व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

जलवाहतुकीच्या माध्यमातूनही पर्यायी वाहतूक व्यवस्था

"" पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतुकीच्या विविध पर्यायांवर काम सुरू आहे. मेट्रो रेल, रिंग रोडच्या माध्यमातून वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यात मदत होईल; तसेच शहरातील नद्यांमधून जलवाहतुकीच्या माध्यमातूनही पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणार आहे,'' असं पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतंच सांगितलंय.

वडगाव शेरी इथल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

""नदीपात्रालगतच्या रस्त्यांप्रमाणे नदीतून जलवाहतूक करणे हासुद्धा चांगला पर्याय आहे. याबाबत प्राथमिक स्वरूपात अभ्यास करण्यात आला असून, पाच ते सहा किलोमीटर अंतरावर नदीत बंधारा बांधून, त्यात पाणी साठवून जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला जाईल; तसेच शिवणे ते खराडी या नदीपात्रालगतच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल,'' असंही त्यांनी सांगितलंय.

पुण्यातील सध्याची अस्वस्थ वाहतूक पाहता, हाच एकमेव पर्याय आहे, हे खरं. मात्र, शहर विकासाच्या इतर अनेक अर्धवट आणि अजूनही चर्चेतच असलेल्या प्रकल्पांप्रमाणेच हाही एक प्रकल्प ठरेल काय...? हा प्रश्‍न पुणेकरांना निश्‍चित सतावत असेल. आणि उद्या समजा झालीच जलवाहतूक सुरू, तर तिचं स्वरूप काय असावं नेमकं...? तुम्हाला काय वाटतं...?

8 comments:

 1. captsubh said...
   

  १]मुठा नदीच्या पात्रात पावसाळ्यातसु्द्धा अतिशय कमी दिवस पाणी सोडलेले असते कारण पानशेत,वरसगाव व खडकवासला धरणांत पूर्ण क्षमतेने पाणी साठवायला हे ३-४ महिनेच फ़क्त संधी मिळते.बाकी वर्षभर हे पाणी सबंध शहराच्या तसेच थोड्याफ़ार प्रमाणात शेतीच्या गरजा भागवण्यासाठी राखून वापरावे लागते.
  २]मुळामुठा संगमानंतर बंडगार्डनचा एकच बंधारा आहे ज्यामुळे त्याच्या पातळीपर्यंत पाणी साठवता येते.पण सर्व गाळ इथपर्यंत येवून साठतो या सबबीवर हा बंधारा पुष्कळ वादविवादानंतर थोडा फ़ोडण्यात आला व त्यातील पाणी वाहून जाउ लागले.
  ३]ज्या नद्यांना कायम पाणी असते,ज्यांचा उतार अगदी कमी असतो व ज्यांची पात्रे आसपासच्या जमिनीपेक्षा फ़ार खोल नसतात त्यात नदी मार्गाने जलवाहतूक करणे शक्य असते.
  उदाहरणार्थ कलकत्याची हुगली नदी जेथे भरतीओहोटी सतत चालू असल्यामुळे एका किना-यावरून दूस-या किना-यावर जायला मोटर लांचेसचा व वल्हवण्याच्या वा शिडांच्या बोटींचा चांगला उपयोग केला जातो.
  ४]पण ज्या मुठा नदीत पाणीच नाही व असलेला एकमेव बंधारा तोडण्यात आला तेथे आता आणखी बंधारे घालणे impractical आहे.
  तसेच जेथे बोटी चालवायच्या तेथे गरजेप्रमाणे खोली सतत टिकवावी लागते व त्यासाठी गाळ capital वा maintenance dredging करून सतत काढावा लागतो.
  ५]जमिनीवरच्या वाहतुकीच्या साधनांनी जलद वाहतुक शक्य असते,पण पाण्यातून सुरक्षीतपणे वाहतुक करायला अतिशय धिमी गती अवलंबावी लागते.तसेच बोटींमध्ये सुरक्षीतपणे चढायला उतरायला योग्य प्रकारच्या जेटी व त्यांच्यापर्यंत पोचायला रस्ते जागोजागी बांधावे लागतात व जेटींजवळ बोटींच्या draft पेक्षा जास्त पाणी सतत असावे लागते.
  ६]आपल्या देशातल्या नद्यांमधील वर्षातल्या ८-९ महिने पाण्याच्या दुर्भिक्षततेमुळेच inland water transport शक्य झालेले नाही.
  शिवाय मुळा नदीच्या पात्रात त्यामानाने जास्ती पाणी असूनहि सतत साठलेल्या जलपर्णीं[water hycinth]मुळे स्वयंचलीत नौका चालवणे अशक्यप्राय असते कारण त्यांच्या propeller मध्ये गाळ किंवा जलपर्णीं अडकल्यास त्या बंद पडतात.
  7]I write this with conviction on the strength of over 2 decades of experience of hydrographic surveying,dredging,piloting & marine construction etc in the notorious Hugli river & also experience as a technical officer of an Inland water transport unit of Corps of Engineers of the Army, including navigating in Bangla Desh rivers for transport of army troops,vehicles & POWs during/after the 1971 Indo Pak war.
  ८]पुरेसा अभ्यास न करता कुठल्यातरी खेडेगावातल्या कार्यक्रमात अशा कठीण विषयावर जाहीर घोषणा करणे राजकारण्याना फ़ार सोपे असते,पण माझ्या मते ही धूळफ़ेकच आहे.तसेच लगेच पुण्यातल्या मुख्य वर्तमानपत्रात प्रामुख्याने हे छापून येणे योग्य वाटत नाही.
  आता पालकमंत्री त्यांच्या पक्षाला PMC वर राज्य करण्याची संधी मिळाली म्हणून सर्वद्न्यानी असल्यासारखे प्रत्येक विषयावर बोलत आहेत.
  तसेच अशा योजना कितपत प्रत्यक्षात उतरवणे शक्य आहे याचा प्राथमिक अभ्यास करणा-या व्यक्तींचे knowledge व experience व त्यांनी तयार केलेला अहवाल व त्यास किती खर्च येणार हे प्रथम जाहीर करावे!
  आधी रस्ते,पब्लिक वाहतुक सुधारा,पुण्यातल्या व जवळच्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा ताबडतोब थांबवा व सर्व पुणेकर दुधखुळे आहेत असे समजून गाजराची आमिषे दाखवण्याच्या एवजी येथील लोकसंख्यावाढीला आळा घाला व पुण्यापासून दूर नवी शहरे स्थापन करण्याची काळाची गरज ओळखा नाहीतर पुणेकरांना या महाभागांसाठीच पर्याय शोधावा लागेल!!!

