वाहतूक कोंडीवर उपाय ६८ चौकांत "रिमोट'द्वारे सिग्नलचे नियंत्रण
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वाहतुकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ६८ प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे नियमन "रिमोट कंट्रोल'द्वारे येत्या दहा दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
रिमोट कंट्रोलद्वारे वाहतूक दिव्यांचे नियमन करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. शहरात सुमारे २०० चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे आहे. त्यातील ६८ चौकांत तातडीने वरील योजना अमलात आणण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी महापालिकेकडे १२० रिमोटची मागणी केली असून ती तत्त्वतः मंजूर करण्यात आली आहे. शंभर मीटर अंतरापर्यंत रिमोटची कक्षा असेल. त्यामुळे चौकाच्या कोणत्याही भागातून वाहतूक पोलिस त्या दिव्यांचे नियमन करू शकतील. सध्या वाहतूक दिव्यांत ठराविक वेळेनुसार बदलाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वाहतूक असलेल्या रस्त्यासाठी वेळ कमी करून अधिक वाहतूक असलेल्या रस्त्यासाठी वेळ वाढविता येत नाही, तसेच कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नियमन करण्यावर मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर रिमोट उपयुक्त ठरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील ३८ चौकांतील वाहतूक "एरिया ट्रॅफिक कमिटी'द्वारे नियंत्रित होतात. त्यात आणखी ३० नव्या चौकांची भर पडणार आहे. त्याशिवाय ४० नवे वाहतूक दिवे महापालिका उभारत आहे. "रिमोट'द्वारे नियमनाची मॉडर्न चौकात दोन दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी झाली, असेही त्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे -
- शहरातील दहा प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल "सिंक्रोनाइझ' होणार
- पोलिसांवर हल्ला करणाऱ्याचा वाहन परवाना निलंबित होणार
- कागदपत्रे नसलेल्या ५०० रिक्षा अद्याप पोलिसांच्या ताब्यात
- चौकात वाहतुकीला अडथळा करणारे २७ बसथांबे हलविणार
- पाणी साचणाऱ्या ३१ ठिकाणी निचरा करण्याची मोहीम
- गोळीबार मैदान चौक ते हॉटेल अरोरा टॉवरपर्यंत एकेरी रस्त्याचा प्रस्ताव
- चारचाकी वाहनांचे पार्किंग शुल्क तीन तासांनंतर तासानुसार आकारण्याचा प्रस्ताव

या रिमोट कंट्रोल यंत्रणेचा काही फायदा होईल, असे वाटते का? बहुतांश चौकांमध्ये पोलिसांचा पत्ता नसतो. अशावेळी या रिमोटकंट्रोलचा वापर होण्याऐवजी ती डोकेदुखी वाटू लागेल. आपल्याला काय वाटते याविषयी?
Vaahtuk kondivar remote dwaare niyantran karnyat yenar ahe hi changli gosht ahe pan tya adhi...
Punyatale kiti vaahan dharak signal paltat yacha abhyas vhava.
Shaalkari mule, vruddh nagrik yanna saral pane signal jevha laal asel tevha rasta olandata yeto ka yachi pahaani vhavi.
Signal javal ZEBRA CROSSING navacha kahi prakaar asato yachi kiti duchaki dhaarakanna mahiti ahe yacha vichar vhava.
Ya sadhya goshti palun jar remote dwaare niyantrit kelele signal palale gele tarach tyala kahi tari artha ahe...
ANYATHA PAHILE PADHE PANCHAVANN!!!!!!!