पुण्यात अधिकारी संख्या वाढविणार
दहशतवाद विरोधी पथक ः तीन फौजदार आणि 18 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची (व्हीआयपी) पुण्यातील वाढती वर्दळ लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या निर्णयानुसार, तीन फौजदार आणि 18 कर्मचाऱ्यांची आता वाढ होणार आहे. त्यासाठी निवड करण्याचे काम सुरू आहे. या विभागात अधिकारी अथवा कर्मचारी नियुक्त करताना त्यांची कार्यक्षमता, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, शिक्षण, अन्य भाषांचे ज्ञान आणि पूर्वेतिहास आदींचा आढावा घेऊन नियुक्ती केली जाते. त्यांना सर्व प्रकारची शस्त्रे चालविण्याचे खास प्रशिक्षण दिले जाते. त्याशिवाय अन्य भाषांचे शिक्षण घेण्यासाठी आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विशेष वर्गही आयोजित केले जातात.
पुण्यात येत्या ऑक्टोबरमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. त्यात 72 देशांतील सुमारे 1200 खेळाडू भाग घेणार आहेत. सुमारे दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेनिमित्त अनेक "व्हीव्हीआयपी' व "व्हीआयपी' येणार आहेत. सात जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या पथकाकडे सध्या एक जीप आणि दोन मोटारसायकली असून, येत्या महिनाभरात त्यांच्याकडे आणखी वाहने येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तहान लागली की विहीर खोदायची, अशी सरकारची वृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा आल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला काय वाटते याविषयी?
Reduce the Z security personnel for VIPs/VVIPs & increase anti-terrorist & anti-theft/burglary squad strength by 10 times of what is proposed.
We got enough of fake leaders/rulers,who deserve no security covers.
It is the common man,who is the common sufferer in all terrorist attacks/burglary attempts!
And change the impotent Home minister cowering in fright in a burkha in New Delhi,while trying to teach Bhagwadgita sermons!
And ignore the president,who in her inaugural speech vowed to eliminate terrorists,but thereafter confined to visiting shrines at govt costs.She was totally ignored in all Latin American countries as she has no personality,lacks integrity[refer to Magasayse award winner Shri.Arun Shourie's research before her installation!].
no preplan......they dont have long outlook.