व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

साहित्य संमेलन सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये

ऐतिहासिक निर्णय ः पहिले आंतरखंडीय संमेलन

"इये मराठीचिये नगरी'तच आजवर 81 वर्षे रंगलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता सातासमुद्रापार निघाले असून, अमेरिकेत सॅनफ्रॅन्सिस्को (कॅलिफोर्निया) येथे फेब्रुवारी 2009 मध्ये आयोजित केले जाईल. साहित्य संमेलनाच्या इतिहासात संमेलन परदेशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याच बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. निवडणूक झाल्यास 26 सप्टेंबर रोजी नूतन अध्यक्ष निश्‍चित होतील. "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा'च्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय बहुमताने घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.

ठाले-पाटील म्हणाले, ""महामंडळाकडे परदेशातील संस्थेकडून संमेलन आयोजित करण्यासाठी प्रथमच आलेल्या निमंत्रणावर बैठकीत सखोल चर्चा झाली; तसेच रत्नागिरी, ठाणे, परभणी येथील निमंत्रणांचीही चर्चा झाली. परदेशातून निमंत्रण येण्याची घटना "ऐतिहासिक' आहे. ज्या संस्थेने निमंत्रण पाठवले आहे ती "बे एरिया महाराष्ट्र मंडळ' ही संस्था तेथे गेली 25 वर्षे मराठी मंडळींसाठी कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी मोठा आर्थिक भार उचलून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन महामंडळाने हे निमंत्रण स्वीकारले.''परदेशात संमेलन घेण्याबाबत महामंडळाची घटना काय सांगते, या प्रश्‍नावर "जेथे मराठी माणूस आहे तेथे संमेलन होऊ शकते,' असा घटनेत उल्लेख असल्याचे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.

जेथे मराठी माणूस आहे तेथे संमेलन होऊ शकते,' असे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले असले, तरी मराठी माणसांची संख्याही विचारात घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातला माणूया या संमेलनाची अतुरतेने वाट पाहत असतो. अशा वेळी संमेलन सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये घेणे योग्य वाटते का? हा मराठी माणसावरील अन्याय नाही काय?

15 comments:

  1. Anonymous said...
     

    मराठी साहित्य संमेलन परदेशात नकोच.....
    कारण-
    १) हे संमेलन सर्वसमावेशक असणार नाही
    २) त्या ७० लोकांची फुकटची परदेशवारी,१ कोटि रुपयांच्यावर खर्च होणार.
    ३) पुस्तक विक्रेते,प्रकाशक लोकाना परवडेल काय ?
    ४) ग्रामीण साहित्यिक, सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक व साहित्यिक हे सम्मेलानापासून वंचित राहणार.
    ५) "हे संमेलन फ़क्त एकाच वर्गाच्या हातात आहे" अशी शंका नेहमीच उपस्थित करनारया लोकांच्या मनात कटुता आनखिनच वाढेल.
    ६) अखिल भारतीय हे नाव बदलावे लागेल (हे संमेलन अजुन अखिल महाराष्ट्रियन होऊ शकले नाही ,ही गोष्ट थोडी बाजुला ठेवु.)

    फायदे :-
    १) साहित्यिक मंडळीची परदेशवारी होइल.
    २) नको असलेली लोकं आपोआपच नाराज होतील.
    ३) अ भा "सदाशिवपेठ" मराठी साहित्य समेलन असे ही नाव पडेल.
    ४) आनंदी आनंद गडे ,जिकडे तिकडे चोहीकड़े...

    आणखी ही बरच काही.....

  2. Subhash said...
     

    Namaskar,

    Maharashtra has become global now it's very exciting to hear Marathi Sahitya Sammelan will be held in USA. I think Marathi madali shoud open their hearts and allow it to happen in USA. I am in Sydney, away from Maharashtra since last 14 years. You won't know what's it like. At least if it happens in west where our bandhav bhaginis are there it will give us tremendous joy and peace. I feel we should give up this mentality of pulling each other's legs and let somebody get chance to travel overseas. Let us not analyse too much and just enjoy the change. If we all accept it, rest of the things will work out very smoothly

    Good luck American mandali

    Subhas More
    Sydney

  3. Subhash said...
     

    Namaskar,

    Maharashtra has become global now it's very exciting to hear Marathi Sahitya Sammelan will be held in USA. I think Marathi madali shoud open their hearts and allow it to happen in USA. I am in Sydney, away from Maharashtra since last 14 years. You won't know what's it like. At least if it happens in west where our bandhav bhaginis are there it will give us tremendous joy and peace. I feel we should give up this mentality of pulling each other's legs and let somebody get chance to travel overseas. Let us not analyse too much and just enjoy the change. If we all accept it, rest of the things will work out very smoothly

