व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

आत्महत्या थांबविण्यास "पॅकेज' हा उपाय नाही

पुणे, ता. १ - ""विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी "पॅकेज' हा उपाय नाही. त्यामुळे हे प्रमाण वाढणारच आहे. त्याऐवजी शेतीची पायाभूत साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी शनिवारी व्यक्त केले.
समाजाला पर्यावरणरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे, यासाठी "क्रिएशन एंटरटेनमेंट' आणि म्हैसकर फाउंडेशनतर्फे "सृष्टी' हा नृत्याविष्कार आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी राजेंद्रसिंह बोलत होते.

ते म्हणाले, ""शेतकऱ्यांना पैशाचे नियोजन करता आले नाही, अशांसाठी पॅकेज जाहीर करणे म्हणजे आत्महत्या वाढविण्याचा खेळ आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आत्महत्येचे मूळ कारण समजून घेऊन त्यावर मार्ग काढणारी यंत्रणा सरकारने उभी करावी.''

या वेळी राजेंद्रसिंह यांनी पाण्याविषयी भारतामध्ये परंपरेतून आलेली आत्मीयता, राजस्थानमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून केलेला कायापालट, नदी प्रदूषण, सरकारची भूमिका, पाणी प्रश्‍नाशी निगडित विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले.

ते म्हणाले, ""भारतीय संस्कृतीत पाण्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच पूर्वजांनी विविध परंपरांच्या माध्यमातून पाण्याविषयी वाटणारी कृतज्ञताही जपली. मात्र, तंत्रज्ञान, विकासाच्या मागे धावणाऱ्या आपल्या पिढीला याची जाणीव नाही. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडला आहे. प्रदूषण, बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, भूजल शोषण यामुळे देशातील १४४ लहान-मोठ्या नद्यांवर संकट आले आहे. तरीही सरकार या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत आहे. समाजाने सरकारवर दबाव आणला तरच यावर मार्ग काढणे शक्‍य आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

घरातल्या पाण्यापासून ते समुद्रापर्यंत पाणी कोणतेही असू देत, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात "सृष्टी' हा नृत्य-संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. कथक, लोकसंगीत व दृक्‌श्राव्य माध्यमातून पर्यावरणरक्षणाचा संदेश या वेळी त्यांनी दिला. प्रसिद्ध नृत्यांगना रोशन दात्ये यांनी या बॅलेचे दिग्दर्शन केले होते. अनघा घैसास यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

श्री. राजेंद्रसिंह यांनी केलेले प्रतिपादन योग्यच आहे. शेतकऱ्यांमधील आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. केवळ पॅकेज वाढवून हा प्रश्‍न सोडविता येणार नाही. तर, प्रश्‍नाचे मूळ शोधला पाहिजे. आपल्याला आणखी काही उपाय सांगावेसे वाटतात का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याप्रकाची पावले उचलली गेली पाहिजेत?

5 comments:

 1. Shrikant Atre said...
   

  I think following example of Israel and / or Russia, China could be the best in interest of our farmers.

  What they need to do is,
  A. Form a agro society when they own small land-pieces, to a scale of min 5000 hectars.
  B. The group should be managed by SAHAKARI principles but not INDIAN corrupt Sahakar. What I mean is it should be run by professionals who will work for the society's interests on pay basis.
  C. Land owners shall grow, transport and sell products directly to markets and as a Government Obligation, Government will buy 50% of products at pre-negotiated rates.
  D. Foreign and Indian Insurance companies shall provide cover to crops at reasonable values.
  E. PROFIT will be a motive of these societies and the same can be paid in advance by Government as Salaries to farmers and later deduct those from actual profits. (Here, the current "so called package money" can be used.)

  If anyone in the society area resorts to creating tensions or does damage to society land or crops, s/he should be detained immediately by security / police and put behind bars. This should apply to all politicos who want to disturb this process.

  One may think its more like Marxist Farming Concept, but in reality, only this could be a successful solution to stop the suicides.

  Just declaring huge amounts of Packages etc wont stop suicides as I doubt whether the money actually reaches the people.

 2. captsubh said...
   

  ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे पाण्याचा अपव्यय या विषयावरील विचार भावले.तसेच श्री.श्रीकांत अत्रे यांचे विचार व सुचना पूर्णपणे पटल्या.

