व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

उद्योग बंद पाडणे हा रोगावर इलाज आहे का?

"सायबर कॅफे' चालविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व नियमांची वेळोवेळी पूर्तता करूनदेखील पोलिसांच्या सहकार्याअभावी शहरातील हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरात परवाने देण्यासाठी जाचक अटी रद्द करून मुंबई आणि नागपूरप्रमाणेच नियम असावेत, अशी मागणी "पुणे सेंट्रल सायबर कॅफे असोसिएशन'तर्फे करण्यात आली आहे. या बाबतीत संघटनेतर्फे येत्या बुधवारी (ता. ६) पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे.

वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सायबर कॅफेंवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांतर्फे नवीन नियमावली करण्यात आली आहे. त्या नियमावलीतील शर्तींची पूर्तता करणाऱ्यांनाच परवाने देण्यात येत आहेत. मात्र, नव्या नियमावलीतील १२ आणि १३ क्रमांकाच्या जाचक अटींपोटी शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे दोन हजार कॅफे गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्याची वेळ कॅफेचालकांवर आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे यांनी दिली.

श्री. पोकळे म्हणाले, ""सायबर कॅफेंना परवाने देण्यासाठी महापालिका हद्दीतील जागांचे मान्यताप्राप्त नकाशे सादर करण्याची अट बाराव्या नियमात घालण्यात आली आहे. या नियमाचा सर्वांत जास्त फटका पेठांमधील व्यावसायिकांना बसला आहे. कारण पालिका अस्तित्वात येण्यापूर्वी उभारलेल्या इमारतींचा समावेश त्यात नसल्याने, अशांना परवाने मिळण्याची अडचण होत आहे. पेठ परिसरात साधारणत: तीनशेच्या आसपास सभासद आहेत.''

नियमावलीतील तेराव्या नियमानुसार व्यावसायिकास जागेबाबतीत आरोग्य खात्याचे "ना हरकत' प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिकांनी आरोग्य खात्याकडे त्याची मागणी केली असता, आम्हाला या बाबतीत कोणतीच कल्पना नसल्याचे सांगत आरोग्य खात्याने हात वर केल्याचे श्री. पोकळे यांनी सांगितले. परवाने नसलेल्या व्यावसायिकांवर खटले दाखल करण्याची कारवाई पोलिस खात्याकडून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ८० जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या आडमुठेपणाच्या धोरणामुळे व्यवसायावर गंडांतर आल्याचे ऍड. अंबरीश बाहेती यांनी सांगितले.

आर्थिक; तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान
पोलिसांच्या कारवाईमुळे भेदरलेल्या व्यावसायिकांनी मागील चार दिवसांपासून सायबर कॅफे बंद ठेवले आहेत. त्यामुळे प्रतिदिन सुमारे तीस लाख रुपयांच्या एकूण कमाईवर पाणी सोडावे लागत असल्याची खंत श्री. पोकळे यांनी व्यक्त केली. सायबर कॅफे बंद असण्याचा सर्वांत मोठा फटका उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अथवा ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या आघाड्यांवर घोडदौड करणाऱया पुणे जिल्ह्यात नेट कॅफे ही अत्यावश्यक बाब जरूर आहे. कॅफे चालविण्यासाठीच्या प्रक्रियेचे सुलभीकरण आणि सुरक्षेसाठी योग्य दक्षता घेतली, तर हा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य कॅफेचालकांना लागणार आहे. आठमुठेपणामुळे फक्त कॅफेचालकांचेच नुकसान नाही, तर समाजाचेही मोठे नुकसान होते आहे, असे वाटत नाही का? दहशतवादाच्या रोगावर नेट कॅफे बंद पाडणे हा इलाज आहे का?

11 comments:

  1. Unknown said...
     

    Rogavar aoushad upay karit nasel tar Aoushad tyar karnyachi padhatat sudharavi, Aoushad tyarkarnari Prayogshala bandh padu naye! Cyber Cafe udyog ha durdevane, gunhe karnarya naslelya mendu mulye adchanit ala ahe. Cybercrime che madhyam cyber cafe asushaktat pan karan nhave.

