व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

"आयपॉड'च्या साह्याने कॉपीचा घाट

परीक्षा जवळ आली, की अभ्यासाच्या चर्चा रंगू लागतात. मात्र, या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या नियोजनाऐवजी "आयपॉड'च्या साह्याने कॉपी करण्याचे नियोजन घाटत आहे. त्याबाबतच्या सर्व चर्चा शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेसबाहेर घोळक्‍यांमधून ऐकायला मिळत असून, त्यामुळे यंदाची परीक्षा पर्यवेक्षकांचीच परीक्षा घेणारी ठरतेय की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. नव्हे तर, ज्या प्रमाणात लोकांच्या हाती तंत्र पोचत आहे, त्या प्रमाणात तंत्र तपासण्याची (शोधून काढण्याचे) यंत्रणा विकसित होते आहे का, हा प्रश्‍नही या निमित्ताने पुन्हा एका चर्चेत येण्याची शक्‍यता आहे.

"आयपॉड'सारख्या छोट्या उपकरणाच्या साह्याने कॉपी करण्याचे नेमके तंत्र विद्यार्थ्यांना समजले असून, प्रश्‍नानुसार विभागणीचे, नोट्‌स टाइप करण्याचे आणि टाइप झालेला मजकूर डाऊनलोड करण्याचे नियोजन या घोळक्‍यांमध्ये होत आहे. अभ्यासाऐवजी कॉपीच्या नियोजनात गुंतलेले हे विद्यार्थी कॉपी करण्याकरिता आणखी काही तंत्रज्ञान वापरता येते का, याचाही शोध घेत आहेत. एवढेच काय, पण अभ्यासाला लागणारा बहुतांश वेळ "आयपॉड'चे "ऍप्लिकेशन्स' समजून घेण्यातच खर्ची घालत आहेत.

"आयपॉड'च्या खासगी वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक, चार, आठ आणि 80 जीबी मेमरी क्षमतेचे "आयपॉड' सध्या उपलब्ध आहेत. मात्र, चार जीबीच्या "आयपॉड'पासून "स्क्रीन' आणि "स्क्रोलिंग' सिस्टीम सुरू होते. किमान चार जीबी मेमरी क्षमतेमुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मजकूर राहू शकतो. हा "आयपॉड' तो आकाराने दोन बाय दीड इंच इतका लहान आणि वजनाने दहा ग्रॅम इतका हलका आहे. त्यामुळे अगदी सहजरीत्या तो जवळ बाळगता येऊ शकतो. असे हे लहान उपकरण शोधून काढताना पर्यवेक्षकांची कसोटी लागणार असून, त्यासाठी त्यांना विशेष जागरूक राहावे लागणार आहे. वरवरच्या तपासणीतून "आयपॉड' सापडणे वाटते तितके सोपे नसल्याने परीक्षा केंद्रांना "मेटल डिटेक्‍टर'चे साह्य घ्यावे लागेल, असे मतही या वितरकांनी व्यक्त केले आहे.

कॉपी कशी रोखणार?

* पोलिस यंत्रणेचे सहकार्य

* संशय आल्यास संबंधितास कळविण्याचे कॅफे आणि सार्वजनिक टायपिंग सेंटरचालकांना आवाहन

* पोलिस आणि इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत

* परीक्षा केंद्रावर एकापेक्षा अधिक पर्यवेक्षकांचे नियोजन

* विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा

विद्यार्थ्यांचे कॉपी ज्ञान अगाध असते, यात शंका नाही. मात्र, ती रोखण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत ना. ही कॉपीवर कशाप्रकारे आळा घालता येईल. त्यासाठी कोणती यंत्रणा राबविता येईल? आपली मते इथे नक्की व्यक्त करा...

-वैशाली भुते

11 comments:

 1. Anonymous said...
   

  The best way to prevent copy is to check each and every candidate before entering in the examination hall.This may take much time,but should be done .All electronic appliances such as mobile,ipod etc should not be allowed in the exam hallor electronic equipment detectors (with alarm) should be equipped in the concerned premises.

 2. Girish Ranade said...
   

  Change exam system to 'open book' system and allow books and ipods. Questions should be set to make students think. Present questions are of 'copy-paste' type. Many will find 'clever' ways to copy.
  Adopting new system may be a long process but should start somewhere sometime.

 3. Hrishi said...
   

  It is true that students are always smarter in cheating than the examination moderators or the examination boards who are there to stop them from happening. The examination moderators should be given courses on preventing cheating. Also they should make sure that the 3 hours of the examination is like a war zone for each moderator and every student should be stopped from cheating, also punishments should be reduced.

 4. Anonymous said...
   

  If the students are using hitech, the same can be used to stop it.
  (Katyane kata kadhava tase)

  If possible with close circuit tv camera should be installed in each exam hall.
  If camera in each exam hall is not possible then other solution could be that all candidates gather in one single big hall with 10-15 moderators and 3 or 4 cameras (like in shopping malls) and cameras watched by police in other room.

 5. Anonymous said...
   

  If the students are using hitech, the same can be used to stop it.
  (Katyane kata kadhava tase)

  If possible with close circuit tv camera should be installed in each exam hall.
  If camera in each exam hall is not possible then other solution could be that all candidates gather in one single big hall with 10-15 moderators and 3 or 4 cameras (like in shopping malls) and cameras watched by police in other room.

 6. Anonymous said...
   

  Change exam format to open book and let them bring textbooks, ipods whatever then want. Exam questions should be set such that open book or closed book should not make any difference.

  Installing close circuit camera would be a high budget proposal.