  शेतक-यांच्या आत्महत्त्या थांबविण्यासाठी किती वर्षे पॅकेज देत रहाणार? ते जाहिर झाल्यानंतरहि आत्महत्त्या चालूच आहेत.शेतक-यांना,साखर कारखान्यांना अशी पॅकेज देणे हेच मुळात चूकिचे आहे!त्यामुळे त्यांची कार्यक्षमता,प्रामाणिकपणा घटत जातो,आळशीपणा वाढत जातो व जाणुनबुजून बुडविलेल्या कर्जांची व्याप्ती वाढतच जाते!

  नद्या,तळी व इतर स्त्रोतातील जलसंपत्ती राष्ट्रिय समजून तिचे जतन केले पाहिजे.पण त्याउलट चित्र सतत आपल्याकडे बघायला मिळते! केंद्र व राज्य सरकारे याबाबतीत अतिशय उदासीन आहेच,शिवाय बरेचसे नागरिकपण या पाण्याच्या स्त्रोतांचा योग्य व आवश्यक विनिमय करण्याऐवजी त्याची नासाडी,प्रदुषण करण्यात भुषण समजतात!
  सर्व प्रकारचा कचरा व राडारोडा अनिर्बंध टाकायला नद्यांची व तलावांची पात्रे अव्याहत वापरली जात आहेत.

  निसर्गाने खोदून काढलेल्या/नैसर्गिक रीत्या तयार झालेल्या या ठिकाणी अतिक्रमणे चालू आहेत!
  मुंबईजवळची मिठी नदी,पुण्यातील मुळामुठा नद्या,कार्ला/लोणावळ्याची इंद्रायणी नदी,तसेच उत्तर भारतातील गंगा यमुना नद्या वगैरे अतिक्रमणामुळे व कचरा/राडारोडा टाकल्यामुळे दुषित,अरूंद व उथळ झाल्या आहेत व पावसाळ्यात त्यांच्या किना-याजवळच्या भागात पूराचे पाणी पसरून हाहाकार करत आहेत!

  सरकार व महानगरपालिका सदा झोपलेल्या कशा या बाबतीत? आपल्याकडे वर्षातील फ़क्त ३-४ महिने पाउस पडतो व धरणे सोडून इतर सर्व पाणी समुद्रात वाहून जाते व पाण्याचे दुर्भिक्ष लवकरच भासू लागते तरी या बाबतीत इतकी अनास्था कां?

  लाखो एकरांतील शेतजमिनींना पाण्याची गरज वर्षभर असूनहि पाणी साठवले जात नाही,नवे बंधारे घातले जात नाहीत,त्याउलट हजारो पंप दिवसरात्र चालवून भुजल शोषल्यामुळे त्याची पातळी खालीखाली जातच रहाते व आणखी खोल,पण न परवडणा-या नव्या बोअरवेल खोदाव्या लागतात!
  शेतक-यांनी अशा परिस्थितीत करायचे काय? पिक घेता आले नाही म्हणून सरकारला पॅकेजसाठी साकडे घालायचे? तसेच मंजुर झालेल्या पॅकेजचे बरेचसे पैसे मिडलमेन,राजकारणी,एजंट मधल्यामधे खाणार व अतिशय थोडे पैसे गरजूंच्या हाती पडणार हे नित्यनियमाचेच झाले आहे!मग आत्महत्त्या चालू राहिल्या तर नवल नाही!

  कॅप्टन सुभाष भाटे[निवृत्त}

 3. captsubh said...
   

  हल्लीच्या राज्यकर्त्यांना सरकारने जनतेच्याकडून शंभर निरनिराळ्या करांच्या रूपात गोळा केलेले कोट्यावधी रुपये कधीहि व कसेहि उधळून टाकायची प्रवृत्ती फ़ारच वाढत चालली आहे!
  देशाच्या कृषीमंत्र्यानी नागपुरला महाराष्ट्र सरकारला सल्ला दिला की सोयाबीन शेतक-यांना तसेच कास्तकार,बलुतेदार वगैरे वगैरेनापण आर्थिक मदत द्यावी व ती कमी पडली तर बापजादे केंद्र सरकार आहेच!

