व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

येत्या वर्षभरात पुण्यात आणखी ३५ हजार मोटारी?

दुचाकी घ्यायची की मोटार, असा पर्याय टाटा कंपनीच्या एक लाख रुपयांच्या मोटारीमुळे ग्राहकांना मिळणार आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने (असोचेम) केलेल्या पाहणीत, दुचाकी वाहनांची २५ टक्के बाजारपेठ ही मोटार काबीज करेल, असे दिसून आले आहे. ....

पुण्यातील दुचाकींच्या एवढ्या ग्राहकांनी या मोटारीला पसंती दिल्यास वर्षभरात आणखी सुमारे ३५ हजार मोटारी शहरातील रस्त्यांवरून धावू लागतील.


जगातील वाहनउद्योगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टाटा कंपनीच्या एक लाखाच्या मोटारीचे दर्शन गुरुवारी दिल्लीतील "ऑटो एक्‍स्पो' प्रदर्शनात झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे स्वप्न या मोटारीमुळे साकारले. देशातील मध्यम व कनिष्ठ मध्यम वर्गाच्या स्वत:च्या मोटारीची स्वप्नपूर्ती या मोटारीमुळे शक्‍य होईल. त्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात कसे असेल, या उत्सुकतेपोटी त्यांचेही डोळे या मोटारीकडे होते.

"टाटा मोटर्स'चे पुण्यातील वितरक बी. यू. भंडारी आणि पंडित ऑटोमोटिव्ह यांच्या शोरूममध्ये दिवाळीपासूनच या मोटारींची विचारपूस ग्राहकांकडून होत आहे. माध्यमांमधून या मोटारीची चर्चा होऊ लागल्यावर मोटारीची माहिती घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उद्या प्रदर्शनात "दर्शन' देणारी ही मोटार विक्रीसाठी येत्या जूनपर्यंत उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. या मोटारीची चाचणी गेल्या काही महिन्यांपासून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व कात्रज घाटात करण्यात आली. मात्र, मोटारीची ओळख गुलदस्तात ठेवण्यासाठी त्यावर आवरणे घालून चाचणी झाली. ६६० सीसी क्षमतेची ही मोटार प्रतिस्पर्धी कंपनीच्या आठशे सीसी मोटारीची बरोबरी करणारी आहे, असे सांगण्यात आले.

पुण्यातील वाहनांची संख्या १५ लाख, तर पिंपरी-चिंचवडमधील वाहनांची संख्या पाच लाखांवर पोचली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात दीड लाख दुचाकी वाहनांची नोंद झाली. "असोचेम'च्या पाहणीनुसार, यातील २५ टक्के वाटा या मोटारीला मिळाल्यास वर्षभरात ३५ हजार मोटारी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये धावताना दिसतील. या मोटारीच्या माध्यमातून साकारणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही रक्कम जादा मोजावी लागल्यास त्याचीही तयारी पाहणीतील ९० टक्के जणांनी दाखविली आहे.

आता, प्रश्न फक्त इतकाच आहे, की आपले रस्ते इतक्या मोटारी सामावून घेण्याइतके सक्षम आहेत का...?
-- मनीष कांबळे

5 comments:

  1. Anonymous said...
     

    माझ्या पुण्याची वाट लागणार हे नक्की.