 7. Anonymous said...
   

  I think, to change the education system is better option. It is difficult to accept the 'CHANGE' for all people and students but that is the best option if we think for long term. Because you can do check up of all students entering through hall/school main gate. And we can prevent student making copy using any electronic item. But technology is moving ahead.. we will try to stop this thing.. also we will succeed in stoping copy using iPod/mobile. But overall the papers question are set such way that student to copy and paste from their brain to anwser sheet. This will last long to be called as brilliance. Brilliance come when you apply that knowledge. that is why you will see many of 10th or 12th mirit holder students dont succeed in their life. Because once you enter bachlors education you will find that 'application'/'practice' is important. So students who has done mugging are failed in first year of engineerin/medical. Our education system won't accept the dranstic change to open book exam but we can one thing,we can ask board to change policies and recommend paper setter to add question which will make student apply their knowledge. Like give the question with some formula. And leave the upto student how to resolve that problem. or how to answer. This strategy may not be applied for subject like History or language but we can apply this strategy to mathematics and science subject. This way our system can move towards forcing student think practicle/applicable. Education system's policcies should make student SMART and Knowlegeble. Right now, student gets marks depends on how much do you KNOW, not really how to apply it or what to do with that knowledge.

 8. Neo said...
   

  Mr. Ranade,

  If open book system is allowed, how would majority of students in India get passed?
  How would politicians like Lalu Yadav and Sharad Pawar get degrees?
  How would we be able to generate thousands of educated unemployed "degreed" fools who can not even write an application form?
  How would people like Mr. Patangrao Kadam open new money churning institutes that even allow students who have 35% marks?
  Please remember, the education in India is NOT for the benefit of the students. It is for the benefit of all of the above mentioned thugs.
  That is the reason all such educated fools with degrees can not write a single complete correct sentence in English.
  Just see the depth of knowledge and communication of our Teachers. They are there, because they get no other job. Funnily, most of the jobs pay more than a teacher’s job (and a teacher’s job should ideally be “The” most highly paid job). Almost all teachers join the institutes by bribing people like Mr. Kadam. Most of them are selected not because they are intelligent, because they either are from the caste of the ruling party’s majority of ministers, or because they bribe.
  Let these guys pass with copy. In corporate world, we take our revenge. At first glance, we know how this guy might have passed in college. You can see the transition literally: confusion->more confusion->embarrassment when you ask them a question which needs thinking. Then the mark sheets do not matter. Then being of the ruling party’s caste or being a beneficiary of the quota system has no value. The rejection comes swift and back-breaking. The only option then remains is joining an education institute as a teacher.

 9. Sujata said...
   

  बारवीच्या प्रश्नापत्रिका व्याप्ति आणि मर्यादा यातील गुणांच्या विभागणी प्रमाणे नाहीत  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चा माध्यमिक मंडळ Format of Question paper , Scope & Limitations of the Sullabi ( व्याप्ति आणि मर्यादा ) हे पुस्तक प्रकाशित करते. प्रश्नापत्रिका या पुस्ताकतिल अभ्यास्क्रम व गुणांची विभागणी याप्रमाने तयार करावी असा नियम आहे, पण या वर्षिच्या बारावी विज्ञान शाखेच्या Physcis I आणि Physics II या प्रश्नापत्रिका व्याप्ति आणि मर्यादा यातील गुणांच्या विभागनी प्रमाणे नाहीत . उदारहण द्यायाचे झाले तर आज झालेल्या Physics II च्या प्रश्नापत्रिकेत Communitcation या धडयावर 2 गुणांचे प्रश्न असतील असे व्याप्ति आणि मर्यादा या पुस्तकात नमूद केलेले आहे पान आज या धडयावर 4 गुणांचे प्रश्न होते. तसेच उद्यापासून असलेल्या Chemistry, Maths, Biology ,Electronics, etc. या विषयात सुद्धा असेच घडू शकते. तरी मी सकाळ ला विनंती करते की यावर अजुन संशोधन करून लेख सदर करावा.

 10. MOHAN DADDIKAR said...
   

  कायदे कितीही कडक केले तरी जोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत नाहीत तोपर्यंत ते कायदे निष्फळ ठरतात. परिक्षेच्या वेळी होणार्‍या कापीसारख्या गैरप्रकाराना आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने भरारी पथकाची स्थापना केली आहे. कसलीही पूर्वसूचना न देता परिक्षाकेंद्राना भेट देवून तेथे काही गैरप्रकार आढळून आल्यास संबधित परीक्षार्थी व पर्यवेक्षक यांच्यावर तातडीने कायदेशीर करण्याचे अधिकार या पथकातील अधिकार्‍याना दिले आहेत.दोन-तीन वर्षापूर्वी या पथकातील एक अधिकारी अचानक तपासणी करण्याकरिता पँढरपूर येथील परीक्षाकेंद्राकडे गेला. पण त्याने इतके मद्यपान केले होते की, शाळेच्या फाटकाजवळ येताच त्याचा तोल जावू लागला व परीक्षाकेंद्र कोठे आहे हेच त्याला समजेना. काही लोकानी त्याला उचलून शाळेत आणून सोडले. ग्रामीण भागात तर काही केंद्रात पर्यवेक्षकच असे गैरप्रकार करण्यास विद्यार्थ्याना मदत करतात. अशा परीस्थीतीत केवळ कायदे करण्याने असे गैरप्रकार थांबणार नाहीत.
  मोहन दड्डीकर,
  पुणे

 11. Anonymous said...
   

  ups sorry delete plz [url=http://duhum.com].[/url]

Post a Comment