प्रश्न सुटू लागलेत...!
वाहतुकीचा प्रश्न असो की पाण्याचा, अतिक्रमणाचा विळखा असो वा अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न, सिंहगड रोड परिसरात प्रशासनाकडून फार काही हालचाल होत नव्हती. या विविध समस्यांबाबत गेल्या महिन्यापासून आपण ब्लॉगवर आणि "सकाळ' प्रतिबिंब पुरवणीतून आवाज उठविला. त्यावर या समस्या सोडविण्याचे आश्वासन सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिले. सर्वांनी केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहेत. नागरिकांच्या काही समस्या आता सुटू लागल्या आहेत.
मांडलेल्या समस्यांपैकी विठ्ठलवाडी ते आनंदनगर परिसरातील ड्रॅनेज लाईनची झाकणे टाकण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर आता पदपथाचे कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचे नगरसेवक दादा जगताप यांनी सांगितले आहे. रस्ता दुभाजकामधील जागेत पूर्वी कचरा व राडारोड टाकल्याचे निदर्शनास आणल्यानंतर तेथे माती टाकण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मधील जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ओढ्यांच्या साफसफाईचे कामही सुरू झाले आहे. छोट्या-छोट्या गल्ल्यांमधील कचरा व राडारोडा साफ झाला आहे.
0 comments:
Post a Comment