व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

आयएसआय' हस्तक सईद देसाई पळाला

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून शिक्षा भोगलेला सईद अहमद महंमद देसाई (वय 50) आज सकाळी सहकारनगर पोलिस ठाण्यातून पळून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र खाते, पोलिस महासंचालक व राज्यात सर्वत्र देसाई पळाल्याचे पोलिसांनी कळविले आहे. मात्र, "देसाई पोलिसांच्या ताब्यात नव्हता. न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही फक्त त्याची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळेच तो पळाल्याचा गुन्हा नव्हे तर, बेपत्ता झाला आहे, अशी नोंद करण्यात आली आहे', असे अतिरिक्त आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा "आयएसआय'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून देसाईला न्यायालयाने सात वर्षे व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तो आठ वर्षे चार महिने येरवडा तुरुंगात कच्चा कैदी म्हणून राहिला होता. त्यामुळे गेल्या वर्षी 26 ऑक्‍टोबरला न्यायालयाने त्याची सुटका केली होती. पाकिस्तानात परत पाठविण्याची पोलिसांनी व्यवस्था करावी. तोपर्यंत त्याला ताब्यात ठेवावे, असा न्यायालयाने त्या वेळी आदेश दिला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून देसाई सहकारनगर पोलिस ठाण्यात वरच्या मजल्यावरील एका खोलीत मुक्कामाला होता. नेहमीप्रमाणे सकाळी तो सहा वाजता झोपेतून उठला. चहा घेण्यासाठी तो खाली उतरला होता. बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तो न सापडल्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. अखेर सकाळी अकराच्या सुमारास देसाई बेपत्ता झाल्याची नोंद सहकारनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

'आयएसआय' हस्तकाने अशाप्रकारे पळून जाणे, हे देशाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, याची कल्पना कदाचित पोलिसांना नसावी. अन्‌ देसाई पळाल्याची पोलिसांनी झटकलेली जबाबदार गुन्हेगारांच्या पथ्यावर पडू शकते, याचाही विचार झालेला दिसत नाही. अशा अवस्थेत संबंधित पोलिसांविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे, असे आपल्याला वाटते.

15 comments:

 1. Anonymous said...
   

  आपल्या देशाचे गृहमंत्री अस्वलाचे कातडे पांघरून सदैव झोपले असल्यामुळे हेर देसाई पळाला यात नवीन कांहीच नाही!
  पाकिस्तान त्याला परत घ्यायला तयार झाला नाही व आपले नपुसकलिंग सरकार अगतिकपणे याचे काय करावे या फ़िकिरीत होते,तेव्हा कोणीतरी शक्कल काढली की याला पळून जाउ द्यावे म्हणजे प्रश्नच सुटला!थोडे दिवस आरडाओरडा होइल,पण असे रोजच निरनिराळ्या मुद्यांवर होत असते!Public memory is short,विसरून जातील लोक,तोपर्यंत देसाई त्याच्या येथील हस्तकांशी पुन्हा हातमिळवणी करून नवी कारस्थाने करायला तयार होतोच आहे!
  तेव्हा आपले झोपलेले सरकार पुढच्या दहशतवादी कृतीनंतर तात्पुरते जागे होइल व सुरक्षाव्यवस्था कडी करेल,पण या व्यक्तीचा धर्म महत्वाचा कारण अशांना ईजा झाली तर कोंग्रेसच्या धर्मनिरपेक्ष मतपेट्यांचे काय होइल?
  पुण्याच्या धर्मनिरपेक्ष खासदाराला याबद्दल किंवा दुर्दैवी कै.ज्योतीकुमारीच्या मरणाबद्दल कधीच कांही म्हणायचे नसते!
  आजच्याच पेपरमध्ये त्याने कांही अल्पसंख्यकाना कोंग्रेस पक्षात प्रवेश देवून जातीयवादींचा धोका टाळला आहे अशी बातमी आली आहे! वारे वा काय धर्मनिरपेक्ष [निर्लज्ज] आहे!राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन करण्याच्या गडबडीत याला वेळ नाही!
  पुण्यातून तो पळून गेला याचे उत्तरदायित्व पोलिस कमिशनरवर आहेच तसेच इथल्या खासदारावर,पालकमंत्र्यावरपण जरूर आहे!
  सर्व चांगल्या घटनांचे श्रेय लाटायला हे सदा तयार,पण कांही अघटित घडले की हे भ्याड गुल!

 2. Anonymous said...
   

  Hey thode phar 'The Terminal' cinema sarkhe ahee. Police sathi ha prashana mitlya sarkha ahee.

 3. sarang said...
   

  bhartatil kayde aani suvyavstha itki juni aahe ki tila aajch badlwayla pahije , karan yachacha fayada gheun kititari gunhegar aajhi mokale firat aahe , kititari kaidi asech palun jatat , yawr upay mhanun polisanacha changli shiksha vayla pahije , sadhya kayde badlaychi nittant garj aahe .
  Sarang R. Topare
  Nagpur
  09422148167

 4. sarang said...
   

  bhartatil kayde aani suvyavstha itki juni aahe ki tila aajch badlwayla pahije , karan yachacha fayada gheun kititari gunhegar aajhi mokale firat aahe , kititari kaidi asech palun jatat , yawr upay mhanun polisanacha changli shiksha vayla pahije , sadhya kayde badlaychi nittant garj aahe .
  Sarang R. Topare
  Nagpur
  09422148167