    Good luck American mandali

    Subhas More
    Sydney

  4. Anonymous said...
     

    Sahitya Sammelan Bharatat kinva Maharashtrat aslyas
    Samanya Marathi manus tyamadhe bhag gheu shakto, tyacha anand lutu shakto kinva sahityacha phayada gheu shakto.
    Tya samanya mansala jar sahitya mandal 'SanFransico' la
    gheun janar asel, tar nakkich he kautakaspad va swagatathya aahe.
    Pan jar 10-15 sahityik, mandalachaya kharchene tejhe jaunar
    astil, tar te kasale sammelan. Ti phakta ya loknachi mandalachya
    kharchane keleli US enjoy trip hoil.
    Aani jar he mandal Aahil bhartiy asel tar,te international
    level la nenyacha ka attahas.
    yes, we can take 'Jagtik marathi parishad' in US or France.
    --- Sandeep Dalvi, Baramati

  5. Anonymous said...
     

    Sahitya sammelanacha objective kay ahe ...he pratham lakshat ghene aawashyak ahe.Mi ameriket rahato. Ithe ashihi mandali ahet ji marathi asunahi swatahachya mulanshi marathit gharat bolat nahit.(he ata punyatahi baghayala milate mhana) ashi loka yetil sahitya sammelanala?
    gramin lok, pustak vikrete ya sagalya lokana kase parwadel tithe jana? Nusatacha navala bharata baher sammelan karnyat kahi arth nahi.Tya peksha jo paisa baher chya deshat sammelan karayala lagnar ahe tya paishat atleast 3/4 deshat marathi library chalu karavi. te jast fayadhyacha tharel.

  6. Anonymous said...
     

    Jithe marathi chalate tithe get-together kara. Americat jaaun tumhi kay prove karnaar aahat???
    Aahe tya lokan-madhye marathi rujava. Puneya-mumbai madhye koni shuddha marathi bolte kay??? Pardeshat jaaun kasla prachaar kartay tumhi, adhi aahe ti marathi shuddha kara???
    Don varsha purvi Sane Guruji'n chaya likhana-la (saahitya-la) naave thevenaari bhurti mandali paahili, aajche saahityik kay darjaache aahet tey samajale.
    Me england la raahato, maazi mule marathi bolat naahit kaaran tyana ethe marathi chi garaj bhasat naahi, sagalech engraj ho, mag kashala marathi-marathi karaiche. Jithe jaal tithe tithlya saarkhe raaha. Americe-la kay ghene aahe marathe che??? Aaho, pardeshat konala Indian lokanche pan kautuk naahi, marathi kuthali gheun baslaa aahat??? Naste chochale.
    Kaahi tharavik mandalin chi mule-baale tikade aastil aani aasa daav saadhaicha aasel tar thik aahe, khushaal jaa pan kaahi saadhya honaar naahi.

  7. Unknown said...
     

    Marathi Mansus punha vadat.
    Dhadas khoop mothe kelet. Marathi samelan karache ter chandraver karun dakhavaa.

    Marathi samelan maharashtrat kara. me ter mhanto eka khede gavat kara. mhanje aapli gavatlee manadle che entertainment kade laksha odhale janar. ani he ek chan market aahe.
    kuthalyaa hee business chee suruvat eka gavapasun sooroo hote.

  8. Appa said...
     

    प्रिय संपादक सकाल ,
    साहित्य सम्मलेन सन फ्रांसिस्को येथे भारविन्याचा निर्णय साहित्य परिषदेने घेतल्याचे वाचण्यात आले. हा निर्णय अत्यन्त दुर्दैवी आहे. सर्व सामान्य वाचकांना अमेरिकेस जाने कसे शक्य आहे? त्यामुले मला असे वाटते की साहित्य सम्मेलन येथेच करावे आणि प्रादेशिक सम्मेलन सन फ्र्न्सिस्को येथे घ्यावे जेथे साहित्यिकांना निमंत्रित करावे.
    अ. प्. जव्खेद्कर

  9. Appa said...
     

    प्रिय संपादक सकाल ,
    साहित्य सम्मलेन सन फ्रांसिस्को येथे भारविन्याचा निर्णय साहित्य परिषदेने घेतल्याचे वाचण्यात आले. हा निर्णय अत्यन्त दुर्दैवी आहे. सर्व सामान्य वाचकांना अमेरिकेस जाने कसे शक्य आहे? त्यामुले मला असे वाटते की साहित्य सम्मेलन येथेच करावे आणि प्रादेशिक सम्मेलन सन फ्र्न्सिस्को येथे घ्यावे जेथे साहित्यिकांना निमंत्रित करावे.
    अ. प्. जव्खेद्कर

  10. sagar4285 said...
     