 2. Anonymous said...
   

  Thanks Mr.Bhate.. That's what experience means.. I couldn't have imagined so many factors and problems related to this issue. I am staying in a city which has huge underground subway transport system which is efficient, cheap and fast. It is as if the whole city has been tunneled for this purpose, probably at an extra-ordinary cost. The result? Extremely satisfying transportation system. Couple that with law abiding citizens and you have a dream travel. To travel the 3 kms of jorney, it does not take more than 2 minutes. (Imagine a safe journey from Chinchwad to Kothrud in less than 15 min) And now let's turn to Pune. From Chinchwad to Kothrud, it used to take me one and half hours on my bike. That too if there is no traffic jam. Plus there is a bonus of high blood pressure due to all those very charming residents of Pune and Pimpri-chinchwad, pollution and mental stress. Do you know what needs to convert the whole underground of a city (below five or six floors) into an efficient subway system? It needs dedication and commitment. And it needs people who are proud of their country. But the 150 years of slave mentality is so powerful, that we are mental slaves of the Congressi thieves, the BJP jokers, the Shivsena thugs and the remaining comedians. India will always remain a third world country and Indians will suffer like this because it is their destiny.

 3. captsubh said...
   

  If Inland water transport was feasible in Pune or elsewhere,we would have used it ages ago.

  The grandiose plan of joining Indian rivers too was put in cold storage & now we have the guardian minister making a grand announcement of making IWT the easy transport mode in the dry,filthy & widely encroached river flowing through the Pune city,where even roads have been built on the river bed!!!
  The naturally carved cross section is reduced so much due to all these unnatural activities & unauthorised dumping that whenever the dams release excess water in the monsoons,water overflows on both banks resulting in great losses.

  Near Karla,50000 truckloads of rubble has been dumped by builders in the quiet Indrayani river & yet the govt is only making paper enquiries & allowing the river to inundate vast areas on its banks in monssons.

  To build dykes to stop flow of water also means creating obstructions on its bed & jeopardizing the whole nearby areas in monsoons.Besides,if dykes are built across the river,launches cannot travel beyond the dykes & will run the risk of being swept over the dyke in event of engine breakdowns.

  Before talking so much,why not try the only small stretch between sangam bridge to the Bund at bund garden,which has some water coming mostly from the Mula river?