  ही दुसरी कर्जमाफ़ी संसदेमध्ये संमत न होउनहि असा सल्ला द्यायला ते स्वतःला देशापेक्षा/राज्यापेक्षा मोठे समजू लागले आहेत हे स्पष्ट दिसत आहे.
  एकदा सरकारी तिजोरी/बँकां यातील ७१००० कोटी रुपयांची खिरापत जिथे गरज नव्हती तेथेसुद्धा वाटून व त्यातील बरीचशी दलालांनी व राजकारण्यांनी मधल्यामधे खावून यांचे समाधान झालेले दिसत नाही! सारखी सारखी पॅकेज जाहिर करून एक अनिष्ट पायंडा पडत चालला आहे!

  या सरकारचे फ़ार दिवस शिल्लक नसतांना अशा घोषणा करायला कांहीच वाटत नाही? कां ही व्यक्ती सबंध महाराष्ट्रातील एकमेव सर्वज्ञानी आहे व तिला मनात येइल ते म्हणायला मुभा आहे?

  निकृष्ट प्रतीचा ३००० कोटी रुपयांचा गहु आयात करून तो स्वस्त धान्य दुकानांतूनसुद्धा विकला गेला नव्हता त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले होते याबद्दल गदारोळ झाला नाही म्हणून कृषीमंत्री याचा दोष Food Corporation वर टाकून मोकळे झाले होते!

  चारा घोटाळ्यात १००० कोटी रुपये गिळंकृत करणारे लालूप्रसाद आजहि रेलमंत्रीपद भुषवित आहेत! कारण कां तर याकोणी UPA सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर ते कोसळणारच! मग मायबाप कॉंग्रेस सरकार असा धोका कसा घेणार? म्हणुनच अनेक पक्षांच्या साह्याने स्थापन झालेले डळमळीत सरकार तरीहि तरून जाते कारण ते आपल्या मित्रपक्षनेत्यांच्या सर्व अपराधांकडे कानाडोळा करते!

  तसेच तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या शिबु सोरेनना अणुकराराबाबतच्या चर्चेवेळी सरकारच्या बाजुने मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्रीपद बहाल करते!

  काय चालले आहे आपल्या देशात? वर्तमानपत्र हातात घ्या व फ़क्त अशाच बातम्या झळकतांना दिसतात!

  प्रामाणिकता व सचोटीबद्दल ख्याती असलेले अराजकीय पंतप्रधान गेल्या ४ वर्षात खालच्या दर्जाचे मुरब्बी राजकारणी कसे झाले?
  सर्व माहित असूनहि हे world class economist एका झटक्यात मोठाली "पॅकेज" वाटू लागले?
  देशाला चांगले नव्हे तर फ़ार वाईट दिवस येणार आहेत अशा धोरणांमुळे व भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करण्यामुळे!

 4. Gangadhar Mute said...
   

  * औंदाचा पाउस *
  सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी,
  कोमात गेलं शिवार सारं, व्वारे पाऊसपाणी .1.

  ऊन्हाळवाही-जाम्भुळवाही, शेती केली सुधारित,
  बी-बेनं खत-दवाई, बिटी आणली उधारित,
  नवं ग्यानं, नवं तंत्र, उदिम केला पुरा,
  पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा,
  खण्गुन गेली कपाशी, बोण्ड बोरावानी .2.

  बेनारचा बाबू म्हणे कापुस नाही बरा,
  औंदा पेर सायबीन, बरकत येई घरा,
  नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते,
  रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते,
  बिनपाणी हजामत, चित चारखानी .3.

  सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे,
  अक्कल नाही तूले म्हणून, भरले नाही दाणे,
  विहिरित नाही पाझार,नयनी मात्र झरे,
  किसाना परिस कईपट,चिमण्या-पाखरं बरे,
  भकास झालं गावकूस,दिशा वंगळवाणी .4.

  . गंगाधर मुटे
  . gangadharmute@gmail.com http://gangadharmute.blogspot.com/

 5. Gangadhar Mute said...
   

  शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच
  चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक
  मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले
  तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्त्येची
  कारणमीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची
  आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत
  नाही.
  Incomplite
  गंगाधर मुटे
  For more Pls visit
  http://vidarbhashetkarisabha.blogspot.com/

Post a Comment