व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

संगणक अभियंत्याची आत्महत्या

हिंजवडीतील एका संगणक अभियंत्याने भोईरवाडीमधील बापूजीबुवा डोंगरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सरोजकुमार ब्रह्मानंद नायक (वय २६, रा. सोमेश्‍वर मंदिराजवळ, चंदननगर, पुणे, मूळ गाव- जगन्नाथपुरी, ओरिसा) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी औद्योगिक वसाहतीमधील टेक-महिंद्रा कंपनीच्या मागील भोईरवाडी डोंगरावर झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे गुराखी बाळू सावंत यांनी सोमवारी पाहिले. त्याने याबाबत पोलिस पाटील तुकाराम भोईर यांना कळविले. श्री. भोईर यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात टेक-महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष सुजित बक्षी (कार्पोरेट अफेअर्स) यांनी म्हटले आहे, ""सरोज नायक हा एसीएस कंपनीतर्फे टेक- महिंद्रामध्ये उप-कंत्राटी कर्मचारी होता. तपासाबाबत पोलिसांना सर्व सहकार्य करण्यात येईल.'' हळव्या स्वभावाचा सरोजकुमार सरोजकुमारच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो अतिशय मितभाषी आणि मृदू स्वभावाचा होता. त्याला एकटेपणाची आवड होती. त्यामुळे त्याला फारसे मित्र नव्हते. केवळ अडीच महिन्यांपूर्वीच टेक-महिंद्रा कंपनीत कंत्राटी पद्धतीवर तो नोकरीत रुजू झाला होता.

सरोजकुमारच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसले, तरी कोणत्याही कारणामुळे आत्महत्या करणे, हा समस्यांवरील मार्ग असू शकत नाही. हे या तरुणांना कोण समजावणार?

1 comments:

  1. Anonymous said...
     

    तुझा प्रश्न असा आहे की, झाडे वादळात का कोसळतात?.. कधी कधी जीवन अशी काही कोडी घालते की त्यातून सुटका होतच नाही. आणि त्यात एखादा जवळचा मित्र नसला तर मग एकच मार्ग दिसतो, "द एंड". मला पूर्ण पणे मान्य आहे की आत्महत्या हा पर्याय होऊच शकत नाही. ज्या कोणालाही हा पर्याय योग्य वाटत असेल त्यानी प्लीज एकदा "The Pursuit of Happyness" हा सिनेमा जरूर पाहावा.. जर तुमचे दुख क्रिस गार्डनर पेक्षा जास्त असेल तर एखाद्या चांगल्या "phyciatrist" ला दखौऊन घ्यावे ही नम्र विनंती.

Post a Comment