व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

डाॅ देसाई यांच्यावरील हल्ला योग्य आहे काय़

यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल उभ्या महाराष्ट्रात आदराचीच भावना आहे. साहजिकच त्यांच्याबद्दल काढण्यात आलेल्या अनुद्गारांचा निषेधच व्हायला हवा. मात्र ते करण्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये डॉ. सतीश देसाई यांच्या सारख्या सच्च्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्याचे समर्थन करता येईल का? ही घटना पुणे शहराच्या लौकिकाला काळिमा फासणारी आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला या बाबत काय वाटते ते आम्हाला कळवा.

2 comments:

 1. Anonymous said...
   

  आज या देशात लोकशाही नसून केवळ गुंडगिरी आहे दिवसेंदिवस, व्यक्तीपुजेचे स्तोम वाढत आहे.कोणत्याही राजकीय नेत्याचे कार्यक्षेत्र फार विशाल न बहुरंगी असते. जरी तो नेता फार तोकप्रीय असला व त्याची बर्‍याच क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद असली तरी समाजातील सर्वानाच त्याचे सारेच कार्य पसंत पडेल असे नाही न तशी अपेक्षा करणे हेहि चुकीचे आहे.ज्याना त्या नेत्याच्या काही ध्येय-धोरणाशी मतभेद असतील तर ते जाहिरपणे सांगण्याचा त्यांचा मूलभूत हक्क आहे. जोपर्यंत हे मतभेद व्यक्त करताना त्या नेत्याच्या खासगी जीवनाचा उल्लेख केला जात नाही व भाषणात सभ्य भाषेचा वापर केला जातो तोपर्यंत अशा मतभेद प्रदर्शनाला गुंडगिरीने विरोध करणे अत्यंत निंद्य आहे व याचा सर्वानी जोरदार निषेध केला पाहिजे.
  मोहन दड्डीकर

 2. Anonymous said...
   

  हा हल्ला योग्य का अयोग्य हे इतरांनी ठरवेपर्यंत अनोळखी हल्लेखोर पसार व कायमचा गायब असे आजच्याच सकाळमध्ये आले आहे.
  डॉ. सतीश देसाई हे पुणे शहराची वाट लावणा-या कोंग्रेस पक्षाचे सच्चे कार्यकर्ते असते तर त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या प्रामाणिक आमदार सावंतांसारखा तो पक्ष सचोटीने केव्हाच सोडला असता!गतवर्षीच्या सकाळ आयोजित "पुणे व्हिजन" मध्ये त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने बोलायला कांहीच नव्हते व जनसमुदाय त्या पक्षाचे कांहिहि ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता!
  सध्याच्या एकंदरीत घाणेरड्या राजकारणात असे प्रकार चालूच रहाणार व त्याला आजचे राजकारणी व त्यांची वक्तव्ये व कृतीच जबाबदार आहेत!शहराचा लौकिक यांनीच केव्हाच धूळीस मिळवला आहे!

Post a Comment