व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

हे तर राजकीय युद्ध

दोन दिवसांपूर्वीच मुंबईवर आलेलं दहशतरुपी संकट हाताळताना आलेल्या अपयशामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

तर राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जाहीर केले. दबावाखाली येऊन त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांनी निर्णयच घेतला असेल, तर राजकीय शिष्टाचार पाळण्याची गरज आहे का? या एकूण राजीनामानाट्यावरून श्री. देशमुख यांचा सत्तेचा हव्यास अजून सुटत नाहीये, असेच लक्षात येते आहे.
लोकशाही राष्ट्रातील नागरिक म्हणून तुम्हाला आपली मते व्यक्त करावीशी वाटत असतील.

मुंबईतील प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असे तुम्हाला वाटते का?

अन्‌ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत कोणाला पहाता? पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण की नारायण राणेंना?

तर, बडे बडे शहरोंमें एसी छोटी छोटी बातें होती रहती हैं....! असा फिल्मी डायलॉग मारणाऱ्या आबांना एवढी मोठी घटना किरकोळ वाटावी? त्या पार्श्‍वभूमीवर आबांचा राजीनामा तर अटळच होता. ज्याच्या हातात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्या व्यक्तीला असे बोलणे शोभते का?

2 comments:

 1. Anonymous said...
   

  कॉंग्रेस पक्षातील प्रचलीत कार्यपद्दतीनुसार, मुख्यमंत्री या पदाकरिता निवड करण्याचा एकमेव दंडक म्हणजे त्या व्यक्तीची नेहरू-गांधी घराण्याशी निष्ठा. विधानसभेच्या पक्षाच्या आमदाराना या बाबतीत काहीच किंमत नाही. सोनिया गांधीचा आदेश शिरसावंद्य मानण्याकरिता प्रसिद्ध असलेले सुशिलकुमार शिंदे यांचीच निवड समुख्यमंत्रीपदाकरिता होणार हे निश्र्चित आहे.
  मोहन दड्डीकर
  पुणे

 2. captsubh said...
   

  ज्या कारणाकरता महाराष्ट्रातील मंत्री बदलले जात आहेत त्याकरता सर्व मंत्रीमंडळानेच राजिनामा देवून राष्ट्रपती राजवट स्थापन करण्याची शिफ़ारस करायला हवी होती,पण यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना रस तसेच धमकहि नाही हे केव्हापासून माहित होते.

  सर्वात मुख्य म्हणजे कॉंग्रेसच्या सर्वसर्वेषांची कातडी संभाळणे! त्यासाठी लाचार असलेले पक्ष कार्यकर्ते लोटांगणे घालतच आहेत.
  गांधी घराण्याशी निष्ठावंत अशा एका ठराविक व्यक्तीवर आधीच शिक्कामोर्तब करून केवळ लोकशाहीच्या सोपस्कारासाठी तिला मुंबईत निवडा असे बजावून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसविले गेले तरी ख-या अर्थाने कांहीहि फ़रक पडणार नाही कारण हे सर्व देशाचे/राज्याचे चोरच आहेत.भ्रष्टाचाराला या पक्षाने नुसते अभयच दिलेले नाही तर त्याची खतपाणी घालून आणखी लागवड केलेली आहे,त्यामुळे हे एके काळचे रोपटे आता फ़ोफ़ावलेला वृक्ष झालेला आहे.

  श्री.आबा पाटिल यांनी स्वखुषीने राजिनामा दिला व त्यानंतर सरकारी घराचा व लवाजम्याचा ताबडतोब त्याग करून ते आपल्या गांवी रवाना झाले यातूनच त्यांचा प्रामाणिकपणा लक्षात येतो.त्यांच्या कारकिर्दित डान्स बारवरील बंदी,परप्रांतीयांच्या बद्दलच्या आंदोलनात ठाम निर्णय,त्यांचा सरळ व साधेपणा वगैरेबद्दल त्यांचे जनमानसातील स्थान उंचावले होते.पण असे व्यक्तीमत्व विरळच असते!

  बाकी उरले आहेत सत्तेच्या हव्यासासाठी आसुसलेले भ्रष्टाचारी व हावरे कारस्थानी! Public memory is short हे लक्षात ठेवून जुनेच कुठलेतरी प्यादे पुन्हा पावडर व क्रिम वगैरे लावून महाराष्ट्रात उभा करून नव्या मोठ्या घोषणा केल्या व सर्व कांही स्थिरस्थावर आहे असे दर्शविले म्हणजे दिल्लीच्या हाय कमांडला स्वतःवरचे संकट दूर झटकले असे समजून थोडी विश्रांती घेता येइल!

  पण आता परिस्थिती जरा वेगळी आहे व अजूनहि कांही आतंकवादी याच मुंबईत लपून त्यांच्या पुढच्या हल्ल्याची तयारी करत आहेत हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे कारण या विषयावर परस्परविरोधी बातम्या रोजच येते आहेत! सामान्य माणसाला जरा जपूनच रहाण्याची व खुप विचारपूर्वक मतदान करण्याची वेळ आली आहे,नाहीतर आपले खरे नाही यापुढे!

Post a Comment