व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अपरिचितांपासून सावध रहा : पोलिस आयुक्त

डॉ. विजय रामचंद्र घैसास यांचा खून परिचित व्यक्तीनेच पैशाच्या मोहाने केल्याचे उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी केले आहे.

अपरिचित नागरिकांना घरात प्रवेश देऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे. अपरिचित व्यक्तींना घरात प्रवेश दिल्यामुळे खून, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे घडल्याचे शहरात यापूर्वीही उघड झाले आहे. घरातील नोकरांनीच चोऱ्या केल्याचेही अनेक गुन्हे यापूर्वी घडले आहेत. काही वेळा परिचित व्यक्तींनीही साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे दिसून आले आहे. घरातील मोलकरीण, पेपर टाकणारी मुले, केबल देखभालीसाठी येणारे कर्मचारी, किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी येणाऱ्या व्यक्ती यांची खातरजमा करून माहिती ठेवावी; तसेच त्यांच्यापैकी वारंवार घरी येणाऱ्यांची छायाचित्रे पत्ते व दूरध्वनी क्रमांकासह घरात ठेवावे, असे उमराणीकर यांनी सुचविले आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने काही वेळा अनोळखी व्यक्ती घरात येतात. एकट्या व्यक्तीला पाहून ते लुटतात. त्यामुळे घराच्या दरवाजाबाहेर लोखंडी जाळीचा दरवाजा कायम बंद ठेवावा. अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये. त्याचप्रमाणे अलार्म सिस्टिम व दूरध्वनीला "कॉलर आयडी' बसवून घ्यावा. सुरक्षा यंत्रणा बाजारात किफायतशीर दरातही उपलब्ध असून, त्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

श्री. उमराणीकर यांच्या आवाहनाविषयी आपल्याला काय वाटते? नागरिकांना आवश्‍यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे का?

11 comments:

 1. Yuvraj Huge said...
   

  As police department is appealing the people to be aware of stranger they should also take some strict action against the criminals. Here, I am not criticizing the police department and I beleive in their work, but the system should be re-designed in such a way that people should think 100 times before doing major crimes. The only way that I could think is the kind of punishment given for such criminal. Lets put some subject on the blog for the discussion on What kind of punishment shall be given to such criminal.
  Many congratulations to the Police Department. I am impressed

  Regards
  Yuvraj Huge

 2. captsubh said...
   

  श्री.जयंत उमराणीकरांचा सल्ला जरी जरूरीचा/गरजेचा असला तरी त्यात नविन कांहीच नाही.
  हजारो घरात रहाणा-या म्हाता-या व्यक्ती,लहान मुले व त्यांच्या माता या सर्वानीच कायमचे सतर्क व जागरूक राहून अपरिचित व्यक्तींना घरात प्रवेश कधीच देवू नये हे खरे असले तरी प्रत्यक्षात ते सदैव जमेलच अशी शाश्वती देता येत नाही!

  कै.डो.घैसास यांच्या दोन मारेक-यास पोलिसांनी शिताफ़ीने अटक केली असली तरी त्यांना दिलेली पोलिस कोठडी फ़क्त २६ जूनपर्यंत आहे,ती अधिक तपासाकरता आणखी कांही दिवस वाढविली जाईल,पण शेवटी जामिनावर असे निर्घृण खूनी सुटतील व त्यांच्यावरची केस वर्षनवर्षे चालेल!
  ज्या मारेक-यांनी कबूली दिली आहे त्यांना ताबडतोब फ़ाशीची शिक्षा देवून तिची अंमलबजावणी केली तरच असे गुन्हे करणारे धजावतील!निदान ज्यांना धरता त्यांचे हातपाय तोडून टाकलेच पाहिजे!
  कांहीच शक्य होणार नसेल तर त्यांना एनकौंटरमध्ये यमसदनी पाठवले तरच पुण्यातील नागरिक सुरक्षित राहू शकतील!

  पोलिसांनी खून्यांना पकडले म्हणून इतके हुरळून जाणे मुर्खपणाचे आहे!पुढे काय होइल हे जास्त महत्वाचे आहे.

