व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

रिक्षाचालकांच्या बंदने प्रवाशांचे हाल

अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने जाहीर केलेल्या बंद आंदोलनात शुक्रवारी पुण्यातील रिक्षाचालकही सहभागी झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पीएमपीशिवाय पर्याय न उरल्याने पीएमपी गाड्यांना मोठी गर्दी उसळली. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे अतोनात हाल झाले.


या बंदचा सर्वांत जास्त त्रास झाला, तो परगावाहून आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांना. बॅगांची ओझी दुचाकीवरून ने- आण करताना त्यांना कसरत करवी लागत होती.

3 comments:

 1. Anonymous said...
   

  ha soniya cha divas roj yava...ek divas asa nakki yevude ki..apan saglyani rikshawt basnar nahi asa mahina bhar sampa kela tar he majurade rikshawale jage hotil bahutek!! baghuyat

 2. Neo said...
   

  Let Tata Nano come.
  Then we'll see.

 3. Anonymous said...
   

  परगावीहून आल्यावर रिक्शावाल्याने लाम्बच्या रस्याने नेण्याचा अनुभव नेहामीचाच.दहा पैकी अगदी तीन ते चार वेळा बरोबर रस्त्याने रिक्शा वाल्याने घरी नेले आहे, बाकि सर्व वेळा लांबच्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न झाला होता. जवळची भाडी बरेसचे रिक्शावाले नकारतात. खुप कमी रिक्शावाले लोकांशी नीट बोलतात.बरेचसे रिक्षावाले लोक आपल्या रिक्षात बसतात म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतो अश्या गोड गैर समाजात असलेले दिसतात. असं असूनही आपली सेवा सुधारायची सोडून बंद पुकारून लोकांची गैरसोय करायला मात्र कायम तयार.
  परवाच वाचलं की इलेक्ट्रोनिक मीटरच्या विरोधात रिक्शावाल्यानी आंदोलन केलं होतं. जग बदललं तरी आम्ही बदलणार नहीं असा एटीटयुड दिसतो यातून. सर्व रिक्शावाल्याना तो मीटर परवडणार नाही हे एक कारण दिले आहे कदाचित ते कारण खरं असू ही शकेल पण इलेक्ट्रोनिक मीटर आले की मीटरमधे काही अफरातफर करता येणार नहीं हे एक दुसरं "आतलं" कारण असू शकेल ही शक्यता नकारता येत नाही. थोडक्यात काय पुण्याचे रिक्शावाले आपली इमेज सुधारणार नाहीत हे नक्की तर.

Post a Comment