व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

बच्चन यांच्या माफीपूवर्वी घडले पडद्यामागचे नाट्य

जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे मागितलेली माफी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मान्य केली असली तरीही गेल्या ४८ तासांत पडद्यामागे वेगळे नाट्य घडल्याची चर्चा आहे.

जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर मनसेने बच्चन कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यानंतर प्रचंड वादळ उठले. बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर महाराष्ट्राची व मुंबईची जाहीर माफी मागितली. बच्चन यांनी ब्लॉगवर मागितलेली माफी पुरेशी ठरेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती; पण राज ठाकरे यांना जाहीर माफी हवी होती. जर मराठी माणसाचा जाहीर अपमान होत असेल तर माफीसुद्धा जाहीर हवी, ही त्यांची भूमिका होती. राज ठाकरे यांच्या ठाम भूमिकेमुळे अमिताभ बच्चनही पेचात पडले. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना साकडे घालण्याची तयारी केली. मातोश्री निवासस्थानी शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन त्यांनी आता मार्ग काढावा, अशी कळकळीची विनंती बच्चन यांच्याकडून केली जाणार होती; पण सध्याच्या वातावरणात ही भेट योग्य ठरणार नाही, असा संदेश मातोश्रीवरून आल्यामुळे अमिताभ बच्चन मातोश्रीवर गेले नाहीत. फक्त बच्चन व शिवसेनाप्रमुखांचे दूरध्वनीवर बोलणे झाले. या वेळी बच्चन यांनी त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर बच्चन यांची पत्रकार परिषद झाली, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

बच्चन यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका उद्या मांडणार असल्याचे तातडीचे निरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रसिद्धिमाध्यमांना धाडण्यात आले. पण राज ठाकरे यांच्यावर भाषणबंदी असल्यामुळे ते आपली भूमिका कशी मांडणार याबाबतही खुद्द मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये साशंकता होती. अखेर राज ठाकरे यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी पोलिस आयुक्त हसन गफुर यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानंतर आमदार बाळा नांदगावकर यांच्या मध्यस्थीने राज ठाकरे व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही चर्चा झाली व त्यामध्ये राजकीय तोडगा निघाल्याचे सांगण्यात येते. पण सकाळी आयुक्त गफुर यांनी राज ठाकरे यांना परवानगी नाकारली. कारण त्यांच्यावरील भाषणबंदी ही सहायक पोलिस आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे, त्यामुळे त्यांच्याकडेच परवानगी मागावी, असे सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त भांगे यांच्याकडे केवळ पत्रकार परिषदेसाठी लेखी परवानगी मागितली. त्यामुळे भांगे यांनी राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेची परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आर.आर. यांचाही फोन तत्पूर्वी गणपती व रमजानचे सण ध्यानात घेता व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ध्यानात घेता उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सकाळी राज ठाकरे यांना फोन केला व पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याची सूचना केल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते.

बच्चन कुटुंबियांना माफ केल्याची घोषणा करण्यासाठी राज ठाकरे यांनी एवढा अट्टाहास का केला? असा कोणता दबाव त्यांच्यावर आला असेल? या प्रकरणामागे नक्की काय झाले असेल.

11 comments:

  1. Anonymous said...
     

    जर मराठी माणसाचा जाहीर अपमान होत असेल तर माफीसुद्धा जाहीर हवी, ही राज ठाकरे यांची भूमिका योग्य होती आणि आहे. भाषणबंदी असल्यामुळे आणि कायदा पाळीत असल्यामुळे पत्रकार परिषद घेण्यासाठी त्यांना परवानग्या घ्याव्या लागल्या. हे सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिकाचे लक्षण आहे. त्यात त्यांनी काय अट्टाहास केला? उगाचच तर्कवितर्कांना जन्म देउन राजकारण का खेळता? सामान्य लोकांचा राज ठाकरे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यांच्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही आणि ते कुणापुढे झुकणारही नाहीत.

  2. Naresh Rawatala said...
     

    मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'गुड्डी आता बुढ्ढी झाली तरी तिला अक्कल आलेली नाही', असे विधान करून समस्त स्त्री जातीचा अपमान केला आहे. ठाकरे यांचे विधान महाराष्ट्राच्या संस्कृतीत तर मुळीच बसत नाही. स्त्रियांच्या अकलेचे वाभाडे काढणे राज ठाकरे यांना अजिबात शोभले नाही.
    दरम्यान,मुंबईचे पोलिस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांनी मुंबईविषयी केलेले वक्तव्य त्यांच्यासारख्या जबाबदार पोलिस अधिकाऱ्याला शोभत नाही. मुंबई ही कोणाच्या बापाची नाही, मुंबई ही गेल्या अनेक वर्षापासून येथे राहणा-या मराठी माणसांचीच आहे.
    आम्ही युपीवाले आहोत तर हिंदीतच बोलणार, महाराष्ट्रातील लोक आम्हांला माफ करा, या जया बच्चन यांच्या विधानावरून राज ठाकरे यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले असले , तरी पोलिस सहआयुक्‍त प्रसाद यांनी 'मुंबई ही कोणाच्या बापाच्या नसल्याचे ' वक्‍तव्य केल्याने नवी वाद निर्माण झाला आहे.
    प्रसाद यांनी वर्दी, खुर्ची, बॅच सोडून रस्त्यावर यावे म्हणजे त्यांना कळेल मुंबई कोणाच्या बापाची आहे , असे तोंडसुख ठाकरे यांनी घेतले आहे. प्रसाद यांचे वक्‍तव्य चुकीचे , तसेच बेजबाबदारपणाचे आहे. पोलिस अधिका-यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी वक्तव्य करून नये.
    कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणारे वक्तव्य केल्याने प्रसाद यांच्यावर निलंबनाची वेळ येवू शकते. ' सीआरपीसी ' च्या कलम १४९ नुसार प्रसाद यांच्यावर कारवाई होवू शकते. या कलमाखाली राज ठाकरे यांच्यावर खटला भरण्यात आला होता.
    -नरेश रावताला

  3. Anonymous said...
     

    Don't open new thread by highlighting comment related to women.