  2. Anonymous said...
     

    Nahi. Udyog band padun ha prashna sutnar nahi. Internet ani tyacha vapar hi lokanchi garaj banali ahe. Ti jastit jasta surakshit kashi hoil hyasathi yogya system kuthalyahi bhrashtachar ani vashilebaji shivay rabavali geli pahije.

  3. Raviaj Deshmukh said...
     

    Sutawarun Swarg Gathu naye, Atirekyane aata IP Chorun, CM, DCM yana mail kela aata kay karnar? ISP seva denari Company Band karanar ka? Jar Patrane Dhamaki Aali tar Postman va Post Khatyachi Inquiry Kadhi Jhali nahi, Cybercafewale yenarya customerchi kasoon chowkashi karatil mag ha kagadpatrancha trass kashala?

  4. adi said...
     

    udyog band padne ha rogavar ilaj nasun te jakhmevar mith taklyasarkhe aahe..jari aaj cyber band asale tari lok mobilvarun va gharatun net vaparnarch....mag cyber band karnya peksha tumhi net companya band kara!!!!

  5. Anonymous said...
     

    tyapeksha sarva bangala deshi lokana hukun ka nahi det..
    asam madhe kaziranga chya side la ja kahi zopdya ahet tya saglya bangladeshinchya ahet..
    delhi, gurgaon madhe most of gharkam karnarya baai ani riksha wale, dharavi, mumbai madhe tar aganeet ahet..
    tya lokana dya haklun adhi..
    andhale dalate ahe ani kutre pith khate ahe ashi sthiti zali ahe deshachi...
    80s madhe fakta eka thikani dahashatwaad hota ata to pratyek state madhe ahe.. this is just failure..

  6. Anonymous said...
     

    The police is idiot
    Closing cybercafe is not solution
    First bring Uniform Civil code and compulsory 2 child rule for moslems

    BAN on URDU websites in the country
    BAN on URDU media, news paper , channels and books printing

    URDU is langauge of the terrorists and must be banbed

  7. Unknown said...
     

    Hi Freindz i am manoj joshi from pune,and i own cyber cafe here,police department ne gele 1 month pasun amhala khup tras dilay,actully police departmentla e-mail,net,ya goshti mahit nasavyat.amhi lok tyana co-operative karayala ready ahot,afterall its our country security question,but tyani je rules create kele ahet ter totaly wrong ahet,first mhanje licence ghenyasathi je documents magitale ahet te wrong ahet,bcaz te documents city area madhe bhetat nahi mag amhi kuthun aanu?amhi policana bollo ki agree ahe ki netmule khup wrong work karnari manse ahet,but police lokani sangitale pahije ki Identity proof compulsary ghya,pratyek computerla security dya,kon manus kadhi basla ani tyane kay kele yachi information ghya,koni doubtfull person aslyas aamhala contact kara,pan nahi aasle kahi nahi.ata cyber owner kadun documents ghetlyane crime stop kase kay hoil?jo person 3-4 lakh invest karun cyber business start karto to crime kasa kay karen?pan aaple police mhanje bik dokyache robot ahet,jya goshti imp ahet tya compulsary karne sodach jya nakot tya compulsary kelyat ahsane yanchya bapala tari crime stop karta yeil ka?ani amhi sudha total co-operate karayala ready ahot,afetall amhisudha ya deshat rahato,deshat ghadnarya crime la stop karne he aamchihi responsibility ahe,only ugach reason zero astana ha business stop karu naye,ani ho jar only cyber business stop kelyane crime totaly close,stop honar asel tar amhi ready ahot,pan kay ahe police lokana he search karne hard jate,mhanun mag te cyber walyanchya mage laglet.ha business stop zalyane studnets,workers,and all departments chya public la tras sahan karawa lagto,students che online forms chya last date zalyat,ata tyanchya ya loss la responsible kon?kahi kahi workers che job chance gele,mag tyanchya ya loss la responsible kon?police loknai mhanun dok use karawe ani crime pakdawe,ugach murkhasarkhe rules and regulation karun nahi,ani internet use hi sadhya garaj ahe,ani cyber jari band kele tari jya mansana crime karayche ahe te karnarach na?te thodich stop honar ahet,mag asel dearing police department madhe tar tyani internet facility completely close karawi,

