वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता
पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्क्यांपेक्षाही अधिक म्हणजेच पाच लाख एवढी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आहे. मल्टिमीडिया सेक्शनमध्ये आणखी भरपूर काही...असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. रस्त्यांलगत, चौकांलगत नव्हे तर शहरी मध्यवस्त्यांत असलेल्या शाळांच्या परिसरात या प्रश्नाचे गांभीर्य अधिक ठळकपणे जाणवते.
आज पुण्यात शाळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यातील बहुतांश शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. किंबहुना कित्येक रस्त्यांचा विकास शाळांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. तर, बऱ्याच शाळा ऐन चौकात आहेत.वाहतूक कोंडी पुणे शहराला नवीन नसली, तरी अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला शाळाच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे; तर याच वाहतुकीने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणली आहे.
औंधचे शिवाजी विद्यालय, पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रस्त्यालगतचे आणि जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हेलेनाज स्कूल, लक्ष्मी रस्त्यालगतची हुजूरपागा, नूमवि, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, वनिता समाज शाळांमधील विद्यार्थी वेगवान वाहतुकीचा सामना करत आहेत. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार थेट रस्त्यावरच खुले होत असल्याने विद्यार्थ्यांना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.
पाषाण रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. बनसोडे म्हणाले, ""या रस्त्यालगत असलेल्या विद्यापीठ चौकात तीन रस्ते एकत्रित येतात, पर्यायाने मोठी वाहतूक असते. शाळा तसेच कार्यालये एकाच वेळी सुटत असल्याने शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांचा ओघ मोठा असतो. शाळेसमोरील रस्त्यांची विकासकामे या प्रश्नात भरच टाकतात.'' शाळेच्या आवारात प्रवेश मिळत नाही म्हणून मिळेल तेथे (विद्यार्थ्यांची ने-आण करणारी), कधी रस्त्याच्या पलीकडे, तर कधी शाळेपासून दूर अंतरावर उभी केलेली वाहने, ही वाहने गाठण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी उडणारी धांदल, तारेवरची कसरत करत वाहतुकीतून वाट शोधणारे विद्यार्थी असे चित्र शाळांच्या ठिकाणी हमखास पाहायला मिळते.
अहिल्यादेवी प्रशालेच्या पीएमपीएलच्या बस जागेअभावी बालगंधर्व पुलाजवळ तर रेणुका स्वरूप शाळेच्या बस भिकारदास मारुती मंदिराजवळील बस स्थानकाजवळ थांबवाव्या लागतात, असे बसचालकांनी सांगितले. मध्यवस्तीतील शाळा जागेचे निमित्त करून वाहनांना प्रवेश नाकारतात. मात्र या शाळांकडून उपलब्ध जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. ही वाहने शाळा भरणे-सुटण्याआधीच शाळेबाहेरील अरुंद रस्त्यांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शाळांलगतच्या अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी असतात असे त्यामुळे या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करता येत नाहीत. अनेक पालक शाळेच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पाल्यांना सोडण्याबाबत आग्रही असतात त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते, असे रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.
त्यातच शाळा सुटल्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनींचा लोंढा एकदम रस्त्यावर येतो. परिणामी वाहन चालविणे कठीण जातेच, पण वाहतूक कोंडीला दररोजच सामोरे जावे लागते. काही शाळांच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावले आहेत. मात्र, या सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, असे शाळा आणि विद्यार्थी सांगतात. अगदी याउलट तक्रार अन्य वाहनचालक करतात. या वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावरी अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. नादुरुस्त वाहतूक नियंत्रक दिवे, गैरहजर वाहतूक पोलिस, शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील झेब्रा क्रॉसिंगचा अभाव यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहे. काही शाळा वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावतात. मात्र, काही शाळा ही जबाबदारी ढकलू पाहतात. वाहतूक विभागाच्या पातळीवरील अनास्था, शालेय पातळीवरील बेजबाबदारपणा, ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या पातळीवरील अरेरावी आणि पालकांच्या पातळीवरील असहाय्यता या गोष्टी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित जोपासण्यास असमर्थ ठरत आहे.

शाळा आणि शाळांलगतची वाहतूक याबाबत आपल्याला काय वाटते. शालेय विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत आणि नित्याने होणारी वाहतूक कोंडी याला कोणते घटक कारणीभूत आहेत, असे आपल्याला वाटते. शिवाय या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे, असे आपल्याला वाटते?
आपण आपल्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा. एअरटेल मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 56666 वर. इतर मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 54321 या क्रमांकावर.