  4. Anonymous said...
     

    What all is happened in this context is painfull. But it's sad to see that the offender is one and pardon is sought by some one else.
    We feel incase pardon is to be accepted then it should be, on lines, Mr. Raj Thakre asked, as it was the only acceptable form. All must understand Raj is son of the land and why he is only met with understandable and high handed behaviour by poilce and Govt. It's too sad for all we genuine Maharashtrians to stand!

  5. Anonymous said...
     

    माला असे वाटत आहे की राज ठाकरेंवर दबाव वगेरे काही नाही आणला गेला.
    माफ़ी स्वीकारने हे त्यांच्या समजुतदारपाणचे आणि राजकीय हुशारिचे लक्षण आहे.
    उत्सवांच्या दिवसात दंगा करून काही राजकीय फायदा मिळणार नाही उल्टे नुकसानच होइल आसा त्यांनी विचार केला असावा.

  6. Anonymous said...
     

    Raj Thakare is son of Maharashtra, he is serving for maharashtra,but some people are trying to demerit him, and letting him down, what ever he is doing is good for the people of maharashtra.May god bless Raj for his courageous step he has taken for the welfare of Maharashtra.My best wishes to Raj. Jai Maharashtra.Jai Bhavani Jai Shivaji.

  7. Suhas Halwai said...
     

    je zaale tevadhech zaale asel.. kadachit r.r. patil ni hi gosht na taanayachi vinanti raj naa keli asel... pan ek gosht nakki aahe ki "bachchan" hi ek pravrutti aahe, vyakti navhe... maafi maagun/dewoon tyaatun kaahi faayadaa hoil ase naahi... asha pravrutti velich thechayalaa havyaat anyatha chukaa karayachyaa aani "mi/mazaa navra/mazaa baap superstar" mhanoon maafi maagaychi yaalaa arth naahi.. yaa pravrutti virudhchaa asahkaar lokamadhoon chaalu vhyalaa hawaa, rajkiya pakshakadoon navhe...

  8. Anonymous said...
     

    Drama behind the curtain?

    Hell no! Everything going on is a drama...there nothing behind curtain except corruption and looting. It seems hopeless to try to bring attention of the people to real issue like corruption, land grabbing by politician and hopeless public infrastructure even as a handful get rich under the guise of reforms. If you want to reform, why not privatize electricity company instead of throwing away land to videocon which can fetch 3000 crores? Sell that land and both Pune and Mumbai can get 1500 crores each for the metro projects. Stop this stupid discussion on which language we speak. I speak Marathi, but I can curse these MXXXXXFXXXXXERS equally well in Hindi and English . Let's elect people like Arun Bhatia for once instead of these crooks from all parties.

  9. Anonymous said...
     

    Amhi marathi asalymule Raj thakare je marathi lokasathi karat ahet, to tyancha mothepanach mhnawa lagel. Ajaparyant marathi manasala parakiya lechapecha samajat hote, barech lokana ase watat hote ki te marathi mansache te kahihi karu shakatat, Pan Raj thakareni te dakhwale ki marathi manus ha lechapecha nahi tyachapudhe hi kadhi kadhi zukawe lagate.
    Raj thakarena ase barech lok sapadatil, ki je khatat ekache ani gatat ekache, tyatilach ya JAYA BACCHAN.
    Sadhyatari Amitabh Bacchan ne kutumb pramukh mhanun sarawasaraw keli, karan tyancha movie release honar hota,

  10. Anonymous said...
     

    Marathi lokanna sakali 10am la officel la jaychey taak-bhat phurkya marun khallya nantar....10-12 time pass karayacha office madhye....nantar jem tem 2/3 taas kaam karaychey ani 6pm la ghari pohochaychey....ashich kame awadtaat...tya muley tey middle class ch rahataat....mag udyog kay tar shrimanta lokanwar jalaychey....Jaya bachchan la kahi bolnyachi LAYKI tari ahey karey leko tumchi....nustya marathi chya nwawar tumhi kahi hi boltaat.......kara MNS la support...kara tyahcya mhorkyas support....to king banwa....mag tyacheech gunda tumchi waat lawteeel....tevha kalel leko tumhala....marathi ka rey tumhi ?
    mala tari laaz wattey marathi ani bramhan mhanwaun ghyaychi....

  11. Anonymous said...
     

    I think this whole issue is frivolus.In this age of globalisation when people of different countries and communities are coming togather,such utterly frivolus acts of intolerance are typical of politicans.Indian society is suffering from many serious problems like poverty, unemplymeny,blindfaith,rampant corruption etc.but the polticians have no solutions for these.Hence they are resorting to such frivolus issues which are unnecessary and are detrimental to social fibre.
    s.v.kulkarni

Post a Comment