  8. Aaple Career said...
      This comment has been removed by the author.
  9. Aaple Career said...
     

    हेल्लो मित्रांनो
    मी हर्ष सांगली [ Tasgaon ] मधून बोलतो आहे
    माझा स्वताचा नेट कैफे आहे .मी तर आताच बिज़नस सुरु केला आहे
    मी रुपये १ लाख कर्ज घेतले आहे आणि कसतरी सेटल होतो आहे पन आता पुन्यामधाली ही बातमी वाचल्यानंतर मला खुप मोठा धक्का बसला आहे . कारन जर राज्यातील नेट कैफे बंद झाले तर आम्ही लोकांनी करायचे काय याची प्रशासनाला कालजी आहे का आमच्या कुतुम्बाची जबाबदारी ते घेणार काय

    बर नेट कैफे म्हणजे काय २ नंबर च धंदा वाटतो काय या लोकांना . आधी नेट वापरता येते का विचार त्या नेट बंद करा mhananaryanna ... मी जर कही वाईट बोलत असेल तर मला माफ़ करावे पन जर पोटाचा प्रश्न निर्माण झाला तर सगल्यांच्या तोंडून हेच उदगार निघतील ..

    नेट बंद करुन हा प्रश्न कधीच सुटणार नाही. उलट त्यामुले नेट कैफे मालकांच्या पोटाचा प्रश्न उदभव्नार आहे .. आणि महाराष्ट्राच्या बेकारीत अनाखिनाच भर पडणार आहे याची प्रशानाने नोंद घ्यावी . उलट प्रशासनाने नेट कैफे च्या मदतीने अतिरेकी कसे सापडतील याचा विचार करुन नेट कैफे ना मदत करावी .

    बर नेट कैफे म्हणजे कही २ नंबरचा धंदा नाही . त्यामुले प्रशासनाने व् पोलिसांनी योग्य तो मार्ग काढून नेट कैफे ना परवानगी द्यावी तसेच नेट कैफे बंद केल्याने vadhanari बेकारी रोखावी ...सध्या सर्व कॉलेज व विध्यापिठाचे प्रवेश online झाले आहेत . त्यामुले विद्यार्थ्यांना नेट कैफे शिवाय पर्याय उरला नाही तसेच online बिज़नस करणार्या व नोकरी साठी online अर्ज करणार्या तरुण वर्गाला नेट कैफे ची आत्यंतिक गरज आहे
    ही गरज लक्ष्यात घेउन मी तर म्हणतो नेट कैफे ची सेवा ही अत्यावश्यक सेवे प्रमाने आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी .....

  10. adi said...
     

    are mitrano apan sarvani 1jorat morch kadhu an tya sifi la dakhavun deu ki he pune mhanje nagpur nhave je ki tyachya sallyane chalel me tar rahul pokale yana 1ch sangto ki tumhi jar tharvale tar aaple kahitari hou shakte karan tumhi sanga aaj aplya association madhe 500tari member astil jar aapan sarvani 1jorat morcha kadhala tar??tumhala kase vatate mala tari ase vatate ki aapan khar tar 1morcha kadhun ya sifi la dhakhavalach pahije...amhi punekari kuthe kami nahit te....hatachi ghadi ghalun basne ha punekaranchya raktatach nahi..........ankhin 1 vionanti pokale saheb kay asel te jara lavkar nirnay ghya karan aaj lakho lokanche nuksan hot aahe ani amhi sarve tumchya pathishi aahotach....tumhi fakt sanga amhi lagech aaloch!!!!!!!

  11. Anonymous said...
     

    phentermine prescription phentermine good or bad - can you order phentermine online legally

Post a Comment