व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

जलवाहतुकीचा पुणे पालिकेकडे प्रस्ताव

मुळा-मुठा नदीत वॉटर टॅक्‍सी, वॉटर बसेस यांसह आलिशान बोट अशा जलवाहतूक व्यवस्थेसह पाण्यावर तरंगणारे हॉटेल, व्यापारी संकुल; तसेच वॉटर पार्क, विविध जलक्रीडा स्पर्धांचे प्रशिक्षणाची आणि स्कूबा डायव्हिंगची सोय, असा प्रस्ताव नाईक एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला सादर केला आहे.

हे सर्व करताना नदी परिसरात 1962 पूर्वी पर्यावरण व जैवविविधता होती, तशी निर्माण करण्यात येणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. याचा प्रस्ताव या संस्थेने तयार केला आहे. येथे जलवाहतूक करण्यासाठी मुठा नदीतील मध्यवर्ती चॅनेलचे पात्र आणखी खोल करावे लागणार आहे. त्यासाठी पात्रात खोदाई व नदीपात्रात पाणी राहावे, यासाठी मुळा-मुठा नदीवर लोणी काळभोर येथे बंधारा बांधावा लागणार आहे, तसेच खडकवासला येथेही पाण्याचे नियमन करण्यासाठी अशा पद्धतीने बंधारे बांधावे लागणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

जलवाहतूक योजना वर्षभर सुरू राहावी, यासाठी पूरनियंत्रण यंत्रणा व पावसाचा अंदाज व प्रत्यक्ष पावसाची माहिती घेऊन पूर येऊ शकतो की नाही, अशी माहिती देणारी यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. खास प्रवाशांसाठी दुचाकी वाहने नेण्याची सोय असलेली "रो-रो', तसेच सामानाची वाहतूक करण्याची "लो-लो' बोटींचा वापर करण्याचीही योजना आहे.

प्रस्ताव चांगला आणि शहराच्या दृष्टीने हितावह असला, तरी त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होते, हेही महत्त्वाचे आहे. तसं पाहिलं, तर पीएमटी- पीसीएमटीची योजना सुरवातील योग्यच वाटत होती. पण, आज तिची स्थिती आपण सारे पाहातोच आहोत.

6 comments:

 1. मोरपीस said...
   

  छान आहे

 2. Hemu said...
   

  Prastaav tar faarach chhan aahe, pan tyaachi ammalbajaavani karataanaa kamit kami pannas varshaparyantachaa vivhar karayalaa havaa. naahitar khup kharch karun yojanaa rabavinar aani ti vaparnyajogi hoiparyant "PuNyachya" garaja badallelyaa asanaar.

 3. Anonymous said...
   

  Support Raj. Kill Northees.

  'मराठी' जवानाला बिहारींची मारहाण

  दादर-गुवाहाटी एक्स्प्रेसमधील प्रकार

  - म. टा. वृत्तसेवा, नाशिक

  ' परप्रांतीयविरुद्ध मराठी' या वादाचा फटका एका मराठी जवानाला बसला असून देवळा तालुक्यातील मनोज दिनकर आहेर याला पाटणाजवळ बिहारी गुंडाकडून मारहाण झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात मनोज जखमी झाला असून त्यावर घरी उपचार सुरू आहेत.

  अरुणाचल प्रदेशात आसाम रायफल तुकडीत असलेल्या मनोजच्या वडिलांचे पाच जानेवारीला निधन झाले. त्यामुळे अडीच महिन्यांची सुटी घेऊन तो घरी आला होता. 'सुटी संपवून १९ मार्चला मनोज दादर-गुवाहाटी एक्स्प्रेसने ड्यूटीवर परतण्यासाठी निघाला होता. पाटणा स्टेशन येण्यास दोन तास बाकी असतानाच काही बिहारी गुंडांनी 'तू महाराष्ट्रीयन आहेस का?' म्हणून विचारले. 'नाशिकचा' असल्याचे सांगितल्यानंतर त्या गुंडांनी लाठ्याकाठ्यांनी मनोजला बेदम मारहाण केली, त्याला धावत्या रेल्वेतून खाली फेकून देण्याचाही प्रयत्न केला. मनोजने प्रतिकार करताच गुंडांनी औषधाच्या फवाऱ्याने त्याला बेशुद्ध केले आणि ओळखपत्रासह खिशातील रोख रक्कम काढून घेतली.

  शुद्धीवर आल्यानंतर सहप्रवाशांनी त्याला सावरले आणि गुंड रेल्वेची साखळी ओढून पळून गेल्याचे सांगितले. ओळखपत्राशिवाय लष्करात प्रवेश मिळणे शक्य नसल्याने मनोजने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. 'पाटणा रेल्वे स्टेशनात भेटलेल्या दोन महाराष्ट्रीय लष्करी जवानांकडून पैसे घेऊन घरी परतलो', अशी व्यथा मनोजने बोलून दाखवली.

 4. Anand said...
   

  No its wrong. Only cleaning of the rever is the first target. According to me " Before end of the project the sanctioned money will end" This is not a jock & PMC will not complete it before 20 years.

 5. captsubh said...
   

