नेतृत्वबदलातील अडचणी
* उत्तराधिकारी म्हणून कॉंग्रेसकडे मर्यादित पर्याय
* आताच्या परिस्थितीत पद स्वीकारण्यास प्रमुख नेते उत्साही नाहीत.
* मुंबईवरील हल्ल, लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतर लगेचच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुक, अशी चढत्या क्रमातील आव्हाने पेलण्याची नेतृत्वाची तयारी नाही.
* त्याउलट, देशमुख यांनाच कायम ठेवा आणि संभाव्य अपयशाचेही धनी त्यांनाच होऊ द्या.
या भावना आहेत कॉंग्रेसमधील नेत्यांच्या. देशातील सत्ताधारी आणि मोठ पक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षातील ही स्थिती नक्कीच कीव आणणारी आहे. जर कॉंग्रेसकडे पर्याय नसेल, तर का राष्ट्रपती राजवट लागू करू नये? तुम्हाला वाटते का, की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी?

सर्वात मोठी व खरी अडचण म्हणजे कॉंग्रेस अध्यक्षांना पदावरून हटविणे,पण गांधी घराण्यावाचून हा वृक्ष कोलमडू शकतो हे लक्षात घेवून त्यावर फ़ुकट वाढणारी बांडगुळे गप्प आहेत व आपापल्या पदरात काय पाडून घेता येइल याचा आढाव घेत आहेत!
अर्थात राष्ट्रपती रागवट लागू करूनहि फ़रक पडणार नाही कारण राष्ट्रपतींपासून राज्यपालांपर्यंत गांधी घराण्याचीच बिनकामाची एकनिष्ठ प्यादी बसविली आहेत!
जनतेनेच आता धडा शिकून काय ते करायला पाहिजे भावी निवडणुकांत,पण तेहि कितपत जमेल त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून राहिल!
नुकत्याच झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आहेत. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जनमत स्पष्टपणे विरोधी असतानासुद्धा राष्ट्रवादीला जास्त जागा कशा मिळू शकतात? या निवडणुकींची सी आय डी चौकशी करण्याची मागणी आम्ही नागरिक करीत आहोत.
जर निवडणुका भ्रष्टाचारमुक्त झाल्या नाहीत तर हेच दरिद्री सरकार परत येणार यात शंका नाही.
पैशासाठी कांहीहि करणा-या पुढा-यांना हल्ली निवडणुका रिग करणे हा हातचा खेळ झाला आहे.मतदारसंघाची पूनःरचना करतांना सोयिस्कर नसलेली कित्येक नांवेच पुण्यासारख्या मोठ्या शहरी अदृष्य[गायब] झाली आहेत.निवडणुकांच्या आधी एकदोनदा आवाहन केले जाते की नवीन मतदारयाद्यांत आपापली नांवे तपासून बघावी,पण असे करणे बहुतेकांना शक्य नसल्यामुळे कांही तपे त्याच पत्त्यावर रहाणारी माणसे मतदान करू शकत नाहीत.
इलेक्ट्रोनिक मतमोजणी करणारी यंत्रे नीट "रिग" केली तर कुणालाहि मत द्या,पण ते एका विशिष्ठ व्यक्तीच्या नांवे नोंदविले जाते,मग असे महाभाग कायम जिंकणारच!!!
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्व परिसीमा ओलांडून By hook or by crook ने पुन्हा निवडून यायचा चंगच बांधलेला आहे!
जसे भारताने कितीहि आरडाओरडा केला तरी जशी पाकिस्तानकडून भारताच्या वाटेला खरकटी ताटेंच येतात तशीच आम आदमीने कांहीहि मागण्या केल्या तरी त्याला कोण विचारत आहे?
सेशनसाहेबांसारखे कडक निवडणुक आयुक्त केव्हाच कालबाह्य झाले,आता आहेत उरल्या फ़क्त कठपुतळ्या!!!
Anonymous,दरिद्री सरकार कसे म्हणता,ते तर पैशांची खैरात करत आहे शेतक-यांवर,आतंक्यवाद्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबांवर व जखमींवर,हाजयात्रेला ला जाणा-या पिलग्रिमांवर,आतंक्यवाद्यांच्या केसेस लढविणा-या वकिलांच्या "फ़ी"वर,मंत्र्यांच्या देशभरात व देशाबाहेत स्वैर फ़िरण्यावर,मंत्र्यांच्या व राज्यकर्त्या पुढा-यांच्या झेड सिक्युरिटीवर,अपू-री पडतात म्हणून यांच्यासाठी नवीन बांधण्यात येणा-या आलिशान गेस्ट हौसेसवर [पुण्यात क्वीनस गार्डने येथे ६ कोटी रुपये खर्चून ही वास्तु उभी रहात आहे!],सरकारच्या सर्व खात्यांच्या विकासकामांच्या कौतुकाच्या जाहिरातींवर इत्यादि इत्यादि!!!
दरिद्री झाला आहे आम आदमी ज्याला आजहि सर्व अन्नधान्ये,घरे,पेट्रोलडिझेलसाठी प्रचंड किंमत मोजावी लागत आहे किंवा एक वेळचे जेवण सोडून लंघन करावे लागत आहे.
"रोटी,कपडा और मकान" चा नारा देण्या-या सरकारला जास्त काळजी आहे शेअर मार्केटमधील उताराची म्हणून प्रत्येक बातमीत सेन्सेक्स वधारल्यावर त्याचे आंकडे सांगण्यात येत आहेत!
तरीहि काळजी नको, आहेत दिल्लीला एक महान पक्षाध्यक्षा व त्यांचा राजपुत्र सांगायला " देशाची काळजी नको,पण स्वतःची काळजी घ्या" कारण आहेतच आमचे "सक्षम चेले"[Read here as अकार्यक्षम,घाबरट पण पक्षाच्या अध्यक्षांना एकनिष्ठ!] तुमची आजन्म सेवा करायला !
फ़क्त हिंमत,कणखरपणा,स्वाभिमान या दृष्टीने मात्र हे सरकार दरिद्री जरूर आहे! आलिया भोगाशी असावे सादर!!!