व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

आकुर्डीत बिबट्याचा धुमाकूळ; दहा जण जखमी

आकुर्डीच्या गंगानगर भागातील भरवस्तीत शिरलेल्या एका बिबट्याने मंगळवारी सकाळपासून सुमारे पाच तास धुमाकूळ घालीत नऊ वर्षांच्या मुलीसह सुमारे दहा जणांना जखमी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्पोद्यान कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने दुपारी पावणेबाराच्या सुमारास मोठ्या धाडसाने बिबट्यास जेरबंद केले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ निर्माण झाली होती. जेरबंद केलेल्या बिबट्याला बेशुद्ध अवस्थेत पुण्यातील कात्रज सर्पोद्यानात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

रावेत भागातून येऊन रात्रीच हा बिबट्या आकुर्डी परिसरात दाखल झाला असावा, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रथम पाहिले
गंगानगर भागात राहणारा मनोज मेहता हा युवक म्हाळसाकांत रस्त्यावरून मोटारीने जात असताना सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे त्याला दिसले. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. मात्र, तो कोणता प्राणी होता, हे अंधारामुळे तो नीटसे पाहू शकला नाही. त्यामुळे या घटनेकडे सुरवातीला काहीसे दुर्लक्ष झाले.


"गणेश नगरी'त ठिय्या
सकाळी सातच्या सुमारास गणेश नगरी इमारतीच्या पायऱ्यांवरून चढून बिबट्या दुसऱ्या मजल्यातील गॅलरीत पोचला. इमारतीतील विलास होले यांची पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगी तन्वी ही सकाळी शाळेला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असता गॅलरीत बसलेला बिबट्या तिला दिसला. ती मोठ्याने ओरडल्याने इमारतीतील रहिवासी घराबाहेर आले. एखादा कुत्रा असावा म्हणून येथील रहिवासी हनुमंत कडेपवार काठी घेऊन बाहेर आले. मात्र, तो बिबट्याच असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सर्वांना दारे बंद करून घेण्यात सांगितले. दरम्यान, एका दारावर जोरजोरात पंजे मारून बिबट्या इमारतीच्या गच्चीवर दाखल झाला. सुमारे 15 मिनिटांनंतर बिबट्या गच्चीवरच असल्याची खात्री झाल्यानंतर कडेपवार यांनी गच्चीचे दरवाजे बंद केले.

चाळीस फुटांवरून उडी
इमारतीच्या गच्चीवर अडकून पडलेल्या बिबट्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्याने त्याने थेट इमारतीच्या गच्चीवरून सुमारे चाळीस फूट उंचीवरून खाली उडी मारली. इमारतीच्या खाली मोटारीच्या पार्किंगसाठी उभारलेल्या छपराचा सिमेंट पत्रा फोडून बिबट्या मोटारीवर पडला. त्यात संजय आहुजा यांच्या मोटारीचा टप चेंबला. सकाळी सव्वाआठच्या सुमारास गणेशनगरी इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कुबेर बंगल्यामधील मोटारीच्या आडोशाला बिबट्या दडून बसला. बंगल्याचे मालक एल. झेड. पाटील यांनी त्याला पाहिले.पाटील यांच्या घराच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर सुमारे तासभर तो याच परिसरात वेगवेगळ्या भागांत फिरत होता. साडेनऊच्या सुमारास पिंपरी पालिकेचे सर्पोद्यान कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले.

