व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

41 लाखांची वीजचोरी उजेडात

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे गावातील "यशोगंगा स्टोन क्रशर'ने सुमारे 41 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वीजमंडळ पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल झाला. संबंधित स्टोन क्रशर स्थानिक नगरसेवक विकास दांगट यांच्या वडिलांच्या नावावर आहे. मात्र, विकास दांगट यांनी या गुन्ह्याचा इन्कार केला आहे.

याबाबत "महावितरण'च्या फिरत्या पथकातील उपकार्यकारी अभियंता सुभाष शिरोलीकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार "यशोगंगा स्टोन क्रशर'चे संचालक पंढरीनाथ यशवंत दांगट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांगट यांचा नऱ्हे गावात स्टोन क्रशर आहे. गेल्या वर्षी जूनपासून 12 डिसेंबरपर्यंत या काळात एक लाख 94 हजार 485 युनिटची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याची किंमत 40 लाख 71 हजार 406 रुपये आहे.

उघडकीस आलेल्या वीजचोरीचा प्रकार म्हणजे "आधंळा दळतोय आणि कुत्रा पीठ खातोय', असा आहे. कारण सर्वसामान्यांनी कोणतीही सवलत न मागता वीजबील भरायचे आणि बड्या मंडळीनी वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचे बील चुकवायचे. हे पकरण संतापजनकच आहे.

2 comments:

 1. captsubh said...
   

  ४१ लाख रुपयांची विजचोरी उघडकीस आल्यावरसुद्धा चोराचा नगरसेवक मुलगा या गुन्ह्याचा इन्कार करून मोकळा झाला.वास्तविक या पितापुत्राच्या मुसक्या बांधून त्यांना सक्तमजुरीसाठी आजन्म तुरुंगात टाकायला हवे,नगरसेवकपद ताबडतोब रद्द करायला हवे व या स्टोन क्रशर कारखान्याची मुद्देमालासह विक्री करून बिलातले थोडेतरी पैसे वसूल करायला हवे!
  रोज वर्तमानपत्र उघडले की अशाच आशयाच्या बातम्या दिसतात तरीसुद्धा हे कायम मोकळेच सुटलेले!छान लोकशाही आहे आपली! या नगरसेवकाचा पक्ष अशा वेळी त्याला बाहेर फ़ेकून द्यायच्याएवजी संरक्षण कसा देतो? निर्लज्जपणाची कमाल आहे!
  सामान्य नागरिकाने चुकूनसुद्धा किरकोळ वीजबिल भरले नाही तरी त्याची वीज तोडली जाते व याउलट इतक्या प्रचंड रक्कमची चोरी उघडकीस आल्यावर शिक्षा काय व कधी होणार?हल्ली नगरसेवक कांही अपवाद वगळून इतके कसे भ्रष्ट होता चालले आहेत? कारण यांना शिक्षा होत नाही म्हणून!
  यांना त्यांच्याच स्टोन क्रशरमध्ये फ़ेकून क्रश करणे हीच सर्वात चांगली शिक्षा होइल! तरच बोकाळलेला भ्रष्टाचार कमी होइल!

 2. Sameer said...
   

  Captsubh says is right but what we need is a concrete system of Law & Order as well as Social Ethics. We just blame Corporators and politicians. But, can what we do to change the system?

Post a Comment