पाऊस आला.....!!!
बरेच दिवस तगमग होत असतानाच आता दुपारी पावसानं पहिली सलामी दिली. या सरीवर सरींनी मनालाही आल्हाद दिलाय... ऑफिसमध्येच असल्यामुळं खाली उतरून चिंब भिजणं शक्य नसलं, तरी मन मात्र ओलं झालंय. त्या भरून आलेल्या आभाळानी आणि बरसलेल्या धारांनी तृशार्त धराही चिंब झाली. तिचं ते चिंब होणं आपल्यापर्यंत पोचवलंय त्या मृद्गंधानी... आता खाली उतरून भिजता येत नसलं, तरी चहा आणि भजी मात्र शक्य आहे....
सो चिल आऊट विथ टी अँड भजी....
हां... पावसातली तुमची एखादी आठवण किंवा कविता इथे शेअर करायलाही हरकत नाही!
सो चिल आऊट विथ टी अँड भजी....
हां... पावसातली तुमची एखादी आठवण किंवा कविता इथे शेअर करायलाही हरकत नाही!
त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.
Amol
सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो
चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते
मग कलत्या उन्हात
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे
Vaibhavi
hi mi madhu,
paus mhanje mmmmm....
tumhi premala describe karu shakta..nahi ...mi pan nahi..mhanun mi pavsala hi decribe karat nahi..to anubhavte...rim jim gire savaan......
garam- garam unhachya tadakhyat
ekach tapora themb padto ani man ole karun jato....
jitakya vegane maz man dhav ghet akshakade titkyach vegane taplelya maticha sugandh pasarto chohikade...
ha sugandh athavan karun deto visarlelya smrutinchi, harvlelya devasanchi, aan gelya veli baraslelya meghanchi....janu kahi apalyala chahul karun detoy yenarya shavnachi
.... gauri
तुझ्या आठवनीत मि सखे वेडापिसा झालो
पावसालच तु समजून चिंब भेटूनि आलो
Paus Sohala zala ,kosaltya aathwanincha ,kadhi udhanata un kewha thembanchya santh layicha...
Paus aasa runzunta, paainjane sakhichi smarali, paul bhijat jatana ..chahul virat geleli....
nabha nako nako mhanatana, paus kashane aala... gatratun swachhandi un .......
antarat ghusamatlela......
paus aasa runzunata .....!!!!!!!!!
Paus ala paus ala,
rimzim padti gar gara;
Pahilya pavsacha,
ha rangach nyara,
Sabhovtali sari zade-fule,
agdich komejun geleli,
unhachya tya tadakhyane,
panehi galun padleli;
tarihi unhamagun paus yeto,
mhanun asha na sodleli;
Ani ashatach..
pahilya pavsachya agmanane
haluch ashi fulaleli.
Aajvarchya tya unhachya tadakhyane,
Mansehi gharat lapun basaleli..
Pavsachya mag barasnyane,
sarich fulun geleli.
bhijta-bhijta mothepan visrun,
ata lahnanmadhye haravleli.
Paus ala paus ala,
rimzim padti gar gara;
Pahilya pavsacha,
ha sara rangach nyara.
-geet2ash
घण घण घण गरजत घन आले दाटुनिया..
सर सर सर सरसावून सरी आल्या धावुनिया..
अवखळ अबलख वारा बेफ़ाम होऊनिया....
उडवी ओढणी माझी टाके भिववूनिया..
धीर कसा धरू मी कुणी नाही आधाराला
गेला कुठे सजना टाकुन मज एकटीला
संध्या ही सरत आली हाक मारु कुणाला
लखलख वीज चमकुन गेली काळीज भेदुनिया
शहारले अंग सारे धडधड काही थांबेना
पावसाच्या धाकाचा अंत काही दिसेना
चंचल मन हेलावुन साद देई सख्याला
थकले थिजले शरीर गेले मरगळुनिया
उंबऱ्यावर हळुवार त्याची पाऊले वाजली..
चटकन कशी काय सगळी घालमेल थांबली..
हरखुनि दिला देह सारा त्या हाती लोटुनिया..
पाही खिडकीतून अवघा आसमंत थबकुनिया..
abhijit yadav