व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सर्वच रस्त्यांवर "पे ऍन्ड पार्क'

शुल्कात वाढः वाहनतळाच्या वापरास प्रोत्साहन

वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्याबरोबरच पालिकेने उभारलेल्या वाहनतळाचा वापर वाहनचालकांनी करावा, यासाठी शहरातील सर्व रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी "पे ऍण्ड पार्क' योजना लागू करण्याचा निर्णय पुन्हा एकदा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चार चारचाकी वाहनांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा, तर दुचाकी स्वारांकडून दोन रुपये आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.येत्या मंगळवारी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.

महापालिकेने प्रमुख वीस रस्त्यांवर चारचाकी वाहनांसाठी "पे ऍण्ड पार्क'ची योजना सुरू केली आहे. एका तासासाठी चारचाकी वाहनांसाठी पाच रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. परंतु त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार असून, एक तासासाठी पाच ऐवजी दहा रुपये, तर दुचाकीसाठी दोन रुपये शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे.रस्त्यासाठी आणि वाहनतळासाठी महापालिका मोठी रक्कम आकारून जागा ताब्यात घेते. रस्त्यांचे डांबरीकरण, तर वाहनतळाची जागा विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यान या ठिकाणी मॅकेनाईज्ड पार्किंगची सुविधादेखील निर्माण केली आहे. परंतु वाहनचालक वाहनतळाऐवजी रस्त्यावरच गाड्या उभ्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच लाखो रुपये खर्चून महापालिका जागा ताब्यात घेऊन त्यासाठी वाहनतळ उभारते. परंतु त्याचा वापर वाहनचालकांकडून केला जात नाही. त्यामुळे हा खर्च वाया जात असल्याचे लक्षात आले आहे. रस्त्यावरील पार्किंगच्या दरात वाढ केल्यास वाहनचालक वाहनतळाकडे वळतील, या उद्देशाने रस्त्यावरील पार्किंगच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

वाहनचालकांना महापालिकेच्या वाहनतळाकडे वळविण्यासाठी रस्त्यावरील पार्किंगच्या दरांत वाढ, हा पर्याय होऊ शकत नाही. त्यासाठी रस्त्यावर पार्किंग करण्यास मनाई करणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दरात वाढ करण्यासाठी अशाप्रकारचे निमित्त शोधणे, अन्यायकारक आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाविषयी आपल्याला काय वाटते, त्याबाबत नक्की लिहा....

7 comments:

 1. Anonymous said...
   

  very wrong decision

 2. captsubh said...
   

  'पे अँड पार्क' योजना राबवून प्रत्येक चारचाकीवर दर ताशी ५ रुपये मिळायला लागल्यापासून PMC ची हाव ६ महिन्यातच खुप वाढलेली दिसत आहे, म्हणून आता तो दर ताशी १० रुपये करण्याची घाई झालेली दिसत आहे.
  तसेच दोनचाकी वाहनांवर दर ताशी २ रुपये आकारले तर त्यांची प्रचंड संख्या बघून किती माया जमा होइल हे अजमावून आणखी पदरात पाडून घेण्याची घाई झालेली दिसत आहे.
  कुठल्याहि खरेदी वा इतर कामासाठी गेलेली व्यक्ती १ तासात घाईघाईने वाहनापर्यंत येउ शकत नाहीं किंवा तसे करायला शरीर व मनाची कसरत करावी लागते.
  येवढे करूनहि ३-४ मिनिटांनी १ तास उलटून गेला की आणखी १०/२ रुपये मोजायला लागणार व त्यावरून हमखास निष्कारण वादविवाद होणारच.
  २]सर्व प्रकारच्या गाड्यांना रस्त्यांच्या कडेला उभे रहाण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून देणे ही सर्व जगातल्या शहरांची/महापालिकांची जबाबदारी आहे.
  सध्याच्या "कोटी" च्या परवलीच्या भाषेत पुणे महानगरपालिका कोटीकोटी खर्चून अशा थोड्याफ़ार जागा उपलब्ध केल्याबद्दल जनतेवर फ़ार मोठे उपकार केल्यासारखी भाषा करू लागली आहे हे पुणेकरांचे आणखी एक दुर्भाग्य आहे!
  डेक्कन जिमखान्यावरच्या व इतर भागांच्या कुठल्याहि रस्त्यांची व त्याहून पदपथांची दूरावस्था,तेथिल अनेक प्रकारची अतिक्रमणे अनिर्बंध चालूच आहेत त्याबद्दलचे उत्तरदायित्व मात्र PMC कधीच स्विकारत नाही व परिस्थिती सहनशीलतेच्या पलिकडे केव्हाच गेली आहे!
  ३]'पे अँड पार्क' योजना राबवल्यावर ती सरकारी,पोलिस व मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्यांनापण सक्तीची केली कां हे नमुद करण्यात आलेले नाहीं!
  यांच्या लाल फ़ितीच्या दुर्लक्षी कारभारामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे व आजहि यांच्या गाड्या निर्लज्यपणे no parking च्या लक्ष्मी व इतर रस्त्यांवर मनमानीपणे उभ्या दिसतात!
  माझे असे मत आहे की लक्ष्मी रस्त्याच्या एका बाजूला चारचाकी वहानांना गाड्या उभ्या करण्यास ताबडतोब परवानगी द्यायला पाहिजे!त्यांनी कुठलाहि गुन्हा केलेला नाही की partiality करून फ़क्त दोन चाकी गाड्या दोन्ही बाजूला दुतर्फ़ा उभ्या करू द्याव्यात!
  ४]तसेच 'पे अँड पार्क' चे गोळा केलेले पैसे त्या त्या परिसरातील रस्ते,पदपथ,दुभाजक,सुरक्षा कठडे यांच्या सुधारणेसाठीच कारणी लावलेले बिलकुल दिसत नाहीं!
  याचे कारण सरकारी/म्युनिसिपालिटीच्या अजस्त्र अजगरांना फ़क्त पैसे गिळायची संवय लागली आहे!
  ५]जमा झालेल्या सर्व पैशांचा व त्यांचा कसा विनीयोग केला याचा हिशोब कधीच लिहिला जात नाही वा तसेच वर्तमानपत्रात छापला जात नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे!
  सुभाष भाटे

