व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

निविदा न मागविता बस थांबे बदलण्याचा घाट

बीआरटी मार्गावरील सध्या असलेले बस थांबे बदलून त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून स्टिलचे थांबे उभारण्याचे काम निविदा न मागविता एका जाहिरातदार कंपनीस देण्याचे प्रयत्न पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) चालविले आहेत. त्यासाठी मर्जीतील या कंपनीवर सवलतींचा वर्षाव करण्याच्या प्रयत्नामुळे "पीएमपी'स कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. हा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी काही अधिकारी आणि पालिकेतील पदाधिकारी आग्रही असल्याचे समजते.

सध्या या मार्गावर ५४ बस थांबे अस्तित्वात आहेत. दरम्यान या मार्गाचे विकसन कामासाठी पालिकेने दिल्ली येथील "आयएल अँड एफएस' या संस्थेचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. या सल्लागार कंपनीने सध्या असलेले बस थांबे काढून त्या ठिकाणी स्टेनलेस स्टिलचे थांबे उभारावेत, अशी सूचना केली. या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी "पीएमपी'ने सध्या असलेले बस थांबे काढून त्या ठिकाणी नवीन बस थांबे उभारण्यासाठी हे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सध्या मार्गावर असलेल्या जाहिरात कंपन्यांच्या बस थांब्यांची "बीओटी'ची मुदत अद्याप संपलेली नाही.

त्यामुळे पीएमपीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. या प्रस्तावास पीएमपीच्या लेखाविभागानेही स्पष्ट नकार दिला आहे, असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून हा प्रस्ताव पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामागे पालिकेतील आणि पीएमपीतील काही अधिकारी वर्ग आग्रही आहेत.

आधीच बीआरटी विषय वादग्रस्त असताना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चालविलेला प्रकार निंदणीय आहे. तुम्हाला काय वाटते? लिहा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर

5 comments:

 1. Anonymous said...
   
  Mr. Ajit Pawar look into the matter and take strict action againt corrupted people. This money goes from every punekar's pocket. Peoples not expect from NCP this type of mistakes. It creates bad image in public and will open in next election.

  Govind Pawar
  Pune

 2. Anonymous said...
   
  BRT च्या जमिनीवरच्या प्रकल्पात किती भ्रष्टाचार चालला आहे त्यावरून त्याच्या कित्येक पट खर्चाच्या मेट्रो रेल्वेच्या नियोजित प्रकल्पात किती होइल याची कल्पनाच करा!
  जोपर्यंत हे भ्रष्ट सरकार व त्याचे पुढारी काळाच्या पडद्याआड जाणार नाहेत तोपर्यंत हेच चालू रहाणार!

  हा हा,कोणीतरी पालकमंत्र्यांना हे थांबवायला सांगत आहे! त्यांच्याबद्दल भ्रमात दिसत आहेत गोविंदराव!
  NCP चे सदस्य म्हणजे paragons of virtues आहेत अशा वृथा वल्गना मनात बाळगताना दिसताय राव! सत्य जाणलत तर अशी चूक करणार नाहि!

  This BRT project has been a sham from the beginning,has taken few lives too & the PMC is keeping upto it's reputation of botching up this too in it's characteristic style!

  आता हे निंदनीय आहे की नाही ठरवायला सकाळ वाचकांना विचारत आहे ज्याचे उत्तर शाळकरी मुलगासुद्धा देउ शकेल! जाउदे,कशाला वेळ फ़ुकट घालवायचा या नेहेमीच्या गोष्टीवर! यांना शिक्षा होत नाही कारण वरपासूनच सगळे सडलेले आहेत!

 3. Anonymous said...
   
  Who cares !!!!
  whats the condition of current bus stops ?
  at least for a month or 2 we will get new busstops in Pune..(Hopefully).
  I am sure they will get damaged in 1-2 months and the situation will be back to normal where we wont have any busstops.
  I say theyshold charge some extra money on bus tickets to build these bus stops.

 4. Anonymous said...
   
  कोना मूर्खाला ही बी रा टी ची अक्कल सुचली ही देव जाने !!!!!!!!!!!!
  आशा अधिकार्याना व राजकर्न्याना भर चोकाताफाशी दिली पाहिजे!!!!!!!!!!!!!!

  एव्हादा चांगला सिमेंताचा रास्ता बांधला व तेपन पैश्याची उधाल्पत्ति करूँन .
  माला वाटले की सतारा रोड आता तरी सुधारला पण हे ह्या मुर्ख लोकाना कुठे बघवानर .... पैसे उकालायाला कुठे तरी कम नको का उकारयाला म्हणुन बी र टी च्या नवा खाली हा उदोग केला.
  फक्त एक पि म पि बस चलावान्या साथी हा किलेला उद्योग आशा किती बस चालतात ह्या रस्त्या वरून ?

  एका लेन मधून बिचारे तू व्हीलर थ्री व्हीलर सर्व जननी जिव मुठीत घेउन गाड्या चलावयाच्या. पि म पि वाले काय फार्मूला वन मधे कार चलाव्नर म्हणुन त्याना सेपरेट लेन द्यायची?

  हिम्मत आसेल तर या राजकर्नाय्नी एक दिवस तू व्हीलर चलूँ दाखवावी ह्या रोड वरून म्हणजे कलेल..

  जसे अपन बघू शकता की बी र टी लेन वरून किती बस जातात व किती वेळ घेतात ? कात्रज ते स्वारगेट म्हणजे पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवे करायचा की काय? अणि लोकानी रोड कुठून ओलान्दाचा... रस्त्याच्या मधोमध बस थाबे म्हणजे ह्या सर्व गोष्टीवर कलासच!!!!!!!!!

  हे सांगा बस मधून जाणारे काय घोड्यावर बसून कमला जाणारे असतात की काय? ते सुधा सामान्य नागरिकच असतात ... त्यांच्यापेक्ष्या बी र टी न वापरानारे जास्त आहेत हे कोणी लहान मुलगा देखिल सांगू शकतो मग ही बी र टी कोना साथी बार ?

  ह्या प्रोजेक्ट साथी पदाधिकारी परदेशवारी केलि म्हणे काय ? तेव्न्हा इन्टरनेट काय चुलीत घातले होते की काय ?

  आता बरोबर मुद्यावर आलो आहोत हा प्रोजेक्ट सामान्य मानुस साथी नसून पैसे खाणारे राजकारणी व अधिकारया साथी होता व अजुनाही आहे !!!!!!!!!!
  आपण सर्वजण ह्या बी र टी प्रोजेक्ट ला विरोध केला पाहिजे... ह्या चुकीच्या प्रोजेक्ट छे पैसे ह्या राज्कर्न्याँ कडून व अधिकार्यकडून वसूल केले पाहिजेत. अथवा त्याना देह डंडा पक्षा कमी शिक्षा नको

 5. Anonymous said...
   
Post a Comment