  जर राजकारण्यांनी व त्यांच्या पक्षांनी डोके खुपसले नाही व प्रत्येक प्रकल्पातून स्वःविकासासाठी किती पैसे मिळवता येतील याचा विचार केला नाही तर भारत देश कुठल्याकुठे केव्हाच गेला असता!

  PMC सत्तेवरून वरून जुन्या पक्षाची हकालपट्टी झाल्यावर आलेला दुसरा पक्ष पूर्वीच्या मानाने जरा बरी कामगिरी करू लागल्यावर लवकरच त्यांना गर्वाची बाधा झाली व आता पालकमंत्र्यांपासून कित्येकजण बिल्डर लोकांशी हातमिळवणी करून वाहत्या गंगेत आपले हात धुवू बघत आहेत.
  यांना विचारून बघा की पुण्यात/पुण्याजवळ किती शेकडो एकर जमिनी हे विकत घेत आहेत?पण हे जनतेसमोर मान्य करणे सोडाच,पण याची वाच्यतासुद्धा कधीच करणार नाहीत!सरकारी दप्तरात हे सर्व माहित असूनहि कर्मचारी गप्प आहेत!

  आजच्याच सकाळमधे बातमी आली आहे की पुण्यात आता ३३ मजली उत्तुंग इमारती उभ्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  ज्या लोकांना साध्या PMT वाहतुकीला मुंबईच्या BEST सारखे नीट करता येत नाही ते जनतेचे लक्ष दूसरीकदे विचलित करून BRT,Metro,Inland water transport वगैरे वगैरे मोठ्या महागड्या योजना सादर करत आहेत कारण त्यात पैसे खायला प्रचंड वाव आहे.

  As per the English saying "These people are trying to bite much more than what they can chew!"
  The whole cauldron stinks & as the second commentator has said,India can only be a "mahasatta" in terms of its overwhelming population!

  We have surplus land,but that too is being grabbed from farmers to promote EEZs,wineries,IT zones & what have you!Look at the cost of living,the cost of landed properties!!!

  "आम आदमी" ला केव्हाच "हाता"ने व "घड्याळा"ने महागाईच्या खाईत लोटून दिले आहे."इन्डिया शायनिंग" चे दिवस परवडले असे आता वाटू लागले आहे!!!

 4. Atul Kumthekar said...
   

  problem it seems is not in the traffic but having too many 'tadafdaar' nete trying to improve pune! Sugnyas adhik sangne n lage!!

 5. ATUL KUMTHEKAR said...
   

  (how to type in marathi font?)

 6. KHOGO PATIL said...
   

  Nilu fule style ek dialog taakTa yeil:

  kaaai roa (bamnanNo!) itha evhdi tiv-tiv kartaay Yeta ka election la ubhe rahayla? aaaraa dakhavaa ki tita...

  Aho hae sagla fakta shakti pradarshan aahe - paper yancha, baatmi yanchi mag idea pan yanchch (tyaach tyaach junya idea chaghlat basaycha aani dhulfek - hoa ti ataa fatka vadgaon sheritach - punyaat naai milat dhul ataa!)
  Aho hee nadya joad kalpan 65 salaapasun aahe. Prahna vicharla tar vaarti boat - pan idea matur aamchi haaa.

  Bhagirathacha warsa vaachlay? tya ektyaane kaai kaai kele. Matnri santri VISIT deun gele. aani paani youjanaa apan ajunhi kartoch aahot.
  Tae bhosale saayab kevhdi seva kartaayat deshaci! tyaasni join wha - mag tae noble laurette mhantyaati na - gi garibila gadun takka kaa kaai te! Baga - kaai ita kutaal karta basta. Shetkaryanno barya bolana builder na jamin vika - naahitar janmabhar shetich karu laavnyachi shiksha deto!
  Hyo amche leader. Kitti gwad.

 7. captsubh said...
   

  Shri.Atul Kumthekar,
  In order to type in Marathi fonts,you need to download free Indian multilingual s/w from site baraha.com.It is only 2 KB & can be safely installed on yr programme file drive with icon on yr desktop.
  To activate,just click on it & select 'Marathi'.While typing,you can toggle between Marathi & English by pressing on F11.On completion,right click to exit!
  You will need to persevere in initial days to get the hang of using English keyboard,but will learn it soon.
  All the best!

 8. Neo said...
   

  Here are my thoughts on an underground metro facility. It is a viable option and though it is expensive, it would prove cost-effective in the long run.

  https://www.blogger.com/comment.g?blogID=3008224590527248793&postID=2927137623253784885

Post a Comment