व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

मित्राने २३ लाख बुडविल्याने कुटुंबाचा अंत

पत्नी आणि दोन मुलांचा दोरीने गळा आवळून खून करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरीच्या मिलिंदनगरजवळ रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास उघडकीस आली. पतीने पत्नी आणि मुलांना पावभाजीतून विष दिल्याचेही आढळले.

उसनी दिलेली मोठी रक्कम वसूल न झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विजय मुथय्या पुजारी (वय ४५), पत्नी सुगंधा (वय ४०), मुलगा प्रतीक (१२) आणि मुलगी प्रेरणा (१८, रा. सर्व मिलिंदनगरजवळ, व्हिक्‍टरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी कुटुंबीय मूळचे कर्नाटकचे असून, गेल्या ३० वर्षांपासून शहरात स्थायिक झाले होते. त्यांचा मुलगा प्रतीक पाचवीत शिकत होता; तर प्रेरणा एम. यू. महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.

सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांचा मृतदेह छताच्या हुकाला लटकलेला होता. त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांच्या गळ्यांवर दोरीने आवळल्याच्या खुणा आढळल्या. विजय यांच्याजवळ एक चिठी सापडली आहे. ""एका मित्राला २३ लाख रुपये दिले होते. ते परत करण्यासाठी मित्राने दिलेले दोन धनादेश न वटल्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,'' असा मजकूर या चिठीत आहे.

अशाप्रकारे घरातील इतर सदस्यांचा खून करून आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. आर्थिक तोटा सहन करावा लागला महणून आत्महत्या करणे, हा मार्ग होऊ शकत नाही. शिवाय आर्थिक फरवणुकीच्या घटनाही अलीकडे वाढलेल्या दिसतात. बेभरवशाच्या आजच्या जमान्यात कोणाशीही एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करणे सर्वसामान्यांनी टाळायला हवे. नाही का...?आपल्याला काय वाटते, याविषयी? आपणही अशा घटना आजूबाजूला पाहिल्याच असतील. तर, आमच्याशी त्या शेअर करा, पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर

4 comments:

  1. Anonymous said...
     

    ह्या दुर्दैवी आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे देशातील प्रचलीत न्यायसंस्थेकडून आपणास त्वरीत न्याय मिळणार नाही अशी सर्वसामान्य माणसाची खात्री झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा अफाट पैसा व अंतीम निर्णय होण्यास दीर्घ कालावधी यामुळे अन्यायाविरुद्ध दाद लागणे जवळजवळ अशक्यच झाले आहे. त्यामुळे गुंडाना व धनदांडग्याना रान मोकळे झाले आहे. भ्रष्ट राजकारणी व नोकरशाहीमुळे या परिस्थितीत काही सुधारणा होईल असे वाटत नाही. नीतीने वागणार्‍या लोकाना यापुढे या देशात जगणेच अशक्य झाले आहे. त्यांच्यापुढे आत्महत्या करणे हाच एकमेव मार्ग मोकळा आहे.
    मोहन दड्डीकर,
    पुणे

  2. Anonymous said...
     

    You hit the nail on the head.

    आपला वाली फक्त भगवानच आहे. आत्महत्या करणे हे उत्तर असू शकत नाही अशा मतांच्या लोकांनी न्यायालयांशिवाय दुसरा मार्ग सांगावा.

  3. Anonymous said...
     

    आहे ना, दुसरा मार्ग आहे ना. गप्प बसावे आणि मरणाची वाट बघावी. कॉंग्रेस सरकारकडून जरा शिका.

  4. Anonymous said...
     

    कार्यक्षम व प्रामाणिक कायदेमंडल, पोलिस यंत्रणा, व न्यायदान या तीन संस्था समाजात शांतता ठेवून देश प्रगतीपथावर नेणार्‍या मूलभूत गरजा आहेत. या सर्व संस्थांचा मूलभूत पाया घातला आहे तो इंग्रजी राज्यकर्त्यानी. त्याला आज जवळजवळ दीडशे वर्षे झाली. त्यासंबधात त्यावेळी केलेले कायदे व नियम आता कालबाह्य झाले असून त्यांत आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. पण या कालबाह्य झालेल्या कायद्यामुळेच अमाप भ्रष्टाचार करूनही उजळ माथ्याने आपण समाजात वावरू शकतो याची राज्यकर्ते व नोकरशाही याना खात्री पटली आहे. त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यात त्याना यत्किंचितही रस नाही. शिवाय कोणताही दूरगामी बदल करताना लोकप्रतीनीधींची तेवढी विचार करण्याची बौद्धिक क्षमता असावी लागते. भारतीय मतदारांची निरक्षरतता व वैचारिक कुवत पाहता, त्यानी निवडून दिलेल्या प्रतीनिधीकडून ही क्षमता अपेक्षा करणे हे चुकीचे ठरेल.अजून शंभर वर्षे तरी यात कांहीही फरक पडणार नाही याची मला तरी खात्री आहे.
    मोहन दड्डीकर
    पुणे

Post a Comment