व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

दुबळ्या मानसिकतेतून बाळूमामाच्या भाकरीची निर्मिती

""घरात आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी बाळूमामाची "दुप्पट' होणारी भाकरी घरात आणून त्याची पूजा करणे, हे केवळ दुबळ्या आणि भ्रमिष्ट मानसिकतेचे लक्षण आहे. याचा प्रतिवाद प्रशासन, प्रसिद्धिमाध्यम व शिक्षकांनी करणे गरजेचे आहे,'' अशी अपेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली.

या प्रकारामागील मानसिकता स्पष्ट करताना ते म्हणाले, ""बाळूमामाच्या मेंढरांनंतर बाळूमामाच्या "दुप्पट' होणाऱ्या भाकऱ्या या तथाकथित चमत्काराच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांतून ऐकायला मिळत आहेत. हा दैवी चमत्कार नसून, "दुप्पट' होणारी भाकरी म्हणजे केवळ अनुकूल वातावरणामुळे वाढलेली बुरशी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. असे असतानाही बुरशीला देवाचा प्रसाद समजणे व घडणाऱ्या प्रकाराची कारणमीमांसा न करता डोळे झाकून विश्‍वास ठेवणे, हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे. एवढेच नव्हे, तर हा विज्ञान-तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या 21 व्या शतकाला लागलेला कलंक आहे.''

अशा घटनांमुळे वेळ, श्रम, पैसा आणि बुद्धीची हानी होते. यामुळे अशा अंधश्रद्धेच्या प्रकाराविरुद्ध शिक्षण संस्थांनी ठोस भूमिका बजावणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांनी या घटनेमागील शास्त्रीय कारण सांगितल्यास विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यामागील वास्तव घराघरात पोचण्यास मदत होईल. याबरोबरच फसणाऱ्या लोकांच्या मूर्खपणाचा प्रतिवाद प्रशासन, प्रसिद्धिमाध्यमे व शिक्षकांनी करायला हवा. तरच विज्ञान युगातील अंधश्रद्धांना आळा बसू शकतो.

2 comments:

  1. Anonymous said...
     

    congratulations dr.dabholkar.
    "aandha shraddha"is a cancer to the society.this movement has to be widened.i think it has different orbits.the first one is one which is so much noticeable in less literate,and poor, and on which dr. is spending his life in that class at large.but there is another sphere in which the middle class, h.middle class, rich,literate,eliteclass, etc.every one is trapped. that level of "andha shraddha" is more dangerous.there is no need to describe the roots of that.they come from "babajis" "gurus",astrologers," foreteller,so called intuitiors etc.they encash the weakness of the situation of the persons.the whole society is a victim of this "aandha shraddha".unfortunately it is very difficult to convince it.when a person has less confidence about his capacity,limits, and endurance,he/she runs after an occult power and is a victim of "aandha shraddha".perhaps it may appear coetraversal to the viewers,but one should (and every one) read "sw. vivekananda"to build a self confidence and self standing .

  2. Anonymous said...
     

    स्वातंत्र्यपुर्व काळात महात्मा गांधीनी सार्‍या देशभर व महाराष्ट्रात संत गाडगे महाराजासारख्या इतर अनेक संतानी समाज प्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले.या प्रबोधनामार्गे या समाजसेवकानी ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला समजेल अशा सोप्या भाषेत अंधश्रद्धा, सार्वजनिक अस्वच्छता,जातीयता, धार्मिक कर्मकांडावर पैशाचा अवास्तव खर्च व अशा इतर अनेक दोषांवर टीका करून, त्याना सुधारण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही समाजप्रबोधनाची चळवळ जवळजवळ बंदच झाली. सार्‍यांचे लक्ष केवळ राजकीय सत्तेकडे लागले.शिवाय प्रसार माध्यमानी देखिल, आपल्या सामाजिक जबाबदारीकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. उलट आर्थिक यशाच्या मागे लागून, त्यानी अंधश्रद्धा वाढविण्याचा मार्ग अवलंबिला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली आर्थिक विषमता, बेरोजगारी व वाढता हिंसाचार व त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता यामुळे सारा समाज हतबल व दिशाहीन झाला आहे व त्यामुळे अंधश्रद्धा वाढतच आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाता एकमाव मार्ग म्हणजे सार्‍या समाजाला सुशिक्षित करणे व त्यामा वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारण्यास तयार करणे.
    मोहन दड्डीकर

Post a Comment