व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

देसाईविषयी पोलिसांकडून कोणतीही स्पष्ट माहिती नाही

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स'चा (आयएसआय) एजंट सईद अहमद महंमद देसाई याच्याविषयी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. त्याला पाकिस्तानला परत पाठविण्यासंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याच्या अर्जाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

देसाई काल सकाळी सहकारनगर पोलिस ठाण्यातून पळून गेला. त्याला पाकिस्तानला पाठविण्यासंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशाला स्थगिती मागणारा अर्ज पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे केला आहे. त्यावर सुनावणी होती. त्याला हजर करण्याचा आदेश काल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. हयातनगरकर यांनी दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस न्यायालयात काय सांगणार, याकडे लक्ष लागले होते. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून कागदपत्रे आली नाहीत; सरकारी वकिलांचे निधन झाल्याने सरकारी वकील कामात सहभागी होणार नसल्याने सुनावणी पुढे घ्यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. तो फरारी झाला का? हजर का केले नाही, याविषयी कोणताच अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला नसल्याचे देसाईचे वकील ऍड. विद्याधर कोशे यांनी सांगितले.

6 comments:

  1. Anonymous said...
     

    shame. What else can be said. If this is how dangerous criminals particularly those held on charge of espionage can hoodwink the police easily, just imagine the situation of the law and order in our city. Corruption besieged police department supported by politicians have made life of common people terrible.

    Ashok Kulkarini

  2. Unknown said...
     

    जेव्हा देसाई हा पाकिस्तानी गुप्तहेर पोलिस कस्टडीत होता तेव्हासुद्धा आपले सरकार व गृहमंत्री हतबलपणे गप्प बसले होते,तेव्हा यांच्या सौजन्याने तो पळून गेल्यावर आता पोलिसांकडून कुठल्या स्पष्टीकरणाची अपेक्षा करता येणार?

  3. Unknown said...
     

    सरकारच्या वतीने वक्तव्ये मोठी,पण प्रत्यक्षात कृती शून्य याचे मुर्तीमंत्र उदाहरण म्हणजे राष्ट्रपतींचे कालचे भाषण की दहशतवाद्यांना व भ्रष्टाचाराला थारा देणार नाही!
    अफ़झलसारख्या दहशतवाद्याला फ़ाशीशिक्षा देणे नाही किंवा देसाईला पळू जाउ देणे तसेच किरण बेदींसारख्या किंवा टी.चंद्रशेखरांसारख्या कार्यक्षम व प्रामाणिक ज्येष्ठ पोलिस/सनदी अधिका-यांवर राजिनामा देण्याची पाळी आणणे व ते लगेच स्विकारणे यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकेल?

  4. Anonymous said...
     

    'Public memory is short ' या म्हणीचा पोलिस व राज्यकर्ते फ़ायदा व आधार घेणार व 'Time is the best healer' म्हणत जनता हे प्रकरण विसरण्याचा प्रयत्न करणार, तोपर्यंत दूस-या प्रकारचा " टाईम बोंम्ब " नियोजित ठिकाणी देसाईकरवी फ़ुटणार!
    पुण्याच्या खासदाराला याच्याशी कांही देणेघेणे नसल्यामुळे तो सकाळ व इतर वर्तमानपत्रात जवाहरलाल नेहरू योजनेसाठी त्याने किती शेकडो कोटी रूपये केंद्र सरकारकडून आणले हे जनतेला कळण्याकरता त्याच्या चमच्यानी दिलेल्या जाहिराती बघून खुष होणार व त्याच्या साथीदारांसमवेत बसून त्यातले किती कोटी रुपये स्वतःच्या आणि पक्षाच्या झोळीत टाकता येइल याची गणती करणार!
    हे सर्व पैसे सरकारने जनतेच्याकडून कररूपी जमा केलेले असले तरी कोंग्रेस सरकार कै.पं.नेहरूंच्या नावे आपल्या मर्जीतल्या राज्यांवर मोठे उपकार केल्यासारखे ते वाटत आहे व त्यात प्रसिद्धी मिळवून खासदार आपली पोळी व्यवस्थित भाजून घेत आहे!

  5. Anonymous said...
     

    आता काय बोलावे?
    देसाई सारखी लोके जर कस्टडीतुन पळुन जाऊ लागली तर आता कोणत्याही प्रकारची पोलिस सर्वेक्षणे करु नयेत. काय आणि कसली पोलिस व्यवस्था शिल्लक राहिली आहे हे इथेच सिद्ध होते.
    का या देसाईने पुढ्च्या इलेक्शनला एवढि-एवढि मतं मिळवुन देतो हा मॅसेज पास केला होता कोण जाणे....

    maharashtramajha.blogspot.com

  6. Anonymous said...
     

    aEvery animal has right to live as equally as humans. But look what we have done turning jungles into concrete.

    Poor animals have no where to go.

    Its a Shame.

Post a Comment