 3. Anonymous said...
   

  Not a good direction "PAY and PARK". PUNE City area (HEART of city - Narayan Peth, Rastha Peth, Kasba Peth, Raviwar Peth, Shaniwar, Mandai, up to Datta-Mandir, this circle should be turned into 3 Wheelers and 2-wheelers and Pedestrians only. NO BUSES ALLOWD, TEMPOS FOR GOODS BETWEEN 9.00 PM to 6 AM ONLY. NO HATH-GADI, NO BHEL GADI, NO-PAW BHAJI, NO - EGG FRY. PMC should change the law. 4-hand-wheelers with fruits, bhel, sellers for cash (ILLEGALS) and other should bot be allowed anywhere in the city area. IF YOU DONT do this, lots of Bangladeshi and Other states illegals are driving AUTOS, TEMPOS, SELLING SERVICES FOR CASH and illegal businesses in PUNE, MUMBAI and Maharashtra. Marathi people should not buy anything for cash. You are encouraging illegals. You are 50% resposible for advocating illegals in PUNE and MAHARASHTRA. SAME WITH AUTOS. Get independent. PLAN and travel. Just that you are earning does not mean you have to spend. LEARN LESSONS FROM USA/UK who are turing against illegal and illegal migrants doing mischief in homeland MAHARASHTRA. JAI MARATHI! JAI RAJ Thakre!

 4. Anonymous said...
   

  Adopt only good things of the West. The bad things as dating, dancing, drinking, drugging, dumping in taking USA/UK and the WEST to a waste. We in Maharashtra have some culture. Dont ruin it. Staying in USA we follow more marathi culture (because we compare with the worse cultures here), become more holy reading more god books than in INDIA. As rightly said by many: "Good things starts from home".

 5. Anonymous said...
   

  How may FM Stations, TV Stations and TV Channels are we going to have? There are so may waves. DONT YOU THINK there will be ill effects of these invisible waves on human brain? ITS A slow killing poison. Research have should more than 66% of honey bees in USA are dead due to cell phone waves. The honey-business people are bankrupt and blame the Cell-phone company for thier bankrupcy in the USA.

  Same will happen with many channels in Cities in INDIA. HUNAN BRAINS WILL ERODE like slow poisioning. ADD TO it NOISE POLUTION.

  CLOSE YOUR EYES, Concentrate. IF you hear a ringing sound in your ears, its like "kida humming sound or tubelight transformer sould with tube is on...kiiiiiii", you have got it! Your brain cells are damaged and your brain is under slow invisible wave attacks


  AND WE TALK OF ENVIRONMENT, and POLUTION and CLEAN AIR!

  STOP POLUTING NATURE! STOP MORE CHANNELS AND MORE RADIOS! USE LESS CELL PHONES!

 6. Anonymous said...
   

  The proposal to raise the pay and park charges is ridiculous.Let the PMC clear the roads of encroachments by hawkers and provide an efficient public transport to save us from the autoriks of the city before implementing the idea.it would drastically reduce the number of personal vehicles on road.

 7. captsubh said...
   

  आजच्या[ता.२३/०४] सकाळमध्ये सुधारित वाढीव दराची "पे ऍण्ड पार्क' योजना लागू झाली अशी बातमी आली आहे!
  हे माहित असतांना कशासाठी ब्लोग वाचकांची प्रतिक्रिया मागविण्याचा "फ़ार्स" केला होता? जनतेच्या मतांचा आदर हल्ल्लीच्या राज्यकर्त्या
  पुढा-यांनी कधीच केला नव्हता!
  हे सगळे फ़ुकटे मंत्रीमहोदय,खासदार,पालकमंत्री,आमदार व बहुतांशी नगरसेवक फ़क्त स्वः किंवा स्वःपक्ष विकासात इतके मग्न आहेत की त्यांना जनतेच्या तक्रारी ऐकून घ्यायला फ़ुरसत कुठे आहे?
  "आम आदमी" चा यांना कैवार आहे,my foot!!!
  फ़क्त जनतेच्या खिशातून शेवटचा रुपयापण काढून घ्या!!! रस्ते व वाहनतळ उभारून PMC कुठलाहि उपकार करत नाही!
  येथे लिहिणे म्हणजे वेळेचा अपव्यय!
  मिस वैशाली भुते,बंद करा ही जनतेची कृर चेष्टा! तसेच ज्या विषयावर नवी मते नोंदविली जातात त्यांना मुक्तपीठ सारखे वर तरी आणा नाहीतर मते archive मध्येच सडून जातील!

Post a Comment