अखेर बिबट्या जेरबंद
"साई अंबर' इमारतीच्याच आवारात काही काळ घालविल्यानंतर बिबट्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लिफ्टपाशी दडून बसला. त्यामुळे चारही दिशेने जाळी धरण्यात आली. मात्र, त्यास पकडावा कसा, हा प्रश्‍न सर्वांपुढे होता. पावणेबाराच्या सुमारास गोरख नेवाळे यांनी सरळ बिबट्यावरच झडप घालून त्याला अंगाखाली दाबले. त्याच वेळी इतर पाच ते सहा जण बिबट्याच्या अंगावर पडले. चारही पाय आणि जबडा सर्वांच्या हातात आल्यानंतर त्याला गुंगीचे इंजक्‍शन देण्यात आले. पाच तास धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.शहरात आलेल्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सुटकेचा नि:श्‍वास सोडण्याऐवजी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बिबट्यासारख्या वन्यप्राण्यावर शहरात येण्याची वेळ का आली, यावर केवळ विचारमंथन करण्याऐवजी त्याला कृतीची जोड देणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, नामशेष राहिलेले जंगल..भक्ष्याच्या शोधात शहराकडे धाव घेणारे बिबटे..त्यामुळे नागरिकांच्या जिवितास निर्माण झालेला धोका.. आणि हा धोका टाळण्याच्या नादात बिबट्याचा गेलेला बळी...हे कदापि योग्य नाही. या सगळ्या प्रकाराला बिबट्यालाच दोषी धरता येईल का? मला वाटते ही बिबट्याची घुसखोरी नसून, मानवाने त्याच्या हद्दीत केलेली घुसखोरी आहे. आता यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. आपल्याला काय वाटते याविषयी? तर, आम्हाला नक्की लिहा....

4 comments:

 1. Anonymous said...
   

  it is a pity that humnas are degrading the wild life. the animal lost its life making us aware that even they have a place on this planet. instead of being patient, we made the whole thing into one big circus.
  did anybody ever think what would have happened if the roles were reversed ?
  animals are very patient with us, or else we as a human race would not have been around for so long.

 2. Anonymous said...
   

  That animal was hungry & sick, due to jump he was hurt very badly so he could not protect himself. Actually it was message for us, Do not dare like this ?

  You must have some patients and must wait for professional person. This is not a morcha, that you are throwing stone to push him away.

  Some instruction must be followed
  1)Who people are living nearby area must carefull now, & must watch for the security of your child in morning or evening time.

  2)Do not forward fake information.

  3) If you realy seen any wild animal, must inform your neighbours & police /corporation

  4)Don't Shout or throw stones

  5)do not dare to go in front of wild animal.

  we are pune citizen know that we are living in the district where the wild cat population is very big so this insidance must be repeat again, i am sure

 3. Anonymous said...
   

  First thing to do is to stop selling land in the outskirts of the city. If you look across, there are thousands of ads you can find which are selling farming/forest land in the green patch outside of Pune.(Sinhgad, Katraj, Pune-Lonawala patch, Talegao) (I was approached by a friend to buy land right at the bottom of Sinhgad).
  Real reason is lies here, in Pune City's expansion into the forest land. Although government is not to be blamed completely, everyone who acquires land from villagers, sell it, agents, people who buy it, and government people who approves it are responsible for it. I want City to grow, but much in the organized way, looking into all sorts of future issues.

 4. mrs. sunita bhamare said...
   

  akurdi sarpodyan va agnishamak dalache javan yanchya madatine bibtya jerband zala, hyasathi tyanche aabhar manale pahijet. bibtya vachu shakala asta, jar velevar prashikhshit karmachari upalabdh zale aste tar. parantu saha taas javun pan shevati prashikshit yantrana upalabdha hovu shakali nahi.
  pradhikaranamadhe durga devi tekdi var morning walk karnyasathi janaryanche praman khup aahe. khara tar purvi ravet jalupsa kendrakade nagrikana janyas parvangi navhati, parantu kalaparatve sarras tethil vapar phirnyasathi hovu lagala. jya thikani jungle aahe, tethil sanrakshak bhinti, tarechi kumpane tutleli astat, tyamule vanya prani junglatun baher yevu shaktat. tasech jethe jungle aahe, to bhag samanya janatesathi khula karnyat yevu naye.
  tasech hyapudhe asa prasang parat alach, tar tatpar seva jar prashasankadun milali, tar pudhil goshti vachtil.

Post a Comment