व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

ग्राहकराजा जागा झाला... "एमआरपी' पाहू लागला!

किरणा मालाचे दुकान असो की झगमगणारा "मॉल'... तेथून खरेदी करताना वस्तूंवरील "कमाल किरकोळ किंमत' (एमआरपी) पाहा; अन्यथा दहा रुपयांच्या वस्तूंसाठी 15 रुपये मोजल्याचे लक्षात आल्यावर पश्‍चात्तापाची वेळ येईल!

""एमआरपी' न पाहणारे जास्त' ही बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांनी दूरध्वनी करून "एमआरपी' न पाहताच केलेल्या खरेदीमुळे फसवणूक कशी झाली, याची माहिती दिली. काहींनी नावे सांगितली, तर काहींनी नावे प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. यातून मनोरंजक माहितीही पुढे आली आहे.

एका मोठ्या कंपनीच्या मॉलच्या आकर्षणातून तेथे गेलेल्या कुटुंबाने वस्तूंची खरेदी केली. घरी येऊन बिलाची पावती व "एमआरपी'ची पडताळणी केल्यावर त्यात मोठा फरक आढळला. त्यातील एक उदाहरण म्हणजे, "एमआरपी' 17 रुपये असलेल्या केकसाठी त्यांना 24 रुपये मोजावे लागले. अन्य एका मॉलमध्ये शंभर ग्रॅम बदामासाठी 52 रुपये, तर दोनशे ग्रॅम बदामासाठी 104 रुपयांऐवजी 219 रुपये मोजावे लागतात. जादा किमतीचे लेबल लावल्यामुळे ही चूक झाली असली, तरी लेबलवरील सांकेतिक क्रमांकामुळे ही चूक ठरत नाही. खरेदी करताना हे लक्षात आले, तरी सांकेतिक क्रमांकानुसार संगणक किंमत ठरवतो. त्यामुळे मॉलमधील कर्मचाऱ्यांनाही दुरुस्ती करण्यासाठी आधी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते.

एक वाचक पी. टी. काळे यांनी आज बातमी वाचून मॉलमधून खरेदी केलेले सामान व किमतीची पडताळणी केली. त्यात, 43 ग्रॅमच्या "सूप' पावडर पाकिटासाठी त्यांनी 81 रुपये मोजले होते. प्रत्यक्ष त्यावरील किंमत आहे 27 रुपये असल्याचे आढळले. शिवाय या पावडरचे प्रत्यक्षात वजन 15 ग्रॅम भरले. बहुतेक वस्तूंच्या किमतीत त्यांना हा फरक आढळला. काळे यांनी या मॉलमधून कपडे खरेदीही केली होती. 36 मापाचे लेबल असलेली पॅंट त्यांनी घेतली. मात्र, ही पॅंट 30 मापाची निघाली, असे त्यांनी सांगितले. जादा किंमत आकारणी व कपडे खरेदीतील गोंधळाबद्दल त्यांनी आज संबंधित मॉलकडे तक्रार केली. "या प्रकरणाची वाच्यता कोठेही करू नका; आमचा प्रतिनिधी तुमच्याकडे येईल,' असे त्यांना सांगण्यात आले.

ग्राहकांचे मॉलविषयक अनुभव ऐकूण ''नाव मोठं लक्षण खोटं'' या म्हणीची सत्यता पटते. आपलेही असे काही अनुभव असतीलच ना...असतील तर आम्हाला नक्की कळवा...

8 comments:

  1. Anonymous said...
     

    majority shop keepers stick their own label on the goods particularly,those who refill the goods in a different packs.such shops are in majority. utensils cloth and similar shop keepers also do the same thing. how to save our exploitation from such shopping??

