या वाढदिवसाचे हजारो फ़लक लावून पुण्यात वावरत आहे!
  लाज सोडली असल्यामुळे आता कांही महिन्यात याचे आणखी कौतुक केले जाइल!
  PMC ही सरकारचीच संस्था आहे व तिच्यावर सर्व अंकुश फ़क्त राज्यकर्त्यांचा आहे.
  त्यांनीच सर्व ठरवायचे,त्यांनीच मर्जीतल्यांना कंत्राटे द्यायची,सर्व निर्णय त्यांनीच घ्यायचे,चांगले झाले की श्रेय घ्यायला गिधाडांसारख्या झेपा घ्यायच्या,कांही वाईट झाले की मात्र कान डोळे झाकून मौनव्रत धारण करायचे! उत्तरदायित्व हा प्रकारच अस्तित्वात नाही व थोडाफ़ार असेल तर ते स्विकारायची हिंमत नाही!
  मुळामुठा नद्या ज्यांच्यावर सर्व शहर अवलंबून आहे त्यांची नासाडी,अधोपतन वर्षनवर्षे चालू आहे त्यांच्याकडे कानाडोळा केल्यामुळे ही लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे!
  नाईक एन्व्हायरन्मेन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटने सादर केलेली माहिती महिनेनमहिने गुलदस्त्यात झाकून ठेवली होती ती आता थोडीथोडी बाहेर येत आहे!
  पालकमंत्री व महापालिका आयुक्त अशा वेळी मौनव्रतात असतातच!
  जोपर्यंत असे नालायक सरकार व अशा नालायक महानगरपालिका अस्तित्वात आहे तोपर्यंत असेच चालू रहाणार!
  वर लिहिलेल्या एकाने सुचविल्याप्रमाणे सर्व गोष्टी आता प्रायवेट कंपन्याकडे सुपुर्त करून professionally manage करायची वेळ आली आहे!
  नाहीतर तमाशा चालूच रहाणार!

Post a Comment