व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अंध, अपंग विद्यार्थ्यांवर आली उपासमारीची वेळ

अंध, मतिमंद आणि अस्थिव्यंगांच्या निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान वर्षभराहून अधिक काळ रखडले आहे. त्यामुळे हजारो अंध, अपंग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आता देणग्या आणि उधार-उसनवारीवर त्यांची कशीबशी गुजराण सुरू आहे. अंध, मूकबधिर, मतिमंद आणि अस्थिव्यंग मुलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाने स्वयंसेवी संस्थांना निवासी शाळा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. राज्यात आजमितीस अशा साडेआठशे शाळा असून, त्यामध्ये सुमारे २१ हजार विद्यार्थी आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भोजन आणि अन्य खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दरमहा पाचशे रुपये अनुदान देण्यात येते. काही वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे राज्यातील या शाळांचे अनुदान थकले होते. परंतु, आता राज्याच्या तिजोरीत खणखणाट झाला, तरी हीच परिस्थिती कायम असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनुदान थकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था कशी करावी, हा प्रश्‍न संस्थाचालकांपुढे उभा राहिला आहे. सध्या उधार-उसनवारी करून किंवा कर्ज काढून किराणा माल, दूध, गॅस अशा वस्तू आणण्यात येत आहेत. देणग्या मिळविण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे. परंतु, शासनाने मंजूर केलेले हक्काचे अनुदान पदरात न पडल्याने मूळ प्रश्‍न तसाच कायम आहे. कधी अपुरे अनुदान मिळते, तर कधी काहीही मिळत नाही.

या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी दप्तरे, वह्यापुस्तके यासाठीचे अनुदान वेळेत न मिळाल्याच्या तक्रारी पूर्वीपासून करण्यात येत आहेत, तसेच कार्यालयीन खर्च आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी मिळणारे अनुदानही रखडले आहे; परंतु दिवाळीच्या सुटीत घरी गेलेले विद्यार्थी पुन्हा आल्यावर त्यांना भोजन कसे द्यावे, हा प्रश्‍न उभा आहे.

जेवणाचा प्रश्‍न तरी सोडवा

पुणे जिल्ह्यात अंध, अस्थिव्यंग आणि मूकबधिर यांच्या २४ शाळा असून त्यामध्ये एक हजार ४८५ विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी पाचशे यानुसार अनुदान गेल्या वर्षभराहून अधिक काळ मिळालेले नाही. येत्या तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येत आहे. तोपर्यंत राज्यातील विद्यार्थ्यांचा किमान जेवणाचा प्रश्‍न तरी सोडवावा, अशी मागणी या संस्थांकडून करण्यात येत आहे.
........
एकीकडे नको त्या गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च करणारे शासन दुसरीकडे मात्र अपंग- अस्थिव्यंगासाठीच्या निवासी शाळांना अनुदान देताना हात आखडता घेते. हे न पटण्यासारखे आहे. तुम्हाला काय वाटते तुम्हाला याविषयी? आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा, पुणे प्रतिबिंबच्या ब्लॉगवर...

5 comments:

  1. Anonymous said...
     

    Since our revenue minister spent so much money on his son's wedding reception & extraordinarily lavish dinner,the govt coffers are obviously empty & naturally,the axe fell on the grant for food for the helpless blind & handicapped!
    महसुल मंत्र्यांकडे आणखी पैसे लपवलेले असणारच.येइल कां त्यांना थोडा कैवार या बिचा-या विद्यार्थ्यांचा?
    सरकारने इतके अफ़ाट पैसे कररूपी गोळा केल्यावरसुद्धा ते अपुरे पडतात कारण हेतुपरस्सर बुडवलेल्या साखर कारखान्यांना,सहकारी बंकांना ,व जमिनी बळकावल्यामुळे आत्महत्येची पाळी आलेल्या शेतक-यांना वाचवण्याकरता पकेज देण्यात ते बहुतांशी संपतात,उरलेसुरले राज्यपाल व मंत्री आपल्या विमानप्रवासास वगैरे वगैरेसाठी खर्च करून टाकतात.
    आता आपले मंत्री शासकीय इतमामाने व खर्चाने पंढरपूरच्या वा-या करून सरकारच्या खडखडत्या तिजोरीत भर टाकावी अशी प्रार्थना करून आले आहेत.तर आशा करूया की देवाला तरी कीव येइल थोडी!!!

  2. Shekhar Shinde said...
     

    Kahi ek kam nasleli mahamandale sarkar karodo rupaye kharch karun chalu thevte, aani aandh, apang vidyarthyanchasathi paise nahit? Va re va! deva ittala aata tuch ya rajyakartyanchya rikamya dokyat paaus pad re baba.

  3. Anonymous said...
     

    All the misisters are basterds. They know how to fill their own pockets so nothing will happen it is some sensitive common people who will give some money to these guys. All the ministers and all the officers in the government should be made to stay in the huts and go to work on bycicles and whatever money is saved out of these should be given to these schools.

  4. Anonymous said...
     

    mhatla asta - yaa sarkaarche doke thikanavar aahe kaai?
    Gunda aani maalmattadhari sarkar chaalvtaayat - tae tyanchi bhalai karnyaasaathi - Mag britishanpeksha hae kaai vegle loak? British Talkansarkhyanchi yogyataa tari umjun hote. Aaj chya sarkaar madhe tevhdipan kuwat naahi. Shikshan samraat mukhyamantri vhaychi swapna pahattat - kashasaathi? kaai muk badhir shalanche prashna sodavnyasaathi? Mag shala uppasmaar yaa prashnanvar kaai apeksha thevnaar?

  5. Anonymous said...
     

    shikshan sachiv, deputy sachiv ya sarvanche adhikaar konate? ani kartavya konati? yaachi punha tya sarvanna janiv karun dili pahije...

Post a Comment