नाट्यसंमेलनासाठीही अमेरिकेतून निमंत्रण!
अध्यक्षांचे सूतोवाच ः रंगकर्मींमध्ये उत्सुकता
मराठी साहित्य संमेलनाबरोबरच आता आगामी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे यजमानपद भूषविण्याची इच्छा अमेरिकेने प्रदर्शित केली आहे. त्यामुळे नाट्यसंमेलन कोठे होणार याबाबतच्या निर्णयाविषयी रंगकर्मींमध्ये उत्सुकता आहे.
नाट्य परिषदेच्या नुकत्याच झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष मोहन जोशी यांनी या संदर्भात सूतोवाच केल्याची माहिती नियामक मंडळाच्या एका सदस्याने दिली. त्यामुळे एरवी नाटकांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या मराठी रंगकर्मींना आता संमेलनानिमित्त "अमेरिका'वारी घडण्याचा "सुयोग' येणार आहे. ज्यांच्याकडे पासपोर्ट नसतील, अशांनी लवकरात लवकर पासपोर्ट काढून घ्यावेत, असे जोशी यांनी सदस्यांना सांगितले.
आगामी संमेलनासाठी नाट्य परिषदेच्या अलिबाग आणि सांगली या शाखांबरोबरच अमेरिकेतूनही निमंत्रण आले असल्याची माहिती जोशी यांनी या बैठकीत दिली. मात्र अमेरिकेतील कोणत्या संस्थेचे निमंत्रण आले, याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली नाही. अमेरिकेत संमेलन व्हावे अशी यजमान संस्थेची इच्छा असून, या संदर्भात बोलणी सुरू आहेत. हे निमंत्रण म्हणजे "फायनल डिसिजन' नाही. मात्र काही कारणांनी अमेरिकेत संमेलन होऊ शकले नाही, तर आलेल्या अन्य निमंत्रणांचा विचार करता येईल, असे जोशी यांनी या बैठकीत सांगितल्याचे या सदस्याने स्पष्ट केले.
अमेरिकेत संमेलन झाल्यास नियामक मंडळाच्या सदस्यांना निम्मा खर्च करावा लागेल, असे जोशी यांनी सांगितले. पण किती रंगकर्मींची हा निम्मा खर्च करण्याची आर्थिक कुवत आहे, असा प्रश्न या सदस्याने उपस्थित केला.

आपल्याला काय वाटते? यंदाचे नाट्यसंमेलन अमेरिकेत व्हावे का? त्यातून काय साध्य होणार आहे? नाट्यसंमेलनापासून येथील नाट्यप्रेमींना वंचित ठेवावे का?
0 comments:
Post a Comment