    THIS GOOD NEWS FOR ALL MAHARASTRIAN

  11. gananath bapat said...
     

    नमस्कार;
    मी; गणनाथ हेरंब बापट अहमदाबाद निवासी सांगु इच्छीतो की ३६वे मराठी साहित्य संमेलन प्रसिध्द साहित्तीक श्री वि.द. घाटे यांच्या अध्यक्षते त १९५२ ते ५६ च्या कालखंडात अत्यंत यशस्वी रीत्या आयोजीत झाले होते.तेंव्हा संमेलन फक्त महाराश्ट्रा पुरते मर्यादीत न ठेवता ब्रुहन महाराश्ट्रातील कुठल्याही शहरी जीथे मराठी भाषीक अनेक वर्षांपासुन स्थाय़ीक आहेत उदा. अहमदाबाद; बडोदे अशा शहरी प्रथम आयोजीत करण्याचा विचार त्या नंतर भारता बाहेर आपली भरारी करण्यास कोणासही अयोग्य वाटणार नाही.
    कळावे; आपला
    गणनाथ हेरंब बापट.
    आहमदाबाद

  12. Anonymous said...
     

    Californiatil Bay Areamadhe khup Marathi bandhav geli anek varshe vaastav karat aahe. Marathi Sahitya Sammelan hi Marathi lokansathi ek mothi sanskrutik ghatana aahe. Ti US madhe aani mhahatwache mhanaje jithe Marathi loknachi sankhya sarvat jaast aahe ashya thikani hone hi ek abhimaanachi gosht aahe. Majhya mate ya nirnayala virodh karanyapeksha khulyaa manane samarthan kele paahije.
    Jevha me hi news vaachali tevha me majhya non-marathi mitrala abhimaanane saangitali. Marathicha man vadhavnaari hi gosht aahe.

  13. Unknown said...
     

    I am working in Tokyo for past several years. We also have a small Marathi community here and we also feel that some such thing can happen over here. But to be honest, the next generations of our own Marathi NRI people wont be as Marathi as we all are now. So what we should sensibly demand is a "small" but "parallel" sahityik mela in each foreign city once a year. I am carefully using the work "parallel" here as I agree whole-heartedly for those who cant travel to Frisco and to all those who envy those who can travel...!
    The sudden announcement of only one Sammelan that too abroad is perhaps a twister and the Sadashiv Pethee Marathi Manus cant digest it as easily.

  14. Unknown said...
     

    Live & let live!
    We read more about the fiasco or meddling of politicians at any marathi sahitya sammelans held in Maharashtra over the recent years!

    जरी येथे ब-याच जणांनी सान फ़्रान्सिस्कोला हे पुढच्या वर्षी भरविण्यास विरोध दर्शविला आहे तरी ह्या व्यक्तींपैकी कितीनी महाराष्ट्रातली अशी संमेलने attend केली हा संशोधनाचा विषय होउ शकेल.

    परदेशी गेले व स्थायिक झाले तरी ती मराठी मंडळी आपलीच आहेत ना?भारता/महाराष्ट्राइतकीच बाहेरची मंडळीपण ई-सकाळ वा पुणे प्रतिबिंब वाचतात ना? जरी ते परदेशात असले तरी त्यांचे जवळचे नातेवाईक येथेच आहेत ना?तेथे असूनहि ते आपलेच सण तितक्याच उत्साहाने साजरे करतात ना?

    खरे बघितले तर कुणालाच कांहीहि फ़रक पडणार नाही तरी ही ओरड व नकारात्मक व कोती वृत्ती कशासाठी?

    येथिल मराठी माणसांच्या सर्व मतांचा मान राखून व मीपण इथलाच असूनहि मी म्हणेन की होउ द्या ते SF ला!त्यातून जे कांही फ़ायदेतोटे होतील त्यावरून पुढची वाटचाल आखता येइल!
    सुभाष भाटे

  15. Anonymous said...
     

    saahity samelan Bihar madhye karave.

Post a Comment