  मुळा-मुठा नदीत जलवाहतूक व्यवस्थेचा व जलक्रीडा प्रशिक्षणाचा व स्कूबा डायव्हिंगचा प्रस्ताव नाईक इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला सादर केला आहे ही बातमी पुणे प्रतिबिंबच्या ब्लोगवर वाचून आश्चर्य वाटले!
  या योजनेबद्दल पुण्याच्या पालकमंत्र्यानी आधी भाष्य केले होते,पण ही प्रचंड पैसे वाया घालवायची अव्यवहार्य राजकारणी योजना दिसत आहे हे समजायला तज्ञाची गरज नाहीं!
  २]मुठा नदीच्या अतिक्रमणांच्यामुळे अतिअरूंद झालेल्या पात्रात पावसाळ्यातसु्द्धा अतिशय कमी दिवस पाणी असते,कारण पानशेत,वरसगाव व खडकवासला धरणांत पूर्ण क्षमतेने पाणी साठवायला हे ३-४ महिनेच फ़क्त संधी मिळते.बाकी वर्षभर हे पाणी प्रचंड वेगात वाढणा-या सबंध शहराच्या तसेच थोड्याफ़ार प्रमाणात शेतीच्या गरजा भागवण्यासाठी राखून वापरले जाते.
  ३]पण ज्या मुठा नदीत पाणीच नाही व असलेला एकमेव बंधारा तोडण्यात आला तेथे आता बंडगार्डनच्यावर आणखी बंधारे घालणे impractical आहे.
  ४]ज्या नदीचे अपुरे पाणी मलमुत्र व अनेक तर्हेच्या अतिहानिकारक घाणीने प्रदुषित आहे त्या शिसारी येणा-या घाणेरड्या पाण्यात हॉटेल,जलक्रीडा स्पर्धांचे प्रशिक्षणाची आणि स्कूबा डायव्हिंगची सोय होणार हे दिवास्वप्न आहे!
  नुसत्या बोट क्लबच्या व बंडगार्डनच्या किना-यावर जावून तिथला किळसवाणा वास घेवून पहा!
  त्या पाण्यात पोहाणे वा स्कूबा डायव्हिंग करणे म्हणजे कातडीच्या व इतर रोगांना आमंत्रण देणे आहे!
  ५]मुळामुठा संगमानंतर बंडगार्डनचा एकच बंधारा आहे ज्यामुळे त्याच्या पातळीपर्यंत पाणी साठवता येते.पण सर्व गाळ इथपर्यंत येवून साठतो या सबबीवर हा बंधारा पुष्कळ वादविवादानंतर थोडा फ़ोडण्यात आला व त्यातील पाणी सतत वाहून जाते.
  ६]ज्या नद्यांना भरतीओहोटीमुळे कायम पाणी असते,ज्यांचा उतार अगदी कमी असतो व ज्यांची पात्रे आसपासच्या जमिनीपेक्षा फ़ार खोल नसतात त्यात नदी मार्गाने जलवाहतूक करणे शक्य असते.उदाहरणार्थ कोलकत्याची हुगली नदी!
  तसेच जेथे बोटी चालवायच्या तेथे गरजेप्रमाणे खोली सतत टिकवावी लागते व त्यासाठी महागडे dredging करून सतत गाळ काढावा लागतो.
  दुचाकी वा प्रवासी पार करण्याकरता RO-RO बोटी चालविणे फ़क्त बंडगार्डनच्याजवळच्या विस्तारित पात्रात शक्य आहे,पण इतर कुठेहि नाही!
  ७]तसेच बोटींमध्ये सुरक्षीतपणे चढायला उतरायला योग्य प्रकारच्या जेटी व त्यांच्यापर्यंत पोचायला रस्ते जागोजागी बांधावे लागतात व जेटींजवळ बोटींच्या draft पेक्षा जास्त पाणी सतत असावे लागते.
  ८]आपल्या देशातल्या नद्यांमधील वर्षातल्या ८-९ महिने पाण्याच्या दुर्भिक्षततेमुळेच inland water transport शक्य झालेले नाही.
  शिवाय मुळा नदीच्या पात्रात त्यामानाने जास्ती पाणी असूनहि सतत साठलेल्या जलपर्णीं[water hycinth]मुळे स्वयंचलीत नौका चालवणे अशक्यप्राय असते कारण त्यांच्या propeller मध्ये गाळ किंवा जलपर्णीं अडकल्यास त्या बंद पडतात.
  ९]PMC ने अशा अशक्य योजना प्रत्यक्षात उतरवणे नाईक एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केलेला अहवाल व त्यास किती खर्च येणार हे अभ्यासूनच मग जाहीर करावे!कारण या संस्थेच्या "एन्व्हायरमेंटल" नांवावरून यांना पर्यावरणाचे किती ज्ञान आहे याबद्दल दाट संशयाला वाव आहे!
  कॅप्टन सुभाष भाटे(निवृत्त)
  Ex-Hydrographer,Dredgemaster & IWT technical officer,Corps of Engineers[TA]with experience in Hugli River & Bangla Desh rivers.

 6. Anonymous said...
   

  This is an excellent move. Pune Mahanagar Organization should not allot unlimited water-boat trafic as autos and 3-wheelers, otherwise it will be one more mess. Bribe should be avoided and strict inspector should work for green pune. We support MNS and Raj Thakre. Maharashtra for Marathi. Government of INDIA can fund Madrassas, Government of India can fund Haaj Pilgrims with subsadary, Now the Government of Andra Pradesh fund X-tain trips to Jerusulam, Arjun singh is trying to be electected for generations with reservations everywhere, Lalu Prasad wants his Bihari People for Railways, Farmers outside maharashtra gets their loans evaded, but Farmers in Maharashtra are commiting suicides for ANTI-Human Laws and no subsidairy for them. Whats going on? When is this going to stop? Being a hindu and India is a curse? Congress should be defeted in all respect. Local parties should develop locals. Bangladeshi should go back to their given land. We dont have any problems with people, we have problems with these foreign politicians who send their bunch of unloyal men to Maharashtra. They are only for Money and Work. In all this foreign missionaries and madrassas are taking advantage of their presense. Raj Thakre for CM!

Post a Comment