 5. Anonymous said...
   

  Mala tar watate ki hya madhe polichanch hath aahe karan prashna itka jattil jhala hota ki roj polichachi abru nighat hoti papermadhe, pan kunawar kasali karwai honar nahi, pan sadhya cyber cafetun jar ekada mail gela tar tya cyber cafe walyala kiti trass detat , aata konala trass denar

 6. Anonymous said...
   

  This is a very shocking moment for every indian.Police must have had got big money for doin it.Not only the police department,politicians who've helped Desai Escape easily, must be punished.I bet they not even feeling guilty any how for doing this act.Somehow someway its Indias Badluck that fraudulent,deceitful people still living in India..What else can i say Desai must have had reached his destination.Big shame for us.We cant even protect our country.I think everyone of ous responsible for it.If not dare it now we'll never raise India..
  Shivaji Khedkar

 7. cybercafejaiganesh said...
   

  hi,i am manoj joshi from pune,mi tar boltoy ki sakal blog ne ya subject war kahi comments write karne wrong ahe,kahi farak padnar nahi ahe,to desai palun gelela nahi ahe,tyala palnyat policanchi help ahe,ani apan public ne hi ata shant rahile pahije,he police lok barobar kashi karnar ahet,tya sahkarnagar police station che shekh incharge hote,ani ha desai pan musalman hota he sagale ekmekana sobat astat,khup kahi ghadtay ya deshat,pan apan kahi nahi karu shakat,court madhe pan policani sangitale nahi ki to nighun gelay mhanun ya warun police kiti kamache ahet te samazte mi tar mhanto apan police department band kele pahije,kashala yana payment dya,vehicles dya,he dya te dya,aaplya public cha money kashala waste karaycha nahitari he police lok kahi kamache nahi ahet,yana sadha ek mamuli desai sarkha neet thewta yet nasel tar kay kartat kay he chowki madhe,rastyat thambun bhikaryasarkhe gadya pakadne,garib lok je potasathi chukiche kam kartat tyanchyakadun hafta ghene,ekhadya garib mansane wrong work kela ki yana lagech kayda atahvato,lagech rules and regulation distat pan jya mule aaplya deshala dhoka ahe ashana he free sodtat,mi tar mhanto kharach police department band karun taka,bhika magu dya yana,sale nuste mantryanchya gadyanchya mage-pudhe karne,hafta khane,ya shivay kahi karat nahit police department band padnyane kahi jast farak padnar nahi,ase ani tase he pakistani lok aaplya country madhe ghuslet ani ata kay aaplya country madhle tyanche lok pan zalet,jaudya aapna kay karnar nustya comments write karnar,ani shant basnar.jaudya.

 8. Anonymous said...
   

  Wonderful!Now the 21st century Afzal being treated as the VIP guest in Delhi even after attacking our parliament should be kept in the same room of Sahakarnagar police station.Rest will follow automatically.

 9. Anonymous said...
   

  खासदारावर,पालकमंत्र्यावरपण जरूर आहे!
  कोंग्रेसच्या धर्मनिरपेक्ष मतपेट्यांचे काय होइल?
  कांही अल्पसंख्यकाना कोंग्रेस पक्षात प्रवेश देवून जातीयवादींचा धोका
  गृहमंत्री अस्वलाचे कातडे पांघरून सदैव झोपले असल्यामुळे हेर
  Public memory is short,विसरून जातील लोक

 10. Anonymous said...
   

  When for the sake of VOTES our NALAYAK GOVT & the home minister is not ready to take the decision about Afjal Guru to " Desai ki kya baat hai? "

 11. Anonymous said...
   

  Agree with comment # 10 + when somebody like this guy easily escapes there always is someone insider helping him...no doubt about that..

 12. Deshbhakta said...
   

  Deshdrohyanna fashi dyayla havi. Fukatchi humanity dakhawnyacha ha parinam ahe.

 13. kalpana dharmadhikari said...
   

  bharatat nyay hi vikat milu shakato..... kaidi palane hi tya manane gown goshati aahe.... bharatat kahihi vikat ghetale jau shakate..... kiman suraksha vyavsthe madhye tari asha goshati vhayala nakot....

 14. Anonymous said...
   

  पाकिस्तानचा गुप्तहेर असलेल्या व सात-आठ वर्षे कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेला धोकेबाज परकीय नागरीक पोलिसांच्या नजरेखाली असताना पळून जावू शकतो यासारखी शरम आणणारी घटना धडताच पुण्याच्या पोतिस कमिशनरने ताबडतोब या धटनेची जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजिनामा देणे जरूर होते.पण हल्ली सर्व राजकारणी व वरिष्ट शासकीय अधिकारी निर्लज्ज झाले असून त्याना आपल्या तुंबड्या भरण्याव्यतिरिक्त कशातही स्वारस्य नाही .आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा नालायक लोकांच्या हाती आहे हे आम्हा सर्वांचे दुर्दैव होय.
  मोहन दड्डीकर

 15. Anonymous said...
   

  यात नक्कीच सहकारनगर पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतो, तो जरी सुटला असला तरी त्यावर पाळत ठेवायची जबाबदारी कोणाची? त्याला पाकिस्तानात पाठवण्यास असमर्थ असलेलं सरकार ही दूसरी त्रुटिची बाजु. उद्या आरोपीने एखादं घातपाती कृत्यं केलं तर त्याला जबाबदार कोण? आपल्या येथे लोकांच्या जीवाची किम्मत नहीं हेच यातून दिसून येते. राज्याचे गृहमंत्री काय करत होते? निर्लज्जतेचा कळस आहे हा.

Post a Comment