  2. Unknown said...
      This comment has been removed by the author.
  3. Unknown said...
     

    १] कित्येक वर्षांपासून प्रत्येक दुचाकी वाहनांच्या चालकांची शक्यतो लवकरात लवकर चार चाकी वाहन घ्यायची इच्छा होतीच,पण पैशाच्या कमतरतेमुळे व 'कार फ़ायनान्स' मिळत नसल्यामुळे पूर्वी अशी इच्छा पूरी करायला खुप वर्षे थांबायला लागायचे किंवा ते एक स्वप्नच रहायचे!
    २] भारतात जागतिकीकरणामुळे व ओटोमोबाइल क्रांती झाल्यामुळे मारूती ८०० गाड्या कमी किंमतीत मिळायला लागल्यापासून मध्यमवर्गाची कार घ्यायची इच्छा पूरी व्हायला लागली.त्यानंतरच्या उदारी धोरणामुळे जगातल्या ख्यातनाम गाड्याकंपन्या येथे प्रथम CKD भाग आणून गाड्यांची जुळवाजुळव करू लागल्या व मागणी अफ़ाट वाढत आहे हे पाहून येथे गाड्यांचे कारखाने काढू लागल्या.
    ३] थोड्याच वर्षात येथील उच्च/मध्यमवर्गाचे राहणीमान उंचावल्यामुळे प्रिमियम/मध्यम आकाराच्या गाड्यांना मागणी वाढली व या उद्योगाला प्रचंड महत्व प्राप्त झाले.
    ४] हे सर्व ओळखून श्री.रतन टाटांसारखे दूर दृष्टीचे कारखानदार यांनी ट्रकशिवाय कमी किंमतीच्या गाड्यांचे उत्पादन करायचे ठरवले व ते प्रथम 'इंडिका' व मग 'इंडिगो'च्या द्वारे सिद्ध करून दाखवले,त्यामुळे मारूती व इतर कंपन्यांना आपल्या महागड्या गाड्यांच्या किंमती खुपच कमी कराव्या लागल्या.
    ५] सामान्य/गरीब माणसांनापण सुरक्षिततेच्या व सुखसोयीच्या द्रुष्टीने चारचाकी वाहन हवे असते हे ओळखून श्री.रतन टाटांनी आजच्या अतिमहागाईच्या दिवसातपण एक लाख रुपयात गाडी विकायचे ठरवले व ते लवकरच सिद्ध होणार आहे ही अतिशय चांगली बातमी आहे.
    ६] प्रौढ सेवानिवृत्त नागरिकांनासुद्धा ही गाडी चांगली व हवीहवीशी वाटली नाही तर नवल!एकतर तिचा आकार छोटा असल्यामुळे तिला चालवणे/पार्क करणे सोपे होणार तसेच तिच्या कमी क्षमतेच्या इंजिनामुळे अतिमहागड्या इंधनाचीपण बचत होणार व सर्वात महत्वाचे म्हणजे गाडीची स्वतःची कमी किंमत सोडून तिच्यावरची विमारक्कम व एक रकमी वाहन कर कमी असणार!
    ७] नुकतीच फ़ोटोसकट बातमी आली होती की फ़क्त दूचाकी वाहनांची ख्यातनाम उद्योजक बजाज कंपनीसुद्धा लवकरच चारचाकी गाड्या तयार करणार आहे!
    ८] आता राहिला प्रश्न रस्त्यांवरच्या जागेचा!
    लोकसंख्यावाढ व वाहनसंख्यावाढ सोडून हा प्रश्न श्रीमंत लोकांनी शौक पूरा करण्यासाठी आणि/किंवा दिमाख दाखवण्यासाठी म्हणून हल्ली घेतलेल्या मोठाल्या SUVs,premium cars मुळेपण जास्त उदभवला व भासतो आहे!गरज असो किंवा नसो,या सर्वांना मोठाल्याच गाड्या चालवायला आवडते कारण त्यात त्यांची प्रतिष्ठा पणास लागलेली असते.
    ९]पुण्यासारख्या लहान गल्लीबोळांचेच उदाहरण घ्या.जेथे पाय हलवायला एक इंच जागा नाही तेथे या गाड्या जेव्हा संचार करायला लागल्या तेव्हा वाहतुकीचे नियमित तीनतेरा व्हायला लागले,तरीहि या अतिमहागड्या गाड्यांची संख्या वाढतच आहे.
    लहान साध्या गाड्या चालवणा-यांना भयंकर traffic jam मध्ये अडकल्यावर जेव्हा Mercedes,Honda accord,BMW,Toyota Corolla,Skoda वगैरे पण आसपास असहायपणे दिसतात तेव्हा थोडासा दिलासा मिळत असणारच!
    आता जर या मोठ्या गाड्यांच्या महाभागानी विचार केला तर तेपण शहरात लहान गाड्यात फ़िरू शकतील व बजाज/टाटांच्या नव्या छोट्या गाड्यांनापण जागा सोडू शकतील!
    पण हे दिवास्वप्न ठरणार असेल तर वाहतुकीची आणखी वाट लागेल!
    १०] कदाचित WI-Fi,Hi-Fi,blue tooth असलेल्या माध्यमातून आपापल्या Laptop संगणकावर traffic jam मध्ये कायम अडकलेली नवी पिढी आपले काम चालू ठेवील!
    तसेच कुठूनहि कशाहि चालणा-या/सर्वत्र पार्क केलेल्या omnipresent स्कूटर मोटरसायकलींचे प्रमाणहि थोडे कमी होइल!
    ११] आपले झोपलेले सरकार मात्र कठोर कुटुंबनियोजनाची किंवा दूरदूर नवी शहरे स्थापन/विकसित करण्याची गरज कधीच ओळखणार नाही!पुण्याची स्थिती पोट प्रचंड फ़ुगत चाललेल्या बेडकासारखी होत आहे याकडे सर्व राज्य/शासनकर्त्यांचा कानाडोळा आहे!
    नवनवी SEZ स्थापन करण्याऐवजी नवी नीट आखलेली शहरे प्रस्थापित केली तरच पुण्यनगरी व इतर शहरांवरचा ताण कमी होइल!

  4. Anonymous said...
     

    1. We have discussed the needs for better infra and also possible solutions like long stretch of flyoever on top of Karve rd, Paud rd and along Mula river.
    2. Traffic RULES to be actually followed.
    3. More traffic POLICE force to see that those rules DO get followed like has been mentioned again.
    4. But ultimately the biggest relief is gonna be metros since just like NY or Mumbai or any other city Pune is Bound to be saturated.

  5. Aalap said...
     

    aaple raste itkya motari samvun ghenyas nakkich asmarth aahet. pahilyanda aaplyala Public Transport System sudharavi lagel tarach tyacha apekshit parinam vahtuk surlit honyas hoil. Ek lakhachi motar at a time kiti jan rastyavarti firavu shaktil? Ha khara motha prashna aahe.

Post a Comment