व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पक्ष्यांची घरटी होती, ते झाड ना तोडले कोणी...

वर्दळ वाढल्याने रस्ता रुंदीकरणासाठी वडाचे झाड तोडणे आवश्‍यकच होते. परवानगीही मिळाली; पण झाड तोडताना एका फांदीवर दोन लहान पिल्लांबरोबर संसार थाटलेल्या घारीचे घरटे दिसले. घार हवेत घिरट्या घालून चिमुरड्यांकडे बघत होती. या प्रसंगाने भावनाविवश झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी अखेर निर्णय मागे घेतला. आता ते वाट बघत आहेत ती पिल्ले मोठी होण्याची...पुणे पोलिस आयुक्तालयासमोरील रस्त्यावर अंदाजे तीस वर्षे जुने वडाचे झाड आहे; पण वाहतूक वाढल्याने अपुऱ्या पडणाऱ्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाड तोडण्याची मागणी वाहतूक विभागाने केली होती. त्यानुसार मागील आठवड्यात महापालिकेच्या वन विभागाचे अधिकारी आले. वृक्षतोड होत असल्याचे कळताच वृक्षसंवर्धन संस्थेचे सदस्य अजय वैशंपायन आणि काही वृक्षमित्रही तेथे दाखल झाले. काही फांद्या तोडल्या आणि एका फांदीवर अचानक पिल्ले असलेले घरटे दिसले. त्याकडे बघून एक घार हवेत घिरट्या घालत होती. माणसाचा स्पर्श झाला, तर पक्षी पिल्लांना जवळ घेत नाहीत आणि पक्षी असलेले झाड तोडणे हा वन खात्याच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे अधिकारी थांबले. जोपर्यंत पिल्ले मोठी होऊन घरट्यातून उडून जात नाहीत, तोपर्यंत झाड तोडले जाणार नाही, असा निर्णय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला, अशी माहिती शहर पोलिस वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र देसाई यांनी दिली.
घारीचे घरटे उद्‌ध्वस्त न करण्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल...देव अशी सद्‌बुद्धी सर्वांना देवो, जेणेकरून पुढच्या पिढीला पक्षी केवळ चित्ररुपातून पाहायला लागू नये...तुम्हाला काय वाटते?

7 comments:

 1. Ashish said...
   

  हा महापलीकेचा निर्णय अगदि स्वागत वगैरे करावा असाच आहे. पण त्या पिल्लांची एक प्रकारे कीवच वाटते. महापालीका ज्या वेगाने झाडे तोडते ते पाहता मला तरी नक्की खातरी आहे कि या पिल्लांना स्वता:ची पिल्ले मात्र एखाद्या १००मी ऊंच टॉवर च्या खिडकीतच जन्माला घालावी लागणार. वरती बसुन मस्त एन्जॉय करतील पुण्यातली धुरकटलेली थंड हवा.

  रस्ते कमी पडायला लागले तोड झाड्....वायर हलायला लागली तोड झाड्....सिग्नल दिसेना झाला तोड झाड्.... हे झाले की तोड झाड्....ते झाले की तोड झाड्.... पण जितकी झाडे तोडली तितकी लावली का? लावलेली किती झाडे आज जागेवर मूळ धरुन आहेत..? याचा हिशोब महापालीका देऊ शकते?

  नाहीच देऊ शकणार्...कारण झाडे म्हणजे काय हो? ती लावण्या साठी ना मोठी टेण्डर निघु शकतात ना पाणि घालण्याचे कुणाला कॉन्ट्रक्ट देता येते. म्हणजे एवढे करुन जर आपले हात रिकामे राहणार असतील तर कशाला त्रास...

  पण हे आता बदलावे लागणार नाही तर पुण्यात आता जे लक्झरी फ्लॅट चे खुळ निघालय ना त्यात फक्त फिरायला जागच नव्हे तर ऑक्सिजन पार्क ची हि सोय बिल्डर लोकांना करुन द्यावी लागणार हे मात्र खरे.

  आशिष कुलकर्णी.
  http://maharashtramajha.blogspot.com

 2. VAISHALI said...
   

  ashish aple mhane agdi khare ahe....asha vicharanchi manse ektr ali na tr punyache viskatat janare rup nakkich susvarup hoil yat shankach nahi.......

 3. Neo said...
   

  पुणे, ता. १३ - झोपलेले असताना दरवाजा वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी परप्रांतीय दांपत्याला हवेली पोलिसांनी अटक केली. ....
  मुकेश रामसूची बिंद (वय ३०) आणि ज्योती मुकेश बिंद (वय २५) (दोघेही रा. हवेली, मूळ रा. बिहार) अशी अटक केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. ही घटना ११ डिसेंबरला घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राणू कुटे (वय ३८, रा. न्हेगावमळा, हवेली) घरी आले असताना घराला कुलूप दिसले. आपली बायको कोठे गेली, हे विचारण्यासाठी त्यांनी शेजारी राहणाऱ्या बिंद यांचा दरवाजा वाजवला. मात्र, झोपमोड झाली म्हणून चिडलेल्या बिंद पती-पत्नीने बांबूने कुटे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या वेळी डोक्‍यात आणि पोटात लागलेल्या जबर मारामुळे कुटे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवम संजय कुटे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आज पोलिस निरीक्षक बी. जी. मिसाळ यांनी या दांपत्याला न्यायालयात हजर केले.

 4. Neo said...
   

  http://pudhari.com/PuneStanikDetailNews.aspx?news_id=16913

  पुण्याचे सन्माननीय पोलीस कमिशनर मा. (या ’मा.’ अर्थ ज्याचा त्याने लावावा) जयन्त उमराणीकर ऑफ़िसमध्ये बसून काय धंदे करतात हे कुणी सांगू शकेल का?

 5. Anonymous said...
   

  hi ghatana nakkich changli aahe. pan pakshi asalele jhad todu naye ha vanakhatyacha kayadyanusar gunha aahe. adhikaryani kayda palala. kayadyachya aadhara shivay jar ashya goshti sarvatra ghadu lagalya tar nakkich mhanata yeyil ki "madusaki jivanta aahe"

  mala

 6. Anonymous said...
   

  Dev tumala ashich subudhi delo
  Satya
  London

 7. Deepa said...
   

  he khupcha chan zale.. agadi vishwas na basawa ase..sarwa adhikaryana dew w pakshi ashich sadbuddhi dewo

Post a Comment