  पूर्वानुभवानी सगळ्यांना माहित असते की असे कित्येक चोर,दरोडेखोर आपली सावधे शोधत मुक्तपणे फ़िरत आहेत.कारण आपली न्यायसंस्था अतिशय भिकार व वेळकाढू आहे व राज्यकर्त्यांबद्दल कमी बोललेलेच बरे!ते स्वतः झेड सिक्युरिटीच्या कवचात सुरक्षित असल्यामुळे त्यांना निवडणुका सोडून "आम आदमी"शी कांहीहि देणेघेणे नसते!

 3. Anonymous said...
   

  CaptSubh, you are absolutely right.
  The criminals of this case should be straight away hanged, why additional investigation is required?
  We absolutely live in a pity situation in India.

 4. Anonymous said...
   

  Me samasta Pune-karana avahan karto ki "sarva mare-karyana twarit faashi milavi" hey andolan karaila rastya-ver utara.

 5. Anonymous said...
   

  Puneya-chi loksankhya gelya 10 varshat barich vaadli. Shasana-ne Polisanchi sankhya vaadhavli kay?

 6. Anonymous said...
   

  It is good to know that the culprits are caught. However the huge appreciation of the police department appears to be unjustified. They did their job for which they are hired. Because of their usual very low success rate of solving crimes such a quick solution gets glorified. Perhaps the case got solved so quickly beacause the victim was from a higher class of society and senior political leaders showed interest in solving the case.

 7. Anonymous said...
   

  Umranikar...Is he the same person who robbed a travel agent, for his own family's Delhi tour ?

  Q.1 Why is he still comissioner ?
  Q.2 Why is he still outside the jail ?

 8. Anonymous said...
   

  Punishment is very important & that is not available in our society due to long procedures.The incidences will increase and there is no hope that something will happen good in present senerao

 9. Anonymous said...
   

  I am not surprised that the police have found the murderers.If the culprits have confessed to the crime,why should police wait to punish them.1culprit is missing and he can be found soon and given punishment.Only when such murderers are given punishment ASAP will the normal citizens feel confident and safe in leading normal lives.Dr.Ghaisas's precious life ended so abruptly......their murderers need to be hanged immediately.

 10. captsubh said...
   

  How & why is it that the computer technology savvy Police commissioner NEVER POSTS his considered thoughts/opinion on this blog subject,if at all he reads the comments here!

  Will he enlighten the public with statistics about success rate in bringing to book such criminals?

  Will he give reasons why the Govt is not increasing the strength of the police force in direct proportion to increase in population in say last 10 years?

  Will he not explain why thieves,murders,rapists etc DO NOT HAVE FEAR OF THE POLICE OR THE LAW?What is the use of repeated sermons to all & sundry about precautions,knowing fully well that most are not practicable???

  How can he pass the buck so easily,when the same stops at his desk?

  It is Sakal's duty to fwd same to him,otherwise the very purpose of inviting views will be defeated!!!

  It is NEVER UNDERSTOOD WHY PERPETRATORS OF HEINOUS CRIMES LIKE COLD BLOODED MURDERS ETC,WHO HAVE ADMITTED THEIR CRIME do not get severely punished immediately!!!

  Indian Law,as everyone knows,is an ARSE.There is no attempt to shorten & expedite the process of meting out justice! Few crore pending cases in the courts for decades!!!
  Why,because neither the judges nor the lawyers are interested in succinct cases,speedy justice as they treat it like a big money making business.

  Some advocates with no command over the language writing pages & pages to prepare the procecution or defence & their senior comrades occupying the judge's chairs wasting own & everyone's time to go through all that drivel!!!

  An educated & experienced COMMON MAN can quickly dispense speedy justice on circumstantial evidence & self confessions! Why do we then need these so called learned counsels or "your honours"?

  It is time India condenses & simplifies its British common law legal system to 1/1000th of it's size & takes ruthless decisions & hangs such criminals immediately!!!

 11. Anonymous said...
   

  अहो अजुन संसद हल्यातील आरोपिना फाशी देऊ शकले नाहीये सरकार ! , डॉ घैसास केस तर लांबची आहे. काय होणार पुढे आहे ते सगळ्याना माहित आहे. केस रखडत राहणार. चौकशी समिती वगैरे वगैरे... तो खुनी कोण्या राजकारण्याच्या नात्यात असला तर ३ / ४ वर्षानी निवडणुकीत उमेदवार म्हणुन सुद्धा दिसेल ... काही सांगता येत नाही. आपले लोकही मेंढराच्या वरताण आहेत, त्याला निवडणुकीतही उभं राहू देतील. .....

Post a Comment