  2. Anonymous said...
     

    आज काल कामाचा ताण जास्त आणि लोकांकडे वेळ कमी. नवरा व बायको दोघाना काम करणे भाग आहे कारण महागाई. त्यामुळे मॉल मधे जाउन एका वेळेस साधारण १५ दिवसाची अथवा महिन्याची खरेदी बरेच लोक करतात. मॉलच्या क्रेझ मुळे गर्दी पण खुप असते. त्यात साधारण ३० ते ३५ प्रकारच्या गोष्टी घेउन बिल करताना प्रत्येक गोष्टीच्या MRP कड़े लक्ष ठेवेणे तसं अवघड आहे. मागे रांग लागलेली असते. त्यामुळे मॉल नी अश्या प्रकारच्या चूका खरेदीच्या नंतर ३ दिवसात सुधारल्या पाहिजेत. प्रत्येकाने घरी जाउन खरेदी केलेल्या प्रत्येक गोष्टीची किम्मत बिलाबरोबर तपासली पाहिजे. बरेच लोक दुकानात तर नाहीच नाही पण घरी गेल्यावर सुद्धा बिल बघतच नाहीत.बरेच ठिकाणी तर MRP प्राईस वर स्वतः चा प्राईस टेग लावलेला दिसतो.

  3. Unknown said...
     

    Can any one explain why hotels charge more than MRP for softdrinks? Once I had long argument with one of the well known hotel in Pune. Some hotels charge 10 to 15 rs more than MRP.

  4. Unknown said...
     

    जितका मोठा मॉल,तितकी फ़सवायची शक्यता जास्त,पण हल्ली ही मॉलसंस्कृतीच फ़ोफ़ावत चालली आहे,व कुणाला MRP बघायला वेळ नाही त्याचा फ़ायदा घेतला गेला नाही तरच नवल!
    किंमत तसेच वजनाच्या बाबतीत अतिशय फ़सलेल्या श्री.काळे यांनी तक्रार केल्यावर मॉलमालकाने "या प्रकरणाची वाच्यता कोठेही करू नका" अशीच विनंती केली व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला!
    आपल्याकडे weights & measures वगैरे खाती सक्रीय नसतात व जे थोडेफ़ार तपासतात ते पकडलेल्या उत्पादक व दुकानदार यांच्याकडून "खाण्याकरता" व त्यांना सोडून देण्याकरता!
    तरीहि सकाळने या प्रकरणाची वाच्यता केल्याबद्दल धन्यवाद! आता कांही दिवस/महिने तरी ग्राहकराजा MRP तपासून बघेल व मॉलमालक फ़सविण्याची प्रवृत्ती काबूत ठेवतील!

  5. Anonymous said...
     

    Big Bazaars are the most fraud of them all. They sell some gold plating bangles and give one on one free. Say they have 1 year warranty on plating, which goes away in 2 months of use. Then they will hesitate and after a long exchange of words give one replacement and state that that is the final replacement they can give. That one proves bad in another 1 month, you go there and then they say "You are bad user" we cant change it any more. The complaint to shop owner did not prove anything. We decide not to buy from them anymore.

  6. Anonymous said...
     

    Well, I have a solution to this problem for the comment by the last user and for the MRP problem as well. Use a suit and tie and go there when there is large crowd.. probably on a sunday evening.. Make a big tamasha in front of people.. that would solve it once and for all.. Security hesitates to throw people out who wear a suit and tie (we are still in the servant mentality, remember?) But remember, your voice should be a high pitched (so that people on road can hear you too) and you should look genuinely angry.

  7. Anonymous said...
     

    This things happened in Australia as well there are no MRPs here but the manufacturer's bar code does work as MRP. But this things happen when these things are on special price,e.g. every week there are some products on special price to attract consumers and if you never look at catalouge price some time computer does mistakes(?) and you pay normal price

  8. Anonymous said...
     

    lok ekhadya limbavalishi hujjat ghalatil...... bavasathi.... v quality sathi..... pan mothya mol madhun kharedi karatana matra dole ughade thevale jat nahit..... gragak rajane jage asanecha mahatwache aahe..... price tag dukandaracha aahe.... ki company cha he tapasun pahayala have.... kadhi kahi chuk aadhalyas rozachya dukandarala samajavane sope jate.... tohi girhaik tikavanyasathi lagecha chuka manya karato... pan mol madhye ase hot nahi....

Post a Comment