व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

गणवेश पुन्हा वादग्रस्त ठरणार

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे मोफत गणवेश या वर्षीही पुन्हा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.या गणवेशाच्या निविदा मागविताना देण्यात आलेल्या नमुन्यापेक्षा वेगळे कापड वापरून गणवेश तयार केलेल्या कंत्राटदाराला हे तीन कोटी साठ लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे. आश्‍चर्य म्हणजे या कंत्राटदाराचे नमुने हे अपेक्षेनुसार नसल्याचा अहवाल मंडळाला प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्यानंतर आणि इतर काही कंत्राटदारांनी त्याबाबत आक्षेप घेतल्यानंतरही मंडळ याच कंत्राटदाराला काम देण्यावर ठाम आहे. विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याच्या प्रकरणावरून यापूर्वीही मंडळ अडचणीत आले होते. त्यामुळे हे काम बचत गटाच्या माध्यमातून पुरविण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता; परंतु बचत गटांनी वेळेत गणवेश पुरविले नाहीत, असे कारण देऊन या वर्षी त्यांना काम देण्यास मंडळाने नकार दिला आणि निविदा मागवून गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी...

गेल्या काही दिवसांपासून निविदाप्रक्रियेवरून मंडळात सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्यातच दोन कंत्राटदारांनी नोटिसा बजावल्यामुळे खरेदी वादाच्या भोवऱ्यात येऊ शकते. या कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेऊन या खरेदीप्रक्रियेवर एकतर्फी स्थगिती मिळवू नये, म्हणून मंडळाने जागरूकता दाखवीत न्यायालयामध्ये "कॅव्हेट"ही दाखल केले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच ही कार्यवाही करण्यात आल्याचा खुलासा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे

1 comments:

  1. Anonymous said...
     

    या व अशा नित्यनियमित बातम्यांत नाविन्य वा आश्चर्य कांहीच नाही कारण राजरोसपणे नेत्यांच्या आशिर्वादाने हे सतत चालू आहे!
    केव्हाच गेले ते दिवस पूर्वाकाळच्या साध्या,प्रामाणिक,सचोटीच्या महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्रीसारख्या नेत्यांचे,जेव्हा honesty & integrity in public life व देशहित व देशाभिमान यांना पुजले जायचे!
    आताचे नेते,विशेषतः सध्याचे महाराष्ट्रातील व दिल्लीचे राज्यकर्ते पैशासाठी इतक्या खालच्या दराला पोचले आहेत की त्यांचे अनुयायीपण त्यांचेच अनुकरण करणारच!आणी या मानवरूपी बोक्यांच्या गळ्यात कोण घंटा बांधु शकणार?

    दूस-या कांही चांगल्या बातम्याच नाहीत म्हणून रोज सकाळी वर्तमानपत्रात फ़क्त जाळपोळ,अपघात,भ्रष्टाचार,लाचलुचपत,
    बलात्कार,फ़ितुरी वा गद्दारी,खालच्या दर्जाचे राजकारण,पैशासाठी सुटलेला प्रचंड मोह,अनधिकृत सदनिकांची संकुले बांधण्याकरता नदीनाल्यात व खाणीत राडारोडा टाकणे,सुरुंग लावतांना कुठलाहि विचार न करता जवळपासच्या मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या व इतर वास्तुंना प्रचंड हानी पोहोचविणे वगैरे वगैरे बातम्या छापल्या जातात!

    कुठल्याहि सरकारी ओफ़िसमध्ये चक्कर टाका,सगळीकडे थुंकणा
    -या,कामाच्या जागी गैरहजर राहून सर्वत्र गप्पा मारत फ़िरणा-या स्वार्थी,अकार्यक्षम व लबाड लोकांचीच थोबाडे दिसतील!हे आहेत आपले देशबंधु!

    ही बोडकी "कॅव्हेट" तितक्याच अकार्यक्षम न्यायालयामध्ये दाखल करून काय निष्पन्न होणार?

Post a Comment