व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कालच्या पानावरून पुढे...

आपण सिग्नल कधीही तोडू शकतो, याची आता खात्री पटत चालली आहे. सोबतचे क्‍लिपिंग सातारा रस्त्यावरचे आहे. बी.आर.टी., कात्रजकडून येणारी जड वाहने, याची पर्वा न करता सिग्नल तोडून बिनधास्त चाललेला स्कूटरस्वार येथे दिसतो. चित्रणात न आलेली महत्त्वाची गोष्ट अशी, हा स्कूटरचालक पुढे जाऊन एका मिनी ट्रकला धडकता धडकता वाचला! तरीही सिग्नल हे तोडण्यासाठीच असतात, असे आम्हाला वाटते!

4 comments:

 1. Anonymous said...
   

  http://darpg-grievance.nic.in/

 2. Ashwinis-creations said...
   

  पुण्यातील वाहतुकी विषयी जेव्हढे लिहावे तेव्हढे थोडे अशी परिस्थिती आहे.
  करिश्मा चौकात तर खरेच भीषण परिस्थिती आहे. अनेक लोक वाट्टेल त्या मार्गाने आपले वाहन घुसडण्याचा प्रयत्न करीत असतात. पुष्कळदा तर पोलीसही हतबल होऊन पहाताना दिसतात!
  पण यावर काहीतरी उपाय करायला हवा.
  मी असा विचार करीत होते की जेव्हा पिवळा दिवा लागतो तेव्हाच जर एक जाडजूड दोरखंड आडवा टाकला तर? पहिल्यांदा थोडी कट्कट होइल पण मग शिस्तीची सवय होइल हळूहळू. सिग्नल संपत आला की पुन्हा एकदा पिवळा दिवा लावावा...आणि दोर उचलून घ्यावा.
  दुसरा तर काही मार्ग दिसत नाही ...........

 3. manoj said...
   

  Hi,i am Manoj joshi from pune.ha tar ha jo problem ahe yat public chi kahi mistake nahi,because pratyek signal la ek traffic police asne he imp ahe,but tase hot nahi,bcaz traffice police asha place la nastat,te ek tar college road,main highway,ani ase spot jithe young mule bike warun yetat ani jatat,tithe he group ne thamblele astat agdi 10-12 lok astat,so sanga yana eka time la eka place la thambaychi garaj aste ka?pan nahi licence dakhav,licence asle tar puc dakhav,nahitar documents dakhav ya na tya reason ne,paise ghetat receipt magitali tar boltat ki mag jast paise lagtil.ase udyaog karayala yana time asto pan jya signal la garaj ahe tithe he thambat nahit,i mean yat thodi far mistake public chi pan ahe,pan tarihi police asla tar public jara carefull behave karte pan jevha samazte ki ithe koni nahi kiva koni naste mag public careless honarach.

 4. Anonymous said...
   

  Whoever has posted this site:

  http://darpg-grievance.nic.in/

  has S/he ever checked whether the case logged on this site is seriously looked into?

  I don't think so..rather I am sure it will not be..
  I have done it in past (1 year ago) still waiting for answer :-)

Post a Comment