व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

"वाळू लॉबी'विरुद्ध कडक धोरण

मुख्यमंत्री देशमुख ः दहशतवाद करणाऱ्यांचा नवा वर्ग रोखण्यात येईल

राज्यात "शुगर लॉबी,' "मिल्क लॉबी' यांसारखी नवी "वाळू लॉबी' निर्माण झाली आहे. त्यामधून दहशतवाद करणाऱ्यांचा नवा वर्ग तयार होत असून, त्यांच्याविरुद्ध कडक पावले उचलण्यात येतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नुकतेच येथे दिले.

"नांदेड सिटी' या प्रकल्पात वाळूचा वापर टाळून "स्टोन क्रश'चा वापर करून उत्कृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री अजित पवार यांनीदेखील वाळूउपश्‍याबाबत चिंता व्यक्त केली. ""काही काळातच वाळूच्या उपश्‍यावर बंदी आणण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळू उपसण्याच्या परवानगीपोटी सरकारला जितके उत्पन्न मिळते, त्यापेक्षा अधिक खर्च होतो. या उपश्‍यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, वाहतुकीमुळे रस्तेही प्रचंड खराब होत आहेत.'' असे ते म्हणाले.

वाळूला पर्याय शोधावा लागेल आणि दुसरीकडे या वाळूच्या उपश्‍याबाबत कडक धोरण स्वीकारावे लागेल, असे मत मुख्यमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले.
श्री. देशमुख आणि श्री. पवार यांनी व्यक्त केलेली चिंता रास्तच आहे. सध्या सुरू असलेल्या वाळू उपश्‍याने गंभीर रुप घेतले आहे. अशा अवस्थेत तो चालूच राहिला, तर पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बांधकामांत वाळूला पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे.

2 comments:

 1. Anonymous said...
   

  For the last 60 years, all the congress(I) elected MLAs and representatives have given these dealerships to their kins, relatives and one class of people, namely, who give bribes (Hapta) them during election campains.

  CONGRESS(I) is a dis-associated and uncoordinated party, that have given rise to these lobbiest business.

  Defeat Congress(I), Save INDIA!

 2. Anonymous said...
   

  साखर कारखान्यांत, सहकारी बॅंकात. दुग्ध व्यवसायात. वगैरे सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. व यापैकी बर्‍याच भानगडी श्री, अण्णा हजारेनी अनेकवेळा मुख्य मंत्र्यांच्या नजरेला आणून दिल्या आहेत. पण सरकारने आजपर्यंत कोणत्या एकाही प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली नाही. व याचे प्रमुख कारण म्हणजे, या भ्रष्ठाचारात सहभागी असणारे सर्वजण सत्तेतील राजकीय पक्षाशी संबधीत आहेत. म्हणून वाळू-ठेकेदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यानी दिलेली धमकी हसण्यावारी घ्यावी यातच शहाणपणा आहे.
  मोहन दड्डीकर
  पुणे

Post a Comment